घरगुती कामगार कल्याण योजना | Domestic worker scheme
घरगुती कामगार कल्याण मंडळातर्फे महाराष्ट्र घरगुती कामगार कल्याण मंडळ अधिनियम २००८. या अधिनियमाच्या कलम 10 अन्वये घरगुती कामगारांसाठी विविध घरगुती कामगार कल्याण योजना यांची तरतूद केलेली आहे.
घरगुती कामगार कल्याण मंडळाद्वारे योजना सुरु करण्याचा उद्देश
- अपघात घडल्यास लाभार्थींना तात्काळ सहाय्य पुरविणे,
- लाभार्थींच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणे,
- लाभार्थींच्या अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या आजारावर उपचार करण्यासाठी वैदयकीय खर्चाची तरतूद करणे,
- महिला लाभार्थींकरीता प्रसुती लाभाची तरतूद करणे,
- लाभार्थीचा मृत्यू झाल्यावर कायदेशीर वारसाला अंत्यविधीच्या खर्चासाठी रक्कम प्रदान करणे.
मंडळातर्फे घरगुती कामगार देण्यात येणाऱ्या योजना
जनश्री विमा योजना
घरगुती कामगारांना जनश्री विमा योजना लागू झालेली आहे. सदर योजनेअंतर्गत खालील प्रमाणे लाभ दिले जातात.
- जनश्री सदस्याचा नैसर्गिक मृत्यु ओढवल्यास त्याच्या वारसदारास रु.30000/- देण्यात येते.
- अपघाती मृत्यु ओढवल्यास त्याच्या वारसदारस रु.75,000/- देण्यात येते.
- अपघातामुळे कायम स्वरुपी संपुर्ण अपंगत्व ओढवल्यास सदस्यास रु.75,000/- देण्यात येते.
- अपघातामुळे कायमस्वरूपी अशत: अपंगत्व आल्यास सभासदास रू.37,500/- देण्यात येते.
- सदस्यांच्या मुलांना शिक्षणाकरिता शिक्षा सहयोग योजने अंतर्गत इयत्ता 9 वी ते 12 वी करिता तसेच आय.टी.आय. चा कोर्स करीत असल्यास, दरवर्षी उर्त्तीण होत असल्यास, दर तिमाही करिता रु.300/- इतकी रक्कम प्रत्येकी (जास्तीत जास्त दोन मुलांकरिता ) देण्यात येते.
- भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत एका जनश्री सदस्याचा वारसदारास नैसर्गिक मृत्यूबाबत रू.30000/- रक्कम अदा करण्यात आली आहे.
- अंत्यविधी सहाय्य – मृत घरेलू कामगाराच्या कायदेशिर वारसास अंत्यविधी सहाय्य रु.2,000/- देण्यात येते. त्यानुसार दोन सदस्यांना रक्कम अदा करण्यात आली आहे.
- घरेलू कामगारांना प्रसुतीलाभ म्हणून दोन अपत्यापर्यंत प्रत्येक प्रसुतीकरीता रु.5,000/- इतकी मदत देण्यात येणार आहे.
- कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत घरेलू कामगाराला व त्यांच्या पाल्यांना शिकावू उमेदवार प्रशिक्षण व मॉड्यूलर एम्प्लॉएबल स्किम अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येते.
- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत विदेशी भाषा शिकविण्याचे वर्ग घेतले जातात. नोंदीत घरेलू कामगारांच्या पाल्यांना विदेशी भाषा शिकता येते.
- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत घरेलू कामगारांसाठी घरेलू कामगार पदविका अभ्यासक्रम व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत घरेलू कामगारांना व त्यांच्या मुला-मुलींना पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पदविका अभ्यासक्रमासाठी मंडळातर्फे रु. 900/- व पूर्वतयारी शिक्षणक्रमासाठी रु. 650/- मंडळातर्फे देण्यात येणार आहे.