समाजशास्त्राचा अभ्यासविषय | Subject matter of Sociology
समाजशास्त्राचा उदय १९ शतकात झाला आहे. समाजशास्त्र हा एक विषय आहे, जसे इतर विषय इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र व मानववंशशास्त्र इत्यादी. या विषयामध्ये वेगवेगळे त्यांच्या विषयाशी संबधित घटकांचा अभ्यास केला जातो. समाजशास्त्रकडे सामाजिक शास्त्रामधील एक विद्याशाखा म्हणून ही त्यांच्याकडे पहिले जाते. चला तर जाणून घेऊयात समाजशास्त्राचा अभ्यासविषय.
समाजशास्त्राचा अभ्यासविषय | Subject matter of Sociology
समाजशास्त्र हे …… करते. | Sociology is…….. |
समाजाचा अभ्यास | the study of society |
सामाजिक जीवनाचा अभ्यास | the study of social life |
सामाजिक संस्थांचा अभ्यास | the study of social institutions |
सामाजिक संबंधांचा अभ्यास | the study of social relationships |
समूहातील मानवी वर्तनाचा अभ्यास | the study of human behaviour in groups |
सामाजिक क्रिया वअंतरक्रियांचा अभ्यास | the study of social action & interaction |
सामाजिक समूह आणि सामाजिक व्यवस्था यांचा अभ्यास | the study of social groups and social systems |
समग्र समाजाचा अभ्यास | the study of society as a whole |
समाजशास्त्र हे समाजाचा अभ्यास करते | Sociology is the study of society
समाजशास्त्र हे समाजाच्या प्रकारांचे अभ्यास करते. प्रत्येक समाजात असणाऱ्या व्यवस्थांचा अभ्यास करते. उदा. पशुपालक समाज, शेती करणारा समाज, औद्योगिक समाज इत्यादी.
समाजशास्त्र हे सामाजिक मानवी जीवनाचा अभ्यास करते | Sociology is the study of human social life
मानवाचे सामाजिक जीवन हे समूहात व्यतीत होते. मानवाला संस्कृती असते. ही संस्कृती त्याला दिशा देण्याचे कार्य करते. मानवाने तयार केलेल्या दृश्य व अदृश्य अश्या सर्व गोष्टींचा समावेश संस्कृतीमध्ये होतो. अश्या सर्व घटकांचा अभ्यास समाजशास्त्रात होतो.
समाजशास्त्र हे सामाजिक संस्थांचा अभ्यास करते | Sociology is the study of social institutions
समाजाच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी सामाजिक संस्थाची निर्मिती झालेलि असते. उदा. कुटुंब संस्था ( family ), विवाह संस्था (marriage) , राज्य संस्था (Polity), अर्थ संस्था ( Economy ), धर्म संस्था (Religion ), शिक्षण संस्था ( Education) कायदा (Law), प्रसारमाध्यमे( Media ) इत्यादी. अश्या सामाजिक संस्थांचा अभ्यास समाजशास्त्र करते. व्यक्ती व सामाजिक संस्था, समूहा आणि सामाजिक संस्था यांच्यातील सामाजिक संबंधाचा अभ्यास समाजशास्त्र करते.
समाजशास्त्र हे सामाजिक संबंधांचा अभ्यास करते | Sociology is the study of social relationships
समाज म्हणजे सामाजिक संबंधाचे जाळे होय. आपणास माहितीच आहे की सामाजिक संबंध हे व्यक्ती-व्यक्ती, व्यक्ती-समूह आणि समूह-समूहामध्ये आढळून येतो. त्याचबरोबर समाजाने निर्माण केलेल्या विविध घटकांसोबत व व्यवस्थांसोबत ही संबंध येतो. या सर्वांचा अभ्यास समाजशास्त्रात केला जातो.
समाजशास्त्र हे समूहातील मानवी वर्तनाचा अभ्यास करते | Sociology is the study of human behaviour in groups
व्यक्तीकडून किंवा समूहाकडून सातत्याने विशिष्ठ प्रकारचे वर्तन होत असते. हे वर्तन का होते त्यांच्या मुळाशी जाऊन समाजशास्त्र अभ्यास करते.
समाजशास्त्र हे सामाजिक क्रिया व अंतरक्रियांचा अभ्यास करते |Sociology is the study of social action & interaction
व्यक्तीकडून होणाऱ्या विविध कृती आणि वर्तन होत असते. व्यक्ती-व्यक्ती, व्यक्ती-समूह आणि समूह-समूहामध्ये सातत्याने क्रिया व आंतरक्रिया घडत असतात. अश्या सामाजिक क्रिया व अंतरक्रियांचा अभ्यास समाजशास्त्रात केला जातो.
समाजशास्त्र हे सामाजिक समूह आणि सामाजिक व्यवस्था यांचा अभ्यास करते | Sociology is the study of social groups and social systems
माणूस जन्मापासून मृत्यू हा समुहातच राहत असतो. माणूस हा समूहशील प्राणी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. काही समूह हे आकाराने लहान असतात जसे की कुटुंब, मैत्री, बाल सवंगड्यांचा गट इत्यादी यांना आपण प्राथमिक समूह म्हणतो. तर काही हे आकाराने मोठे असतात. जसे की शाळा, राजकीय पक्ष इत्यादी यांना आपण दुय्यम समूह असे म्हणतात.
माणसाचे जीवन सुकर व्हावे, समाज गाडा व्यवस्थित चालवा यासाठी विविध सामाजिक व्यवस्था तयार केलेल्या केलेल्या असतात. कुटुंब, शाळा इत्यादी.
समाजशास्त्र हे समग्र समाजाचा अभ्यास करते | Sociology is the study of society as a whole
संपूर्ण समाज एक व्यवस्था मानून समाजाचे अभ्यास केला जातो. मानवी जीवन प्रभावित करणाऱ्या सर्व घटकांचा अभ्यास समाजशास्त्रात केला जातो.
If you’re interested in delving deeper into the subject matter of sociology, you can watch our informative video here
वरील पोस्ट संदर्भातील मागील पोस्ट येथे वाचा :- समाजशास्त्राचे स्वरूप | Nature of Sociology
हेही वाचा :- समाजशास्त्रीय कल्पनाशक्ती काय आहे | What is Sociological Imagination