नमस्ते विद्यार्थी पहिल्यांदाच FAQ फॉर्म मध्ये समाज या घटकावर प्रश्न व उत्तरे एकाचवेळी दाखविण्यचा प्रयत्न केला आहे. जर आपणास हे आवडले तर नक्कीच खाली कमेंट बॉक्स मध्ये कळवा. जेणेकरून अधिक सुधारणा करण्यासाठी तुमच्या कमेंटची आवश्यकता आहे. मागील पोस्ट मध्ये सुद्धा हीच प्रश्ने व उत्तरे आहे. त्यामुळे कदाचित आपणास थोडे गोंधळल्यासारखे वाटू शकते. तुम्हांला जे योग्य वाटते ते स्वीकारा.
२०२२ -२३ या सत्रातील पुणे विद्यापीठाच्या परीक्षा होणार descriptive पद्धतीने
सगळ्यांना माहिती आहेच की, पुणे विद्यापीठाच्या डिसेंबर -22 पासून परीक्षा सुरु होणार आहे. जसे की आपणास कळविल्याप्रमाणे विद्यापीठाच्या परीक्षा या descriptive पद्धतीने होणार आहे. प्रत्येक विषयाच्या पेपरचा एक pattern असणार आहे. समाजशास्त्र विषयाचे पेपर pattern आधीच शेयर केले आहे. पहिले पहिले नसल्यास पुढील लिंक वर जाऊन 70 मार्कच्या पेपरचा pattern पहा.
कोणत्याही विषयाची लघु आणि दीर्घ उत्तरी प्रश्नांच्या उत्तरांची तयारी कशी कराल.
- सर्वात प्रथम परीक्षेच्या पेपरचा pattern समजून घेणे. या साठी दोन पर्याय आहेत. एक तुमच्या शिक्षकांना विचारून घ्या. अन्यथा विद्यापीठाच्या संकेतस्थळवर जाऊन पाहू शकता.
- परीक्षेला एकून किती प्रश्न येणारे आहेत. उदा. आपणास आता माहिती झाले असेल की समाजशास्त्र विषयाच्या पेपरला एकूण चार मुख्य प्रश्न असणार आहेत. ( पहिला प्रश्न 15 मार्कला 5 मार्कला एक प्रश्न, लिहायचे फक्त 3 विचारणार एकूण 5 प्रश्ने, दुसरा प्रश्न 15, मार्कला 5 मार्कला एक प्रश्न, लिहायचे फक्त 3 विचारणार एकूण 5 प्रश्ने, तिसरा प्रश्न 20 मार्कला, 10 मार्कला एक प्रश्न, लिहायचे फक्त 2, विचारणार एकूण 4 प्रश्ने, आणि शेवटचा मुख्य प्रश्न चौथा प्रश्न 20 मार्कला, 20 मार्कला एक प्रश्न, लिहायचे फक्त 1, विचारणार एकूण 2 प्रश्ने,)
- पेपर मधील प्रश्नाचा नमुना समजल्यावर तुम्हांला प्रत्येक प्रश्न प्रकारातील प्रश्नांचे उत्तरे कसे लिहावे यांची लिहून सराव करावा लागेल.
- descriptive पद्धतीने परीक्षा देताना लेखन करण्याचे सराव करणे खूप गरजेचे आहे.
तुम्ही खाली दिलेले प्रश्ने व त्यांची उत्तरे एक वहीत लिहून काढा. शक्य झाले तर पुन्हा पुन्हा असे करा. तुमचा चांगला सराव होईल आणि पूर्ण आत्मविश्वासाने तुम्ही नक्कीच परीक्षा द्याल.
समाज या समाजशास्त्रीय संकल्पना या वरील सर्व 5, 10 आणि 20 मार्कला येणारे प्रश्ने व उत्तरे
उत्तर -> समाज ही सामाजिक संबंधांची व्यवस्था आहे. व्यक्ति – व्यक्तीत, व्यक्ति समूहात आणि समूहा – समूहात स्थिर स्वरूपी सामाजिक संबंध निर्माण होऊन त्यांची एक व्यवस्था बनते. ही एक अमूर्त संकल्पना आहे.
