जाती | What is Caste | जातीव्यवस्था म्हणजे काय
जाती किंवा जातिव्यवस्था हे भारतीय समाजाचे एक खास वैशिष्ट्य मानले जाते. हजारो वर्षापासून असलेली ही व्यवस्था आपल्या समाजात अस्तित्वात आहे. जातीच्या आधारावर भारतीय समाजात अनेक श्रेष्ठ -कनिष्ठ स्तर निर्माण झाले आहेत.जातीचे सदस्यत्व व्यक्तीला जन्माने प्राप्त होते आणि ते मरेपर्यंत व्यक्तीला आपली जात बदलता येत नाही. व्यक्ती जरी जात मानत नसला तरी समाज त्याला त्यांच्या जातीच्या स्थानावरून ओळख देतो.
जाति-व्यवस्था हा बंद स्तरीकरणाचा ( Closed stralification ) प्रकार आहे.
व्यक्तीला आपली जात व जातीमुळे प्राप्त होणारा समाजातील दर्जा बदलता येत नसल्याने जाति-व्यवस्था हा बंद स्तरीकरणाचा ( Closed stralification ) प्रकार होय.
जातिव्यवस्था हिंदू धर्माशी निगडित असली तरी भारतातील मुसलमान, जैन या इतर धर्मीयांतही जाती उपजाती दिसून येतात. एकंदर भारतीय समाजव्यवस्थेवर जातिव्यवस्थेचा प्रचंड प्रभाव दिसून येतो . जातिव्यवस्थेचे पारंपरिक स्वरूप बदलत चालले असले तरी जातिव्यवस्था मात्र अजूनही टिकून आहे.
जात म्हणजे काय | What is Caste | Definition of Caste | जातीची व्याख्या
मुजुमदार आणि मदन यांनी केलेली जातीची व्याख्या
“जाती म्हणजे एक बंद वर्ग होय” (Caste is a closed class )
डॉ . इरावती कर्वे यांनी केलेली जाती ची व्याख्या
“जाती म्हणजे एक विस्तारित कुटुंब होय” (Caste is an extended family)
ड्रेसलर आणि विलीस यांनी केलेली जाती ची व्याख्या
“जन्माच्या वेळी प्राप्त झालेल्या दर्जापेक्षा उच्च सामाजिक दर्जा वा स्थान मिळविण्यास प्रतिबंध करणारी दर्जा – संबंधांची व्यवस्था म्हणजे जाति – व्यवस्था होय.”
( A caste system is an arrangement of status relationship that prevents people from achieving higher status or social position than was accorded them at birth .”)
जाती ची वैशिष्ट्ये/ characteristics of caste
सुप्रसिद्ध संशोधक डॉ. गो. स. घुर्ये यांनी जाति व्यवस्थेचे संशोधन केलेले आहे. त्यांच्या मतानुसार की जात ही इतकी गुंतागुंतीची बाब आहे की, तिची सुस्पष्ट व्याख्या करणे कठीण आहे. म्हणूनच त्यांनी जात -व्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये त्यांनी त्यांच्या ‘Caste, Class and Occupation’ या पुस्तकात सांगितले आहेत.त्यांनी हे स्पष्ट केले की जात ही स्तरीकरणाचा एक बंद प्रकार आहे.
1.समाजाचे खंडात्मक विभाजन ( Segmental Division of Society )
2. श्रेणी रचना ( Hierarchy )
3.सामाजिक संबंधावर नियंत्रण ( Control on Social relationship )
4.धार्मिक बंधने ( Restrictions of religion )
5.व्यवसाय निवडीवर मर्यादा (Limitations on selection of occupation)
6.आतंर विवाही गट ( Endogamous groups )
If you’re interested in exploring this concept in English, please watch the video below.