2023 नवीन वर्षाचे संकल्प | 2023 New Year’s Resolutions
2023 या वर्षी करूयात नवीन वर्षाचे संकल्प | 2023 New Year’s Resolutions’. सरत्या वर्षाला निरोप देत, नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करूया.
सोनेरी पहाट |
नव्या स्वप्नांची नवी वाट |
नवा आरंभ |
नवा विश्वास |
नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात |
2023 या नवीन वर्षाची सुरुवात करा खालील नवीन वर्षाचे संकल्प करून
आजपासून नवीन वर्ष 2023 सुरु होतोय. करोना सारख्या महाभयंकर साथरोग नंतर ही आपण हे वर्ष पाहू शकलो. प्रथम या वर्षांचे आपण स्वागत करूयात.
1) दर महिन्याला एक पुस्तक वाचण्याच्या संकल्प करा
तुम्ही ही म्हण नक्कीच ऐकले असलाच ‘ग्रंथ हेच गुरु’. तुमचे गुरु इतकेच ग्रंथाना महत्व आहे. माणसे घडविण्यात ही पुस्तके महत्वाची भूमिका निभावतात. वाचनामुळे तुम्ही सर्वज्ञ बनता. वाचाल तर वाचाल हे उगीच म्हटले जात नाही.
2) तुमच्या कुटुंबाला वेळ द्या.
तुमचे कुटुंब हे तुमचे सर्वस्व असते. त्यांना वेळ देणे हे तुमच्या आयुष्यातील पाहिले प्राधन्यक्रम असावे. आज प्रत्येक जण पैश्याच्या मागे धावत सुटला आहे. कामाच्या व्यापामुळे अनेक जण आपल्या कुटुंबाना वेळ देत नाहीत. त्यामुळे अनेक कौटुंबिक समस्या निर्माण झाल्या आहे. सुट्टीच्या दिवशी सुद्धा लोकांना घरी त्यांच्या ऑफिसमधील कामे करावे लागत आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे. चला तर यावर्षी आपण संकल्प करूयात की नियमित आपल्या कुटुंबाला वेळ देऊ आणि ऑफिसचे काम ऑफिस मध्ये करू.
3) झालेल्या चुका पुन्हा करू नका. चूक झाली तर माफी मागा आणि क्षमा करायला सुद्धा शिका.
जीत ही दोन पाऊले माघार घेण्यात असते ते नेहमी लक्षात ठेवा. माफी मागण्यात कमी पणा अजिबात नसतो. हे आपल्यातील नम्रता आणि निर्मळता दर्शवतो. माफी मागणाऱ्या पेक्षा क्षमा करणारा महान असतो. चुकलेल्यांना क्षमा ही करावे. उगीच मनात राग ठेऊन बसू नये. माफ करण्याने अथवा माफी मागितल्याने मन हलके होते.
4) कोणतीही गोष्ट मनाला लावून न घेता सकारात्मक गोष्टी घेत चला.
आयुष्यात आणि आपल्या दैनंदिन जीवनात सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडतील असे नसते, मनासारखे घडावे म्हणून जिद्द करणे हे सुद्धा व्यावहारिक ठरत नाही. जर एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडलीच, तर त्या फारश्या मनावर घेऊ नका. पटकन सकारात्मकपणे स्वतःची समजूत घालून त्यातून बाहेर पडा. कुडत बसू नका. वारंवार त्यांच्या विचार अजिबात करू नका.
5) कुणावर ही क्रोधीत होऊ नका.
क्रोध हे सर्व नाशाचे कारण असते. क्रोधीत होण्याने काहीही सध्या होत नाही. उलट क्रोधाचे अनेक दुष्परिणामच जास्त असते. प्रायश्चित्त शिवाय क्रोधाने काही मिळत नाही.जो क्रोध धारण करतो त्यांचे मानसिक व भावनिक आणि शारीरिक स्वास्थ बिघडते. किंचितसा दाखविण्यापुर्ते क्रोध किंवा राग ठीक आहे, मात्र त्यांचे अतिरेक कधीही वाईटच असते.
6) अनावश्यक पैसे खर्च करू नका. पैश्यांची बचत करा. गुंतवणूक करा.
. पैश्यांची बचत म्हणजे पैसे कमविण्यासारखे आहे. हे नेहमी लक्ष्यात ठेवा. स्वतःचे आणि तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या सदस्यांचे मुलभूत विमा उतरवून ठेवा. हेल्थ विमा, अपघात विमा आणि टर्म इन्सुरन्स हे वेळीच काढून घ्यावे. संकट आपल्यावर हे देव म्हणून आपल्याला मदत करते.
7) हार मानू नका, अपयश आल्यावर प्रयत्न सोडू नका. (Never Never Give Up)
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पि. जे अब्दुल कलाम यांनी सांगितले आहे की, कधी कधी यश आणि अपयश यामध्ये फक्त एक पायरीचा फरक असतो. शेवटची पायरी चढण्याऐवजी आपण हार मानतो. त्यामुळे एक अविश्वाशनीय शोध पर्यत आपण पोचत नाही. जे की तुमचे जीवन कायमचे बदलणार असते.
डॉ, कलाम या अग्नी बाण या मिसाईल वर इस्रो मध्ये काम करीत होते. अग्नी बाणाच्या टेस्टिंग करताना त्यांना अपयश आले आणि सर्वांनी आशा सोडली. मात्र डॉ. कलाम यांनी प्रयत्न चालू ठेवले आणि भारताच्या अग्नी बाणाचे परीक्षण यशस्वी करून दाखविले. म्हणून भारताचे मिसाईल मॅन म्हणून त्यांना जग ओळखते.
8) महिन्यातून एक-दोन दिवस डिजिटल फास्टिंग (digital fasting) करण्याचा निश्चय करा.
तुमच्या डोळ्याच्या आरोग्यासाठी आणि निसर्गाकडे पाहण्यासाठी तुम्हांला डिजिटल फास्टिंग करणे गरजेचे आहे. डिजिटल फास्टिंग म्हणजे दिवसातील किंवा आठवड्यातील ठरविलेल्या कालावधीमध्ये फोन, टॅब्लेट किंवा लॅपटॉपचे अश्या प्रकारच्या कोणतेही डिजिटल साधनापासून लाब राहणे.एकदा ही सवय लागणार नाही पण हळू हळू ही सवय लावून घ्या.
9) आयुष्यभर दिलेला शब्द पाळा, सत्य, अहिंसा आणि लोकशाही मार्गाने वाटचाल करा.
सत्य, अहिंसा आणि लोकशाही या मुल्यांवर विश्वास असणारी व्यक्ती म्हणून तुमची ओळख तयार करणे हे गरजेचे आहे. अशी व्यक्ती बनणे जो आजच्या काळाची गरज बनली आहे.
10) नवीन वर्षाचे संकल्प हे की शक्य तितक्या लोकांना मदत करा.
आज तुमची कशीही परिस्थिती असेना, हे मात्र नक्की आहे की, या जगात तुमच्यापेक्षा परिस्थितीने अनेक जण मागासलेले आहे. त्यांची परिस्थिती ही हलाखीची आहे. आपल्या उत्पन्नातील 10% रक्कम मदत म्हणून गरजूंना देण्याचा संकल्प करा. जागतिक गरिबीविरुद्ध लढण्यास हातभार लागेल.