Sociology NET Exam-2023 Preparation | UGC NET Sociology
नमस्ते परीक्षार्थी, आपण यापूर्वी UGC NET Sociology ची परीक्षा दिली असेल अथवा पहिल्यादाच आपण देत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. तुमचे MA सुरु असेल अथवा पूर्ण झाले असेल तर तुम्ही फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या Sociology NET Exam-2023 ची परीक्षेस पात्र आहात.
तुम्ही मराठी पार्श्वभूमी असलेले ग्रामीण अथवा शहरी भागातील विद्यार्थी असाल तर Sociology NET Exam-2023 Preparation ही ब्लॉग सिरीज तुम्हांला नक्कीच मदत करेल. जर तुम्ही शाळा-कॉलेजवर शिकवत असाल आणि अनेक प्रयत्न करूनही आपले Sociology NET क्लियर झाले नसेल तर अशा सर्वांचे या ब्लॉग सिरीजवर मनापासून स्वागत आहे.
या ब्लॉग सिरीजवर Sociology NET Exam ची तयारी कशी करावी, Sociology NET Exam syllabus, पास होण्यासाठी वाचावी लागणारी पुस्तके व नोट्स आपणास पुरविण्यात येईल. Paper- I & Paper -II यांची तयारी कशी करावी यांचे मार्गदर्शन मिळेल. चालू घडामोडीचे कोणते प्रश्न विचारले जातात याबदल सविस्तर माहिती आपणास मिळतील. एकूणच Sociology NET Exam पास होण्यसाठीची संपूर्ण माहिती आपणास सुरु केलेल्या या ब्लॉग सिरीजद्वारे मिळेल.
2023 मध्ये यूजीसी नेट परीक्षेच्या तारखा जाहीर
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ला विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) UGC-NET परीक्षा आयोजित करण्याचे काम सोपवले आहे, नुकतेच NTA ने यूजीसी नेट-2022 नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. यूजीसी नेट परीक्षेच्या तारखा ही जाहीर करण्यात आल्या आहेत.
सध्याचे यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी 2023 घेण्यात येणाऱ्या यूजीसीची नेट परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे. यूजीसीची नेट परीक्षा जून आणि डिसेंबरमध्ये घेतल्या जातात. डिसेंबर-2022 ची नेट परीक्षा 21-फेब्रुवारीपासून सुरू होऊन 10-मार्च 2023 पर्यंत चालणार आहे.
UGC NET December-2022 परीक्षेकरिता नोंदणी करण्यासाठी पुढील लिंकवर जाऊन नोंदणी करा. Online Application Form form UGC NET December-2022
UGC घेणार 2023 साली तीन वेळा यूजीसी नेट परीक्षा
साधारण वर्षातून दोन वेळा होते Sociology NET Exam परीक्षा
देशात NET परीक्षा दोनदा होते. एक जून मध्ये आणि दुसरी डिसेंबर मध्ये. यावेळी डिसेंबर-22 मध्ये परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे सदर परीक्षा ही फेब्रुवारी ते मार्च -2023 या दोन महिन्यात होणार असे Public Notice UGC च्या संकेतस्थळ आले आहे. 2023 सालची परीक्षा होणार 13 ते 22 जून दरम्यान होईल . दुसरी परीक्षा डिसेंबरात होईल.
यूजीसी नेट परीक्षा का असते?
भारतीय नागरिकांची सहायक प्राध्यापक आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप याकरिता पात्रता निश्चित करण्यासाठीची ही चाचणी परीक्षा असते. ही चाचणी परीक्षा पास झाल्यावर भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक होता येते अथवा ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळवून संशोधन करू शकता.
Sociology NET Exam होणार online पद्धतीने होतात.
डिसेंबर 2018 नंतर ही परीक्षा online पद्धतीने घेण्यात येत आहे. संगणक आधारित चाचणी (CBT) मोडमध्ये घेतली जात आहे.
यूजीसी नेट परीक्षा होते हिंदी आणि इंग्रजी भाषेत
राष्ट्रीय स्तरावरील ही ऑनलाइन पात्रता चाचणी परीक्षा वर्षातून दोनदा हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये घेतली जाते.
यूजीसी नेट परीक्षा वेळ, प्रश्ने व मार्क
१८० मिनिटांच्या परीक्षेत दोन प्रश्नपत्रिका असतात. पहिल्या प्रश्नपत्रिकेत ५० बहुपर्यायी प्रश्ने असतात. व दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत १०० बहुपर्यायी प्रश्ने असतात. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग केले जात नाही.
यूजीसी नेट परीक्षा फी
1) OPEN प्रवर्गातील उमेदवारांना 1100 रुपये,
2) OBC उमेदवारांना 550 रुपये,
3) SC & ST व दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना 275 रुपये
यूजीसी नेट परीक्षा याबाबत आपणास एक मुलभूत माहिती मिळाली असे मी अशा करतो, पुढील पोस्ट द्वारे आपण Sociology NET Exam syllabus मराठी आणि इंग्लिश मध्ये पाहूयात.
.