समाजशास्त्रातील करियर | Career opportunities in Sociology
समाजशास्त्राला ज्ञानाची एक विद्याशाखा म्हणून जगभर पहिले जाते. जगभर हा विषय वेगवेगळ्या विश्वविद्यापीठात शिकवला जातो. भारतात १९५० पासून हा विषय प्रथम मुंबई विद्यापीठाच्या स्तरावर नंतर हळू हळू भारतातील इतर विद्यापीठांनी हे विषय शिकवण्यास सुरुवात केली. आज भारतात या विषयात PhD करून आपण समाजशास्त्रातील करीयर च्या अनेक संधी आपणास मिळू शकतात.
Sociology is the gate way of world | समाजशास्त्राला जगाचे द्वार समजले जाते.
‘Sociology is the gate way of world’ म्हणजेच समाजशास्त्राला जगाचे द्वार समजले जाते. तर या विषयात जर कोणी पदवी घेतली असेल तर जगात कोठेही नोकरी करता येते. जसे कि आपणास माहितीच आहे. समाजशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. सामाजिक शास्त्रातील इतर विषयापेक्षा करियरची संधी या विषयात जास्त उपलब्ध आहे.
समाजशास्त्र पदवीधरांकडे विविध कौशल्ये असतात
टीममध्ये चांगले काम करतात. (Work well in teams )
चांगले अहवाल लेखन करतात. (Good report writers)
चांगले श्रोते असतात. (Good listeners)
उत्तम संशोधन नियोजक हि जबाबदारी पार पडतात. (Good research planner )
अहवाल डेटा गोळा करण्यास सक्षम असतात. (Able to collect report data )
सामाजिक समस्या आणि धोरणांच्या गंभीर विश्लेषणात चांगले भूमिका बजावतात. (Good at critical analysis of social issues & policies.)
सामाजिक समस्यांची जाणीव असते. (Aware of social problems)
वरील विविध कौशल्ये हे Sociology degree होल्डर व्यक्तीकडे असल्यामुळे त्यांना तांत्रिक प्रकारचे जॉब सोडून सर्व प्रकारच्या जॉबच्या संधी त्यांना मिळतात.
पदवी व पदवीधरांना समाजशास्त्रातील करियर संधी
समाजशास्त्राच्या विषयात पदवी किंवा पदवीत्तर झाल्यावर आपणांस नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. सामाजाशास्त्राकडे आपण एक व्यवसाय म्हणून पाहू शकता?
त्यांची सुरुवात कशी कराल? ते आपण दोन पद्धतीने करू शकता? एक म्हणजे 12 वी पास नंतर कला शाखेमध्ये BA ( Bachelor of Arts ) प्रवेश घेऊन आपणास समाजशास्त्र विषय ठेवावे लागेल.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शी संलग्न अश्या पदवीपूर्व ( Undergraduate ) कॉलेज मध्ये BA प्रथम वर्षाला समाजशास्त्र विषय अनिवार्य केला आहेच. हा विषय BA प्रथम वर्षाला असू द्या. द्वितीय वर्षाला असू द्या किंवा तिसऱ्या वर्षाला असू द्या. समाजशास्त्र विषय BA करीत असताना असणे आवश्यक असते. BA करीत असताना कोणत्याही वर्षी समाजशास्त्र विषय असेल तर तुम्ही समाजशास्त्र विषयात MA करू शकता.
दुसरा एक मार्ग आहे ज्यामध्ये BA तिसऱ्या वर्षात स्पेशल विषय घेऊन जर आपण डिग्री घेतली तरी चालेल. त्याच्या आधारवर सुद्धा आपणास करियरच्या अनेक संधी मिळतात.
एक व्यवसाय म्हणून समाजशास्त्रातील करियर संधी | Sociology as a profession
BA, MA, M. Phil आणि Ph.D करून एक फुल प्रोफेशन म्हणून अनेक संधी पुढील क्षेत्रात मिळू शकते.
MA नंतर आपण सेट (SET) व नेट ( NET) करून आपण असिस्टंट प्रोफेसर / सहाय्य्क प्राध्यापक बनून ग्रॅज्युयेट व पोस्ट ग्रॅज्युयेट च्या विद्यार्थ्याना Central and State Universities मध्ये सहाय्यक प्राध्यापक, कालांतराने प्राध्यापक बनू शकता. तसेच विद्यापीठ अनुदान आयोग- University Grant Commission (UGC ) काम करू शकत, धोरण कर्ते (Policy Makers ), अध्यापन आणि संशोधन (Teaching and research) आणि नियोजन कर्ते ( Planning) इत्यादी अश्या विविध क्षेत्रात आपण फुल टाईम कार्यरत राहू शकता.
MA करून सेट (SET), नेट ( NET) करून व्हा असिस्टंट प्रोफेसर बना तत्काळ CHB टीचर बना
Master Of Art ( MA) / मास्टर ऑफ आर्ट म्हणजेच समाजशास्त्रात पदव्युत्तर झाल्यावर विद्यापीठ अनुदान आयोग- University Grant Commission (UGC ) वर्षातून दोन वेळा राष्ट्रीय पात्रता चाचणी [National eligibility test ( NET)] परीक्षा घेते.
समाजशास्त्रात जर तुमच्याकडे BA डिग्री असेल तर तुम्ही सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षा देऊ शकता. MPSC, UPSC आणि सरळ सेवा भरती तुम्ही सहभागी होऊन सरकारी क्षेत्रातील (Government Sector) विविध पदांवर काम करू शकता. जसे की समाज कल्याण (Social welfare) , कायदा (Law), कामगार कल्याण आणि (Labour welfare) इत्यादी.
समाजशास्त्रामुळे DSW, BSW आणि MSW या डिग्री नसताना ही सामाजिक क्षेत्रांत काम करण्याची मिळते संधी व जॉब
समाजशास्त्राची डिग्री असेल तर DSW, BSW आणि MSW या डिग्री नसताना ही सामाजिक क्षेत्रांत (Social Sector) कामाची संधी हमखास मिळते. विविध सामाजिक संस्थात व NGO मध्ये आपणांस कामाची संधी मिळते. शासकीय व निम्नशासकीय क्षेत्रातील संस्थामध्ये काम करू शकता.
Sociology degree होल्डरला मनोरंजन व प्रसारमाध्यमे क्षेत्र (Entertainment & media Sector) आजकाल कामाचा अनेक संधी मिळत आहे. सामाजिक प्रश्न केंद्रित चित्रपट निर्मिती मध्ये समाजशास्त्रातील व्यक्तींचा सहभाग वाढत आहे.
Diverse fields in sociology | समाजशास्त्रातील करियर व विविध क्षेत्रे
मार्गदर्शन समुपदेशक ( Guidance Counsellor)
मानव संसाधन (एचआर) प्रतिनिधी ( Human Resources (HR) Representative)
व्यवस्थापन सल्लागार ( Management Consultant)
बाजार संशोधन विश्लेषक (Market Research Analyst)
मीडिया प्लॅनर ( Media Planner )
धोरण विश्लेषक (Policy Analyst )
जनसंपर्क (PR) विशेषज्ञ ( Public Relations (PR) Specialist)
संवादक ( Communicators )
समस्या सोडवणारे (Problem solvers )
If you’re interested in exploring career opportunities in sociology, watch our video here to learn about the diverse and rewarding paths available in this field.
हेही वाचा :- समाजशास्त्रीय कल्पनाशक्ती काय आहे | What is Sociological Imagination