समाज यांची व्याख्या
मॅकायव्हर आणि पेज यांच्या मते “समाज म्हणजे सामाजिक संबंधांचे जाळे होय".
राईट – “केवळ लोकांचा समूह म्हणजे समाज नव्हे, तर समूहातील व्यक्तींमध्ये असणारी संबंधाची व्यवस्था म्हणजे समाज होय.”
समाजाची काही वैशिष्ठ्ये आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील.
1) समाजाला स्वत:ची अशी संस्कृती असते.
2) समाज सापेक्षतः विशाल किंवा व्यापक असा समूह होय.
3) समाजाला निश्चित असा भूप्रदेश असतो.
4) समाजाच्या काही गरजा असतात.
5) समाजाच्या गरजा भागविण्याच्या यंत्रणा समाजाने निर्माण केलेल्या असल्याने समाज सापेक्षतः स्वयंपूर्ण असतो.
6) समाज स्वयंसातत्यशील असतो म्हणजेच पिढ्यान् पिढ्या स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची क्षमता त्यात असते.
7) समाजातील सदस्यांत एकतेची भावना असते.
उत्तर -> मानवी उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यातील मानवी समाजाचे जगण्याचे मुख्य साधन व त्या संबंधित असलेले त्यांचे आर्थिक जीवन यांच्या आधारावर समाजाचे खालील सहा प्रकार पडतात.
ते पुढील प्रमाण आहेत.
1) शिकार आणि अन्न संकलन करणारा समाज
2) बागायती समाज
3) पशुपालक समाज
4) शेती व्यवसाय करणारा समाज
5) औद्योगिक समाज
6) औद्योगिकोत्तर समाज
उत्तर -> शिकार आणि अन्न संकलन करणारा समाज हा एक समाजाचा पहिला प्रकार आहे. या समाजाचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे शिकार करणे व जंगलातील अन्नावर अवलंबून होते. जंगलावर आधारित या समाजाचे जीवन होते, आकाराने आणि समूहाने हा समाज लहान होता. त्यांच्या संपूर्ण गरजा या जंगलातून भागविल्या जात होते. फळे, फुले, कंदमुळे, मध अश्या इतर गोष्टीतून त्यांच्या दैनंदिन गरजा भागात होत्या. खूप प्राचीन काळी मानवी उत्क्रांती टप्प्यात हा समाज अस्तित्वात होता. आज ही आफ्रिका आणि अमेझानच्या घनदाट जंगलात असा समाज आढळतो.
उत्तर -> पशुपालक समाज हा समाजाचा तिसरा प्रकार आहे. समाज हा पशुपालन आणि पशुसंवर्धन करून उदरनिर्वाह करीत असे. पशुपालन द्वारे या समाजाच्या सर्व मुलभूत गरजा या भागविल्या जात होत्या. हा समाज प्राण्यापासून मिळणाऱ्या दुध मिळते, मास, रक्त, केस, हाडे , कातडी इत्यादी पदार्थ खावून जगत होता. मास, रक्त, पोष्टिक अन्न म्हणून तो ग्रहण करीत होता. केस आणि कातडी यापासून तो थंडी पासून आपला बचाव करित आलेला आहे. शेणाचा उपयोग शेतीमध्ये करून जास्तीचे उत्पन्न तो घेत होता. प्राण्यांचा हाडांचा वापर सौंदर्य प्रसाधने आणि शिकारीसाठी हत्यारे यासाठी करीत होता. जनावरासाठी चार आणि पाणी असणाऱ्या भू-प्रदेशात हा समाजात मोठ्या प्रमाणात आढळत होता.
उत्तर -> हा समाजाचा दुसरा प्रकार आहे. बागायती समाजाचा शोध हा स्त्रियांनी लावला असे म्हणतात. या समाजामध्ये मानवी शक्तीचा आणि हाताने वापरायच्या साधनांचा वापर करून लोक हे बागा आणि शेती तयार करून जगत होते म्हणून या समाजाला बागायती समजा असे म्हणतात.या प्रकारच्या समाजात फक्त गरजे पुरतेच उत्पादन घेतले जात होते. फक्त आपल्या समूहाच्या भागविण्यापुरते अन्न गोळा या समाजात केले जात होते.
