जीवन जगण्याचा अधिकार | Right to Life
जीवन जगण्याचा अधिकार हा संविधानातील अतिशय महत्वाचा अधिकार आहे. कलम २१ नुसार हे मुलभूत हक्क भारतीय नागरिकांना देण्यात आले आहे. कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या प्राणापासून वंचित ठेवले जाणारे. यामुळे आमरण उपोषण, आत्महत्या, या सारख्या गोष्टींचा विरोध केला जातो. या अधिकारानुसार जगण्यासाठी स्वच्छ वातावरण, व्यक्तींची प्रतिष्ठा यांना ही मान्यता देण्यात आले आहे.
मानवी हक्क कलम-3 नुसार
मानवी हक्कांचा जाहीरनामातील मानवी हक्क कलम-3 नुसार प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा, स्वातंत्र्य उपभोगण्याचा व सुरक्षित असण्याचा हक्क-अधिकार आहे.
कलम २१ – जीवन जगण्याचा अधिकार मुलभूत हक्क
- या कलाम नुसार सरकार तुमच्या जगण्याच्या अधिकाराचे रक्षण करते.
- याचा अर्थ सरकारसह कोणीही तुमचे जीवन संपवण्याचा प्रयत्न करू शकत नाही.
- नागरिकत्वाच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी सरकार विविध कायदे करते.
- काही परिस्थितींमध्ये व्यक्तीच्या जीवाला धोका असल्यास त्यांच्या संरक्षण करण्यासाठी पावले उचलून जीवनाचे रक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत.
भारतीय नागरिकांच्या या हक्कांचे रक्षण करण्यासाठी खालील घटकांची सुनिश्चिता करण्यात आली आहे.
- देशातील वंचित आणि गरीब लोकांना अन्न सुरक्षा प्रदान केली जाते.
- उपजीविका व रोजगाराचा लोकांना देण्याची तरतूद करण्यात येते. या करिता महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरु केली आहे.
- आरोग्याचा अधिकार या हक्कांअंतर्गत शाश्वती देण्यात आली आहे. यासाठी आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजना
- न्याय मिळविण्याचा अधिकार लोकांना मोफत विधी सेवा देण्याच्या उद्देशाने विधी प्राधिकरण सेवा तालुका, जिल्हा, राज्य आणि देश पातळीवर सुरु करण्यात आली आहे.
- करमणुकीचा मुद्दा, राहत्या घरांचा प्रश्न पिण्याच्या पाणी मिळणे या ही गोष्टींचा समावेश जीवन जगण्याचा अधिकार मध्ये येतो.
कलम – 21 अ प्राथमिक शिक्षणाचा अधिकार
सन 2002 साली 86 व्या घटना दुरुस्तीनुसार हे कलम जीवन जगण्याच्या अधिकाराशी जोडण्यात आले आहे. या अधिकारानुसार 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. खाजगी शाळांमध्ये 25% वंचित गटांतील मुलांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे.
इतर मुलभूत हक्क वाचण्यासाठी पुढील लिंकवर जावून वाचा:- मुलभूत हक्क | हक्क म्हणजे काय | fundamental rights