FYBA SOCIOLOGY SYLLABUS IN MARATHI AND ENGLISH
Savitribai Phule Pune University | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
F. Y. B. A. Sociology Syllabus (w.e.f. June 2019-20) एफ. वाय. बी. ए. समाजशास्त्र अभ्यासक्रम ( जून -2019-20 पासून लागू)
SEMESTR -I
Paper Name:- Introduction to Sociology
Objectives | उद्दिष्टे
- To understand the social context of emergence of Sociology. | समाजशास्त्राच्या उदयाची सामाजिक पार्श्वभूमी समजून घेणे.
- To introduce basic sociological concepts and subject matter and perspectives of Sociology | समाजशास्त्रातील मुलभूत समाजशास्त्रीय संकल्पना, अभ्यासविषय व दृष्टीकोण (परिप्रेक्ष्य) यांचा परिचय करून देणे.
- To familiarize students with new avenues in Sociology | विद्यार्थ्यांना समाजशास्त्रातील नवीन येत असलेल्या मार्गांची किंवा शोधांची ओळख करून देणे.
प्रकरण-1 . एक विद्याशाखा म्हणून समाजशस्त्राचा उदय
अ) समाजशस्त्राचा उदय: पाश्चात्य व बिगर पाश्चात्य देशांची पार्श्वभूमी,
प्रबोधन काळ / बैद्धीक पुनरुज्जीवनाचा काळ/उद्बोधनाचा काळ ( फ्रेंच आणि औद्योगिक क्रांती)
ब) समाजशास्त्राच्या व्याख्या आणि अर्थ, समाजशास्त्राचे स्वरूप (शास्त्रीय व मानवतावादी) समाजशास्त्राचा अभ्यासविषय व व्याप्ती
क) समाजशास्त्रीय कल्पना सामान्यज्ञानाच्या पलीकडे
ड) समाजशास्त्रातील विविध क्षेत्रे आणि व्यावसायिक /करियर च्या संधी
प्रकरण :- 2. समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना
अ) समाज, व्याख्या, अर्थ, वैशिष्ट्ये व समाजाचे बदलते प्रकार
( शिकार व अन्न गोळा करणारा समाज, शेती करणारा समाज, औद्योगिक व नव-उदारमत समाज )
ब) समूह, मंडळ आणि सामाजिक संपर्क जाळे – संकल्पना व वैशिष्ट्ये. समूहाचे प्रकार
प्रकरण:- 3. संस्कृती, विषमता आणि सामाजिक वंचितता / विभेदन
अ) संस्कृती -व्याख्या, वैशिष्ट्ये, पैलू.
ब) संस्कृतीचे प्रकार – लोकचार/ लोकरीती, लोकप्रिय संस्कृती, उपसंस्कृती, प्रतिसंस्कृती
क) सांस्कृतिक स्वयंकेंद्रीयता, परकीय द्वेष, बहुसंस्कृतिवाद आणि संकरीकरण
ड) सामाजिक स्तरीकरण आणि विषमता संकल्पना आणि आधार
( जात, वर्ग, लिंगभाव, वांशिकता व वय)
इ) सामाजिक वंचितता / विभेदन – अर्थ, मिती/ आयाम (आर्थिक, राजकीय, व्यावसायिक आणि सांस्कृतिक)
Semester – II
Paper Name :- Sociology: Social Institutions and Change
Objectives | उद्दीष्टे
- To acquaint students with basic institutions of Society with its newer dimensions. | समाजाच्या मूलभूत संस्थांशी विद्यार्थ्यांना नवीन आयामांसह ओळख करून देणे.
- To develop critical understanding of the functioning of social institutions. | सामाजिक संस्थांच्या कार्याविषयीची चिकित्सक समज विकसित करणे.
- To acquaint students with the concept and current versions of social change. | विद्यार्थ्यांना सामाजिक बदलाची/परिवर्तनाची संकल्पना आणि सद्यस्थितीतील आवृत्या विषयी परिचित करणे.
प्रकरण-1 सामाजिक संस्था-I
अ) कुटुंब, नातेसंबंध आणि विवाह : अर्थ, प्रकार आणि बदलते प्रवाह ( एकल पालक कुटुंब, सहवासी कुटुंब, मिश्र कुटुंब, तृतीयपंथी विवाह / समलैंगिक विवाह )
ब) राज्यसंस्था : अर्थ आणि प्रकार (राजेशाही, लोकशाही, एकाधिकारशाही/एकपक्षीय राज्य, हुकूमशाही, नवउदार राज्य)
क) अर्थसंस्था : अर्थ, इतिहास आणि नमुने ( भांडवलशाही, समाजवादी, मिश्र अर्थव्यवस्था, नवउदार अर्थव्यवस्था)
प्रकरण- 2. सामाजिक संस्था – II
अ) धर्मसंस्था: अर्थ, प्रकार, धर्मनिरपेक्षता
ब) शिक्षणसंस्था:- अर्थ, प्रकार (औपचारिक-अनौपचारिक आणि त्यांची भूमिका) उच्च शिक्षणातील आव्हाने
क) प्रसारमाध्यमे : अर्थ, प्रकार (मुद्रित / लिखित, इलेक्ट्रॉनिक, सामाजिक माध्यमे आणि त्यांची भूमिका) समकालीन समाजात जनसंपर्क माध्यमंची उपयुक्तता
प्रकरण-3. सामाजिक परिवर्तन
अ) सामाजिक परिवर्तन : संकल्पना आणि वैशिष्ट्ये
ब) तंत्रज्ञान, राज्य, नागरी समाज आणि सामाजिक चळवळ
क) आधुनिकीकरण, विकास आणि जागतिकीकरण