उत्तर -> शेती व्यवसाय करणारा समाज हा समाजाचा चौथा प्रकार आहे. हा समाज शेतीसाठी मानवी शक्ती तर वापर करीत होताच पण तो जोडीला प्राणी शक्तीचा वापर करून विविध साधनांचा जसे की नगरांचा उपयोग करून शेती करणाऱ्या समाजाला शेती व्यवसाय करणारे समाज असे म्हणतात. साधारणपणे हा समाज नदीच्या कडेला राहत होता. जेणेकरून पिकांना पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने. शेती करणाऱ्या समाजात जास्तीचे उत्पादन करून लोक विकत होते. नदीच्या किनाऱ्यावर मोठ्याप्रमाणात लोकांचे संघटन झाले. कालांतराने मोठी मोठी शहरे व बाजारपेठा निर्माण झाल्या. या समाजाच्या काळात समाजाचे संरक्षण करिता मिलिटरी ( सैन्यबळ ) उदय झाला होता.
उत्तर -> औद्योगिक समाज हा समाजाचा पाचवा प्रकार आहे. या प्रकारच्या समाजामध्ये वस्तूच्या उत्पादनासाठी यंत्राचा, विविध तंत्रांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर कारखाना उत्पादन पद्धतीद्वारे वस्तूंचे उत्पादन होऊ लागले. खास करून हा समाज औद्योगिक क्रांतीनंतर जगभरामध्ये उदयास आला असलेला दिसून येतो. या समाजात अकृषी उद्योगांचे प्रमाणे वाढले. या समाजात लोकशाही सरकारे उदयास आली आणि भांडवलशाही व्यवस्थेचा उदय झाला. खाजगी मालमत्तेला महत्व आले. कारखानदारी हा अर्थव्यवस्थेचा कणा बनला.
उत्तर -> औद्योगिकोत्तर समाज हा समाजाचा सहावा प्रकार आहे. या समाजाला नवउदार समाज असेही म्हटले जाते. या समाजामध्ये संपूर्ण जग ही बाजारपेठ समजली जाते.आणि मुक्त व्यापाराला प्रोत्साहन दिले जाते. म्हणून मुक्त समाज open soceityअसे म्हणतात. या समाजातील अर्थव्यवस्था सेवाभिमुखी असते . जागतिकीकरणा नंतर हा समाज उदयास आले आहे. भारतात राज्यांच्या राजधानी आणि मेट्रो शहरात अश्या स्वरूपाची अर्थव्यवस्था आढळते. लोकांना घर बसल्या सर्व सुविधा घरी बसल्या मिळतात. Zomato, amazon, Google आणि इतर अश्या अनेक कंपन्या संपूर्ण देशाला व जगभरात त्यांच्या विविध सेवा पुरवितात.विशेष करून हा समाज तंत्रज्ञानात्मक प्रगतीवर अवलंबून आहे.
उत्तर -> समाजाची व्याख्या
“समाज म्हणजे सामाजिक संबंधांचे जाळे होय” अशी समाजाची व्याख्या मॅकायव्हर आणि पेज यांनी केली आहे.
समाजाची वैशिष्ठ्ये
1) समाज सामाजिक संबंधाची व्यवस्था आहे
2) समाजाला निश्चित भू-प्रदेश असतो.
3) समाजाला सर्वसमावेशक / व्यापक अशी संस्कृती असते.
4) समाजात सातत्य असते. कधी नष्ट होत नाही.
5) समाज ही एक अमूर्त संकल्पना आहे.
6) समाज हा परस्परवलंबन आणि सहकार्य यावर आधारित असतो
7) समाजाच्या काही गरजा असतात.
8) समाज हा व्यापक मानवी समूह आहे.
9) समाजात एकतेची भावना. असे आपलेपणाची भावना असते.
प्रत्येक मुद्द्यांचे थोडक्यात स्पष्टीकरण खालीलप्रमाणे.
