
अर्थसंस्था म्हणजे काय | Economy as Social institution
मनुष्याला जगण्यासाठी काम करावे लागते. अश्या कराव्या लागणाऱ्या सर्व प्रकारच्या कामाचा समावेश हे अर्थसंस्था अथवा अर्थव्यवस्था यामध्ये होतो. समाजाला जगण्याचे साधन उपलब्ध करून देण्याचे काम मात्र अर्थसंस्था करीत असते. यामध्ये वस्तू व सेवा यांचे उत्पादन, वितरण, विनिमय व उपभोग दरम्यान अर्थार्जन उपलब्ध करून देणाऱ्या सर्व गोष्टीनाचा इत्यादींचा समावेश होतो. प्रत्येक व्यक्ती उत्पादन, वितरण, विनिमय व उपभोग या पैकीच्या एका किंवा त्यापेक्षा जास्त प्रक्रियेत गुंतलेला असतो व अर्थार्जन करीत असतो.

अर्थव्यवस्था मध्ये वस्तू व सेवा यांचे उत्पादन, वितरण, विनिमय व उपभोग
उदाहरणाच्या आधारे आपण अर्थ संस्था समजून घेऊयात.
तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे पण लोक राहतात, ते काय काम करतात याची एक यादी करा. मी माझ्या शेजारी राहणारे लोक काय काम करतात याची यादी केली. एक व्यक्ती सामजिक संस्थेत काम करतो. दुसरा हाऊसकीपिंग कंपनी चालवतो. एक कुटुंब शेती करतोय. एक भारत फोर्ज कंपनीत काम करतोय. एक व्यक्ती कडे स्वतःचा टेम्म्पो आहेत. एक व्यक्ती लाकडापासून विविध वस्तू तयार करतो. एक मुलगी D-Mart मध्ये काम करते.
वरील कामे करणाऱ्या व्यक्तींना आपण दोन प्रकारात विभागता येईल. एक म्हणजे वस्तूच्या उत्पादन प्रक्रियेत गुंतलेल्या व्यक्ती. ज्यामध्ये शेती करणार कुटुंब, भारत फोर्ज कंपनीत काम करणारी व्यक्ती, लाकडापासून विविध वस्तू तयार करणारी व्यक्ती इत्यादी आणि
दुसरे म्हणजे सेवा पुरविणाऱ्या प्रक्रियेत गुंतलेल्या व्यक्ती. ज्यामध्ये सामजिक संस्थेत काम करणारी, हाऊसकीपिंग कंपनी चालवणारी, स्वतःचा टेम्म्पो असलेली आणि D-Mart मध्ये काम करणारी मुलगी हे सर्व व्यक्ती सेवा क्षेत्रात काम करतात.
अर्थसंस्था किंवा अर्थव्यवस्था हि एक मुलभूत सामाजिक संस्था
जगामध्ये वस्तू व सेवा यांचे उत्पादन, वितरण, विनिमय व उपभोग या साखळीत व्यक्ती काम करून अर्थव्यवस्थेचा भाग असतात. अर्थव्यवस्था ही एक सामाजिक संस्था आहे जी वस्तू आणि सेवांचे उत्पादन आणि वितरण करून समाज सदस्यांची विविध गरजांची पूर्ती करते म्हणून अर्थसंस्था किंवा अर्थव्यवस्था हि एक मुलभूत सामाजिक संस्था आहे.
अर्थसंस्थेचा इतिहास
आर्थिक संरचना हजारो वर्षांच्या सामाजिक बदलांचे परिणाम आहेत. मानवी उत्क्रांतीच्या विविध टप्प्यावर ती बनत आलेली असते. प्रत्येक मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यावर समाजाच्या जीवन जगण्याच्या आधारावर आर्थिक संरचना किंवा अर्थव्यवस्था हि तयार झालेली आपणास दिसून येईल.
1) शिकार आणि अन्न गोळा करणे यावर आधारित अर्थव्यवस्था
2) पशुपालन केंद्रित अर्थव्यवस्था
3) बागायती शेतीप्रधान अर्थव्यवस्था
4) शेतीप्रधान अर्थव्यवस्था
5) औद्योगिक उत्पादन आधारित भांडवलशाही अर्थव्यवस्था
6) औद्योगिकोत्तर सेवाप्रधान भांडवलशाही अर्थव्यवस्था
अर्थसंस्थेचे नमुने | मॉडेल्स | Economy models / systems:
1) भांडवलशाही अर्थव्यवस्था | Capitalism / capitalist Economy
2) समाजवादी अर्थव्यवस्था | Socialism / Socialist Economy
3) मिश्र अर्थव्यवस्था| Mixed economy
4) उदारमतवादी किंवा नव उदार अर्थव्यवस्था | Neo liberal Economy
भांडवलशाही | Capitalism
भांडवलशाही ही एक आर्थिक व्यवस्था आहे ज्यामध्ये नैसर्गिक संसाधने आणि वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची साधने खाजगी मालकीची (resources and means of production are privately owned) असतात. या व्यवस्थामध्ये लोकांना व नागरिकांना स्वतःसाठी नफा मिळविण्यासाठी प्रोत्साहित केले जाते आणि एखाद्या एंटरप्राइझचे यश किंवा अपयश हे मुक्त- बाजारातील स्पर्धेद्वारे (free-market competition ) निर्धारित केले जाते.
उदाहरण: अमेरिका (US) जगातील सर्वात शुद्ध भांडवलशाही समाजांपैकी एक आहे. तेथील बहुतांश व्यवसाय खाजगी मालकीचे आहेत, परंतु सरकार हे व्यवसाय करण्याबाबतचे फक्त नियम व कायदा करते.
आदर्श भांडवलशाही अर्थव्यवस्थेची तीन विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत:
- मालमत्तेची खाजगी मालकी
- वैयक्तिक नफा मिळवण्याचा प्रयत्न.
- स्पर्धा आणि ग्राहक निवड करण्याची संधी
खरे तर ग्राहक मुक्त-मार्केट अर्थव्यवस्थेचे नियमन करतात. म्हणून ग्राहक देवो भाव! Costumer is God असे म्हणतात. भांडवलशाही व्यवस्थेतील न्याय म्हणजे बाजारपेठेतील स्वातंत्र्य हे खूप महत्वाचे आहे असते. खुल्या बाजारामुळे स्पर्धा वाढते. मागणी व पुरवठा नुसार ही व्यवस्था काम करते.
भांडवलशाहीचा परिणाम
- समाज अधिक उत्पादनशील बनतो.
- एकूण व्यक्तीचे जीवनमान उंचावते
- मोठ्याप्रमाणात उत्पन्न विषमता किंवा असमानता निर्माण होते
- स्व इच्छेनुसार वागण्याचे स्वातंत्र्य मिळते
- उदा. USA, UK EU देश
Aapan atishay sopya bhashet arth vyavastha kay aaste te sangitlyabaddal dhanyawad.