गतिशीलता म्हणजे काय | What is mobility in Marathi |
सामाजिक स्तरीकरण प्रकारातील खुले स्तरीकारणात गतीशिलतेला वाव असतो. व्यक्तीला या प्रकारात सामाजिक दर्जा बदलण्यास मिळते. थोडक्यात व्यक्ती ज्या सामाजिक वर्गात असते त्याला तो वर्ग बदलू शकते. व्यक्तीस स्वप्रयत्नाने आपला सामाजिक दर्जा बदलण्याची मुभा असते. तशी सोय आणि संधी समाजाकडून निर्माण करून देण्यात येते. प्रथम आपण गतिशीलता किंवा सामाजिक गतिशीलता म्हणजे काय ते पाहूयात.
गतिशिलता यांचा अर्थ | Meaning of Mobility
Mobility ‘ या इंग्रजी शब्दाकरिता मराठीत ‘ गतिशीलता ‘ असा शब्द वापरतात. Mobility या शब्दाचा अर्थ ‘भौतिक किंवा सामाजिक स्थानातील सापेक्ष बदल किंवा हालचाल’ असा विल्यम स्कॉट यांनी दिला आहे.
गतिशीलता म्हणजे काय | What is mobility
व्यक्तीने आपला सामाजिक स्तर बदलण्याच्या क्रियेला गतिशिलता असे म्हणतात. व्यक्तीप्रमाणेच स्तरीकरण व्यवस्थेतील एखाद्या समूहाचे सामाजिक स्थान वा दर्जा बदलणे म्हणजे गतिशीलता होय.सामाजिक गतिशिलता ही, व्यक्ती किंवा कुटुंबांच्या एका सामाजिक वर्ग किंवा स्थितीतून दुसर्या सामाजिक वर्गातील हालचालींचा संदर्भ देते.
सामाजिक गतिशिलता व्याख्या | Mobility Definition
अनेक तज्ञांनी सामाजिक mobility या संकल्पनेच्या केलेल्या व्याख्या आहेत.
ड्रेसलर आणि विलिस -‘समाजाच्या एका स्तरातून दुसऱ्या स्तरात होणारी व्यक्तींची हालचाल म्हणजे सामाजिक गतिशिलता होय’.
हॉर्टन आणि हंट केलीली व्याख्या ‘व्यक्तीची एका सामाजिक दर्जाकडून दुसऱ्या सामाजिक दर्जाकडे जाण्याची क्रिया म्हणजे सामाजिक गतिशिलता होय’.
टिशलेर, व्हायटन आणि हंटर -‘ ज्यामुळे एखादी व्यक्ती किंवा एखाद्या समूहाचा समाजातील दर्जा बदलतो अशा व्यक्ती किंवा समूहाच्या स्तरीकरण व्यवस्थेतील हालचालीला सामाजिक गतिशिलता असे म्हणतात.’
Tischler , Whitten and Hunter- ‘Social Mobility is the movement of an Individual or a group within a stratification system that changes the individual’s or group’s status in society.’
थोडक्यात, गतिशीलतेमध्ये व्यक्तीच्या मूळ सामाजिक स्थानात किंवा सामाजिक दर्जात बदल होणे अपेक्षित असते.
सामाजिक गतीशिलातेचे प्रकार ( Types of Social Mobility )
सामाजिक गतिशीलतेच्या प्रक्रियेत व्यक्ती किंवा समूहांनी स्तरीकरण व्यवस्थेअंतर्गत विविध स्तरांपैकी एका स्तरातून दुसऱ्या स्तरात जाणे जाणे येणे अपेक्षित असते. यामुळे व्यक्ती वा समूहांच्या सामाजिक दर्जात बदल घडून येते. यातून मग गतिशीलतेचे प्रकार पहावयास मिळते.
सामाजिक गतिशिलतेचे एकूण चार प्रकार आहेत
- समस्तर सामाजिक गतिशीलता ( Horizontal Social Mobility ).
- स्तंभीय सामाजिक गतिशीलता ( Vertical Social Mobility )
- आंतर पिढी गतिशीलता ( Intergenerational Mobility )
- पिढी अंतर्गत गतिशीलता ( Intragenerational mobility )