1) समाज सामाजिक संबंधाची व्यवस्था आहे.
सामाजिक आंतरक्रिया यांच्यामुळे व्यक्ती आणि समूहात स्थिर असे सामाजिक संबंध निर्माण होतात. त्यातून सामाजिक संबंधांचे व्यवस्था बनते. .
2) समाजाला निश्चित भू-प्रदेश असतो.
समाज हा हवेत असू शकत नाही, त्यांचे भौगोलिक स्थान, प्रदेश यावर त्यांचे अस्तित्व अवलंबून असते. भौतिक पर्यावरणाचा त्यांच्यावर समाजावर परिणाम होतो.
3) समाजाला सर्वसमावेशक / व्यापक अशी संस्कृती असते.
प्रत्येक समाजाला स्वःताची अशी संस्कृती असते. संस्कृती नसलेला समाज हा शोधून ही सापडणार नाही. . प्रत्येक समाजाची संस्कृती ही वेगळी असते. संस्कृतीमुळे समाज हा टिकून राहतो.
4) समाजात सातत्य असते. समाज हे कधी नष्ट होत नाही.
समाजाचे जे सदस्य मरण पावतात व त्यांची जागा हे नवीन जन्माला आलेले सदस्य घेतात. त्यामुळे समाजाचे सातत्य हे टिकून राहते. नवीन येणाऱ्या पिढीवर समाजाचे सातत्य अवलंबून असते.
5) समाज ही एक अमूर्त संकल्पना आहे.
समाज हा अमूर्त असतो. तो डोळ्यांनी दिसत नाही. मात्र ते सामाजिक संबंध रूपाने अस्तित्वात आहे. जशी व्यक्ती आपण दाखवू शकतो तसे, आपणास सामाजिक संबंध दाखवता येत नाही.
6) समाज हा परस्परवलंबन आणि सहकार्य यावर आधारित असतो.
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. मनुष्य एकटा राहू शकत नाही. तो एकटा राहून त्याच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. म्हणून तो त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमी दुसऱ्यावर अवलंबून असतो. म्हणून समाजातील व्यक्ती या परस्परवलंबन आणि सहकार्य करून जीवन जगतात.
7) समाजाच्या काही गरजा असतात.
माणसाच्या काही मूलभूत गरजा असतात. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि रोजगार या गरजा जर पूर्ण नाही झाल्या, तर व्यक्तीच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित होतो. जश्या मानवाच्या गरजा आहेत. तशा समाजाच्या पण गरजा आहेत. लोकसंख्येचे जतन करणे, समाजातील विविध कामाचे वाटप करणे, सामाजिक ऐक्य व एकात्मता टिकून ठेवणे आणि समाजाचे सातत्य टिकून ठेवणे या समाजाच्या गरजा आहेत.
8) समाज हा व्यापक मानवी समूह आहे. (large human group)
भारतीय समाज जर आपण म्हटलं, तर भारतीय समाज हा हजारो जाती, धर्मांनी व पंथांनी बनलेला हा एक विशाल समूह आहे. तो लहान मोठ्या आकाराच्या समूहांनी व उप समूहांनी मिळून बनलेला आहे.
9) समाजात एकतेची भावना. असे आपलेपणाची भावना असते.
प्रत्येक समाजातील लोकांना आपण एक आहोत असे वाटत असते. आपला समाज इतर राहून निराळा आहे, असे प्रत्येक समाजातील लोकांना वाटत असते. आपण एक आहोत, अशी भावना समाजातील लोकांत प्रबळ असते. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे वाक्य आपल्यातील ऐक्यी व एकतेची भावना दाखवते.
उत्तर -> लाखो वर्षापूर्वीपासून मनुष्य हा पृथ्वीवर अस्तित्वात आहे. मानवी उत्क्रांतीच्या विविध टप्प्यावर तो विकसित होत आलेला आहे. मानवी समाजाचे जगण्याचे मुख्य साधन व त्या संबंधित असलेले त्यांचे आर्थिक जीवन यांच्या आधारावर समाजाचे खालील सहा प्रकार पडतात.
