वारली चित्रकला | वारली पेंटिंग | Warli Painting in Marathi
वारली चित्रकला ही इतिहासातील सर्वात जुनी कलाकृती मानली जाते. हा आदिवासी कलेचा एक प्रकार आहे. ज्याचे मूळ भारतातील महाराष्ट्र राज्य आहे. ही कला आदिवासी समाजात खूप लोकप्रिय आहे. या आदिवासी कलेचा उगम महाराष्ट्रात झाला, असून ती आजीही अस्तित्वात आहे व जिवंत आहे. यांचे श्रेय जाते ते श्री जीव्या सोमा म्हसे यांना.
वारली चित्रकला यांचे जनक
जंगलांमधल्या कडीकपारीत लपलेली वारली चित्रकला जगाच्या नकाशावर नेणारे वारली चित्रकार श्री जीव्या सोमा म्हसे याना २०११ साली भारत सरकारकडून कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यबदल त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला आहे.
वारली चित्रकलेचे जनक जीव्या सोमा म्हसे यांना ओळखले जाते.
वारली चित्रकला व या आदिवासी जमातीचा इतिहास
वारली यांचे महाराष्ट्रातील वास्तव्य
वारली चित्रकला ही आदिवासी कलेची एक शैली आहे. जी मुख्यतः भारतातील उत्तर सह्याद्री पर्वतरांगातील आदिवासी लोकांनी तयार केली आहे. वारली जमात ही एक महाराष्ट्रातील आदिवासी जमात आहे, जी मुख्यता ठाणे जिल्ह्य़ातील आदिवासीबहुल डहाणू, विक्रमगड, मोखाडा, जव्हार, तलासरी, जास्त प्रमाणात आणि वसई, पालघर या तालुक्यांत तुरळक ठिकाणी वस्ती आढळून येते.
वारली हे निसर्ग पूजक असतात.
वारली संस्कृती ही निसर्ग मातृत्वाच्या संकल्पनेभोवती केंद्रित आहे. त्यामुळे निसर्गाचे घटकांचे त्यांच्या चित्रकलेद्वारा चित्रित केले जाते. वारली चित्रकलेत शेती हा त्यांचा मुख्य जीवन मार्ग दाखविण्यात येतो. या जमातीसाठी शेती करून अन्नधान्य मिळवून जगणे हा जगण्याचा मुख्य स्रोत आहे. ते निसर्ग आणि वन्यजीव जीवनासाठी प्रदान केलेल्या संसाधनांचा खूप आदर करतात. वारली कलाकार त्यांच्या पेंटिंगसाठी पार्श्वभूमी म्हणून त्यांच्या मातीच्या झोपड्यांचा वापर करतात.
वारली चित्रे काढण्यात स्त्रियांचा पुढाकार असतो.
वारली जमाती मध्ये अनेक विधींमध्ये देवदेवतांची चित्रे काढणे ही परंपरा असते. तेपानास आदिवासींच्या झोपडय़ांमधील कारवींच्या विणलेल्या आणि शेणाने लिंपलेल्या कुडावर निसर्गातील अनेक घटकांवर पशु पक्षी, देवदेवता, इत्यादीची चित्रे रेखाटलेली दिसून येते. ही चित्रे काढण्यात स्त्रियांचा पुढाकार असतो.
लाल गेरूच्या भिंतींवर पांढऱ्या रंगात रंगवलेल्या निरागस वारली आकृत्या पहिल्या कलेचा अप्रतिम नमुना बारकाईने पाहणाऱ्यांना जाणवल्याशिवाय राहत नाही.
वारली चित्रकला यातून वारली यांचे जीवन दर्शन घडविले जाते.
हा केवळ एक कला प्रकार नाही, तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरील पर्वत आणि किनारी प्रदेशातील वारली जमातींसाठी जीवनाचा दर्शनाचा एक मार्ग आहे. ही कला वारली जमातीमध्ये लग्न, बारसे, पूजापाठादी अनेक संस्कार यामध्ये श्रद्धेने पाळले जातात.
