सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार | Types of Stratification | Forms of Social Stratification
“एखाद्या समाजाचे एकावर एक रचलेल्या वर्गामध्ये झालेले श्रेणीत विभेदन म्हणजे सामाजिक स्तरीकरण होय.” सोरोकिन यांनी सामाजिक स्तरीकरणाची व्याख्या केली आहे. मागील पोस्ट मध्ये आपण सामाजिक स्तरीकरण ही संकल्पना पाहिले. या पोस्ट मध्ये सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार ( Types of Stratification) पहाणर आहोत.
सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार | Types of Stratification
सामाजिक स्तरीकरणाचे मुख्य दोन प्रकार पडतात.
1. बंद स्तरीकरण (Closed Stratification ) आणि
2. खुले स्तरीकरण ( Open stratification )
बंद स्तरीकरण | Closed Stratification
बंद स्तरीकरण हे स्तरीकरणाचा पहिला प्रकार किंवा रूप आहे. ज्या स्तरीकरण व्यवस्थेत व्यक्तीला आपला सामाजिक स्तर बदलता येण्याची शक्यता नसते त्याला बंद स्तरीकरण असे म्हणतो.
या स्तरीकारणात सामाजिक गतिशीलतेचा जवळ जवळ पूर्ण अभाव असतो. या स्तरीकरणामुळे व्यक्तीला आपल्या पालकांमुळे मिळालेल्या सामाजिक दर्जा किंवा स्थानावरच आयुष्यभर राहावे लागते. ( A system of stratification in which there virtually no social mobility , where people remain in the social position of their parents.)
ज्या स्तरीकरणात जन्मानेच व्यक्तीचा सामाजिक दर्जा ठरतो व त्यात बदल करता येत नाही, असे स्तरीकरण बंद स्तरीकरण होय . उदा . भारतातील जातिव्यवस्था ( Caste system ).
जातिव्यवस्था ( Caste system ) हे बंद स्तरीकरणाचे सर्वोत्तम उदाहरण आहे.
बंद स्तरीकरण हे व्यक्तीच्या अर्पित दर्जावर त्या अवलंबून असतात.
समाजातील व्यक्तीला काही गोष्टी या जन्माने मिळतात तर, काही गोष्टी या त्याला प्रयत्नपूर्वक कष्टाने मिळवाव्या लागतात. म्हणजेच ज्या गोष्टी जन्माने प्राप्त होतात त्याला अर्पित दर्जा आपण म्हणतो.
ज्या गोष्टी स्वकष्टाने प्रयत्नपूर्वक आपल्याला घ्याव्या किंवा मिळवाव्या लागतात त्यांना आपण अर्जित दर्जा असे म्हणतो.
बंद स्तरीकरण मधील गोष्टी या व्यक्तीला जन्माने मिळतात.म्हणजेच व्यक्तीच्या अर्पित दर्जावर त्या अवलंबून असतात.
बंद स्तरीकरणामध्ये व्यक्तीला आपल्या स्वप्रयत्नाने स्वतःचा जन्मजात दर्जा बदलण्याची सोय नसते. व्यक्तीला कितीही वाटलं तरी तो त्यांची जात सोडू शकत नाही. जाती सोबत वंश हा देखील बंद स्तरीकरणाचा उदाहरण आपल्याला सांगता येईल.
खुले स्तरीकरण | Open stratification
खुले स्तरीकरण हे स्तरीकरणाचा दुसरा प्रकार किंवा रूप म्हणता येईल. ज्या स्तरीकरण व्यवस्थेत व्यक्तीला आपला सामाजिक स्तर बदलण्याची अनुमती, संधी आणि सोय असते त्याला खुले स्तरीकरण असे म्हणतात.
या स्तरीकारणात सामाजिक गतिशीलतेस वाव असतो. व्यक्ती स्वत:च्या पात्रता, कौशल्ये यांच्या आधारे सामाजिक दर्जात बदल घडवून आणण्याची मोकळीक असते. (A system of stratification in which social mobility is possible and is based on personal achievement ) .
वर्गव्यवस्था ( Class system ) हे खुले स्तरीकरणाचे सर्वोत्तम उदाहरण आहे.
खुले किंवा मुक्त स्तरीकरण हे व्यक्तीच्या अर्जित दर्जावर अवलंबून असते.
अर्जित दर्जामध्ये व्यक्तीला जन्मजात कोणत्याही ती मिळत नाही. तर त्या त्याला जाणीवपूर्वक कष्ट करून प्रयत्नपूर्वक करून मिळेल ज्या गोष्टी मिळवाव्या लागतात.
खुले किंवा मुक्त स्तरीकरण हे प्रामुख्याने अर्जित दर्जावर अवलंबून असल्याकारणाने व्यक्तीला त्याचा सामाजिक स्तर बदलण्याची सोय असते. या प्रकारच्या स्तरीकारणात व्यक्ती जाणीवपूर्वक, स्वप्रयत्नाने, कष्टाने, स्वतःच्या गुणवत्तेच्या ,कौशल्याच्या आणि पात्रतेच्या आधारावर समाजातील उच्च स्थान मिळवू शकतो.
वरील पोस्ट संदर्भातील मागील पोस्ट येथे वाचा :- सामाजिक स्तरीकरण | Social stratification in sociology
वरील पोस्ट संदर्भातील पुढील पोस्ट येथे वाचा :-सामाजिक स्तरीकारणाची वैशिष्ठ्ये | Characteristics of Social Stratification