समाज | Samaj mhanje kay | What is Society | Characteristics of Society
समाज हा शब्द आपल्या सर्वांचा परिचयाचा आहे. समाज म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर जर, आपण कोणाला विचारले तर, ते काय सांगतील? तुम्ही काय सांगितला असता? हेच की, आपण जिथे राहतो, ते ठिकाण म्हणजे समाज होय. किंवा आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या समाजाचे लोक राहतात त्यांना आपण समाज म्हणतो. अशी वेगवेगळी उत्तरे आपल्याला मिळतील.
आपल्या रोजच्या आयुष्यात आपण ‘समाज’ शब्दाचा उपयोग अनेक अर्थने प्रयोग करतो. सामान्य माणूस ज्या अर्थाने ‘समाज’ हा शब्द वापरतो, त्याहून निराळा व खास समाजशास्त्रीय पद्धतीने ‘समाज’ ची संज्ञा समाजशास्त्रज्ञांनी केल्या आहे.
समाज यांची समाजशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या
“समाज म्हणजे सामाजिक संबंधांचे जाळे होय” अशी समाजाची व्याख्या मॅकायव्हर आणि पेज यांनी केली आहे.
समाजाच्या विविध समाजशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या येथे पहा.
सामजिक संबध हे कुठे आढळून येते तर ते व्यक्ती-व्यक्तीमध्ये दिसून येतात-उदा. पती-पत्नी संबध; तसेच व्यक्ती-समूहामध्ये दिसून येतात उदा.-विद्यार्थी-शिक्षक संबध, नेता-अनुयायी संबध. त्याचबरोबर आपल्याला समूह-समूहामध्ये दिसून येतात- उदा. दोन देशातील संबध. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील संबध, विवाह करिता एकत्र आलेले दोन कुटुंबातील संबध. जेव्हा व्यक्ती -व्यक्ती, व्यक्ती-समूह आणि समूह-समूह यामधील सर्व घटक परस्परांचे वर्तन प्रभावित करतात तेव्हा त्यांच्यात सामाजिक संबध बनतात.
थोडक्यात समाज म्हणजे आपल्याला असे सांगता कि समाज ही सामाजिक संबंधांची व्यवस्था आहे. समाजाला स्वःताची एक संस्कृती असते.
समाजाची वैशिष्ठ्ये | Characteristics of Society
वैशिष्ठ्ये जाणून घेत असताना, समाज कसा असतो? किंवा कसे आहे? हे प्रश्न आपण जर विचारले तर वरील व्याख्यावरून आपल्याला समाजाची ही वैशिष्ठ्ये सांगता येतील.
1) समाज सामाजिक संबंधाची व्यवस्था आहे (A system of social relationship )
सामाजिक आंतरक्रिया यांच्यामुळे व्यक्ती आणि समूहात स्थिर असे सामाजिक संबंध निर्माण होतात. त्यातून सामाजिक संबंधांचे व्यवस्था बनते. .
2) समाजाला निश्चित भू-प्रदेश असतो. (Definite territory )
समाज हा हवेत असू शकत नाही, त्यांचे भौगोलिक स्थान, प्रदेश यावर त्यांचे अस्तित्व अवलंबून असते. भौतिक पर्यावरणाचा त्यांच्यावर समाजावर परिणाम होतो.
3) समाजाला सर्वसमावेशक / व्यापक अशी संस्कृती असते. ( Comprehensive culture )
प्रत्येक समाजाला स्वःताची अशी संस्कृती असते. संस्कृती नसलेला Society हा शोधून ही सापडणार नाही. जीवन जगण्याची त्या त्या समाजाची आदर्श रीत म्हणजे संस्कृती होय. समाजाची जीवन जगण्याची पद्धती म्हणजे संस्कृती होय. प्रत्येक समाजाची संस्कृती ही वेगळी असते. संस्कृतीमुळे समाज हा टिकून राहतो.
4) समाजात सातत्य असते. कधी नष्ट होत नाही. (Continuity of society)
समाजाचे जे सदस्य मरण पावतात व त्यांची जागा हे नवीन जन्माला आलेले सदस्य घेतात. त्यामुळे समाजाचे सातत्य हे टिकून राहते. नवीन येणाऱ्या पिढीवर समाजाचे सातत्य अवलंबून असते. नवीन सदस्य जन्माला येण्याकरता समाजमान्य अशी व्यवस्था समाजात असतात.
5) समाज ही एक अमूर्त संकल्पना आहे. (Abstract Concept )
समाज हा अमूर्त असतो. तो डोळ्यांनी दिसत नाही. मात्र ते सामाजिक संबंध रूपाने अस्तित्वात आहे. जशी व्यक्ती आपण दाखवू शकतो तसे, आपणास सामाजिक संबंध दाखवता येत नाही.
6) समाज हा परस्परवलंबन आणि सहकार्य यावर आधारित असतो (Interdependent & Co-operation )
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. मनुष्य एकटा राहू शकत नाही. तो एकटा राहून त्याच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. म्हणून तो त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमी दुसऱ्यावर अवलंबून असतो. म्हणून समाजातील व्यक्ती या परस्परवलंबन आणि सहकार्य करून जीवन जगतात.
7) समाजाच्या काही गरजा असतात. ( Social needs)
माणसाच्या काही मूलभूत गरजा असतात. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि रोजगार या गरजा जर पूर्ण नाही झाल्या, तर व्यक्तीच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित होतो. जश्या मानवाच्या गरजा आहेत. तशा समाजाच्या पण गरजा आहेत. लोकसंख्येचे जतन करणे, समाजातील विविध कामाचे वाटप करणे, सामाजिक ऐक्य व एकात्मता टिकून ठेवणे आणि समाजाचे सातत्य टिकून ठेवणे या समाजाच्या गरजा आहेत.
8) समाज हा व्यापक मानवी समूह आहे. (large human group)
भारतीय Society जर आपण म्हटलं, तर भारतीय Society हा हजारो जाती, धर्मांनी व पंथांनी बनलेला हा एक विशाल समूह आहे. तो लहान मोठ्या आकाराच्या समूहांनी व उप समूहांनी मिळून बनलेला आहे.
9) समाजात एकतेची भावना. असे आपलेपणाची भावना असते ( Feeling of Unity & We Feeling )
प्रत्येक समाजातील लोकांना आपण एक आहोत असे वाटत असते. आपला Society इतर राहून निराळा आहे, असे प्रत्येक समाजातील लोकांना वाटत असते. आपण एक आहोत, अशी भावना समाजातील लोकांत प्रबळ असते. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे वाक्य आपल्यातील ऐक्यी व एकतेची भावना दाखवते.
If you’re curious about the fundamental concept of ‘What is Society’ and the defining characteristics that shape it, watch our video here to gain a comprehensive understanding of this core sociological topic
वरील पोस्ट संदर्भातील पुढील पोस्ट वाचा:- समाजाचे प्रकार | Six Types of Society