1) आदिवासी संस्कृतीतील तारपा नृत्य,
2) शिकारीची दृश्ये आणि इतर
3) लग्न विधी, मांडव,
4) फुलांचे गुंतागुंतीचे भौमितिक नमुने,
5) जंगल व वारली जमाती यांचा येणारा संपर्क, उपासना
यावरील चित्रे त्रिकोण-त्रिकोणातून वारली मध्ये अनेक प्रतिमा साकारल्या जातात.
गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतील लोकांच्या या कलेशी निश्चितच एक भावना जोडलेली आहे, कारण आधुनिक जीवनशैली उत्पादनांवर लोकप्रिय होण्यापूर्वी त्यांनी ग्रामीण शाळा आणि घरांच्या भिंतींवर ती पाहिली आहे. साध्या, परंतु सुंदर नाजूक नमुन्यांमध्ये त्यांच्याबद्दल एक विशिष्ट अपील आहे.
वारली पेंटिंग हे अलीकडे रोजच्या दैनदिन जीवनातील विविध वस्तूंवर ( कप, बाग, पिशवी इत्यादी ), फॅशन डिझायनर्स आणि होम डेकोर ब्रँड्समध्ये खूप लोकप्रिय आहेत.
फॅब्रिक्स, घराची सजावट किंवा इतर कलात्मक प्रकारांवर या कलात्मक आकृतिबंधांची प्रतिकृती तयार करण्यासाठी विविध रंगांचा वापर केला जात आहे.
आज वारली पेंटिंग्ज हा चित्रप्रकार जगभर प्रसिद्ध आहे. ही पेंटिंग्ज आज अनेक उच्चभ्रू हॉटेल्स, सार्वजनिक ठिकाणी आणि कार्यालयांमध्ये अभिमानाने व कौतुकाने लावली जात आहेत.
ही एक कला नसून निसर्गपूरक जगण्याचा संदेश देणारे तत्वज्ञान आहे.
वारली कला काही प्रमाणात आपल्याला पर्यावरणाविषयी जागरूक राहण्याचा आणि जीवनातील साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा विचार करते. वारली लोक साधे जीवन जगतात. पूर्वी, ते निसर्गाची उपासना करत होते आणि अन्न आणि दैनंदिन जीवनासाठी निसर्गावर अवलंबून होते. निसर्गाला बाधा आणणे किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त घेणे यावर त्यांचा विश्वास नव्हता. वारली लोक निसर्ग आणि माणूस यांच्यातील सुसंवादावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या चित्रांमध्ये या विश्वासाचे प्रतिबिंब अनेकदा दिसून येते.
ही विचारांची रेलचेल आज आपल्या जीवनातही खरी आहे. अनेक शहरी लोक आता शक्य असेल तेव्हा तंत्रज्ञानापासून दूर राहून, स्वच्छ खाणे, हातकौशल्य युक्त गोष्टी स्वीकारणे आणि प्राचीन रूढी आणि परंपरांमागील विज्ञान जवळून पाहणे याद्वारे किमान जीवनशैली स्वीकारत आहेत. त्यामुळे, वारली सारख्या पारंपारिक कलाप्रकार आपल्या समाजात परत येण्यासाठी जीवनातील साध्या सुखांची आठवण करून देत आहेत.
सध्या आपल्यापुढे ही कला जिवंत ठेवण्याचे आव्हान आहे.
अनेक कार्यकर्ते वारली कला जिवंत ठेवण्याचे काम करीत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यत ही कला पोचविण्याचे काम सुरु आहे. आजच्या धकाधकीच्या जगात नम्रता हा गुण जरा दुर्मिळच आहे. परंतु वारली कला प्रकार त्या पात्र आहे. त्यामुळे, हाताने रंगवलेल्या वारली वस्तूंची खरेदी आणि जाहिरात करणे ही या एक प्रकारे कलाकृतीला योग्य न्याय देण्यासारखे वाटते.