समाजाचे सहा प्रकार
1) शिकार आणि अन्न संकलन करणारा समाज
2) बागायती समाज
3) पशुपालक समाज
4) शेती व्यवसाय करणारा समाज
5) औद्योगिक समाज
6) औद्योगिकोत्तर समाज
प्रत्येक मुद्द्यांचे थोडक्यात स्पष्टीकरण खालीलप्रमाणे
1. शिकार आणि अन्न संकलन करणारा समाज (Hunting and food gathering society)
या समाजाचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे शिकार करणे व जंगलातील अन्नावर अवलंबून होते.
2. बागायती समाज (Horticultural society )
बागायती समाजाचा शोध हा स्त्रियांनी लावला असे म्हणतात.या समाजामध्ये मानवी शक्तीचा आणि हाताने वापरायच्या साधनांचा वापर करून लोक हे बागा आणि शेती तयार करून जगत होते म्हणून या समाजाला बागायती समजा असे म्हणतात.
3. पशुपालक समाज ( Pastoral society )
हा समाज हा पशुपालन आणि पशुसंवर्धन करून उदरनिर्वाह करीत असे. पशुपालन द्वारे या समाजाच्या सर्व मुलभूत गरजा या भागविल्या जात होत्या.
4. शेती व्यवसाय करणारा समाज ( agriculture society )
मानवी शक्ती वापराबरोबर प्राणी शक्तीचा वापर करून विविध साधनांचा जसे की नगरांचा उपयोग करून शेती करणाऱ्या समाजाला शेती व्यवसाय करणारे समाज असे म्हणतात.
5. औद्योगिक समाज ( Industrial society )
या प्रकारच्या समाजामध्ये वस्तूच्या उत्पादनासाठी यंत्राचा, विविध तंत्रांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर कारखाना उत्पादन पद्धतीद्वारे वस्तूंचे उत्पादन होऊ लागले. खास करून हा समाज औद्योगिक क्रांतीनंतर जगभरामध्ये उदयास आला असलेला दिसून येतो. आज भारतीय समाज हा औद्योगिक समाज म्हणून आपण ओळखू शकतो.
6. औद्योगिकोत्तर समाज ( Post -Industrial society )
या समाजाला नवउदार समाज असेही म्हटले जाते. या समाजामध्ये संपूर्ण जग ही बाजारपेठ समजली जाते.आणि मुक्त व्यापाराला प्रोत्साहन दिले जाते. या समाजातील अर्थव्यवस्था सेवाभिमुखी असते . जागतिकीकरणा नंतर हा समाज उदयास आले आहे.
उत्तर -> समाज ही समाजशास्त्रातील एक मुलभूत संकल्पना आहे. समाज ही सामाजिक संबंधांची व्यवस्था आहे. या संबधांच्या व्यवस्थेत व्यक्ती-व्यक्तीमध्ये व्यक्ती - समूहामध्ये आणि समूह –समूहात दीघर्काळ आंतरक्रिया होऊन स्थिर स्वरूपाचे सामाजिक संबंध निर्माण होऊन त्यांची एक व्यवस्था बनते. समाज एक अमूर्त संकल्पना आहे.
समाज यांची व्याख्या
मॅकायव्हर आणि पेज यांच्या मते “समाज म्हणजे सामाजिक संबंधांचे जाळे होय".
राईट – “केवळ लोकांचा समूह म्हणजे समाज नव्हे, तर समूहातील व्यक्तींमध्ये असणारी संबंधाची व्यवस्था म्हणजे समाज होय.”
समाजाची वैशिष्ठ्ये
1) समाज सामाजिक संबंधाची व्यवस्था आहे
2) समाजाला निश्चित भू-प्रदेश असतो.
3) समाजाला सर्वसमावेशक / व्यापक अशी संस्कृती असते.
4) समाजात सातत्य असते. कधी नष्ट होत नाही.
5) समाज ही एक अमूर्त संकल्पना आहे.
6) समाज हा परस्परवलंबन आणि सहकार्य यावर आधारित असतो
7) समाजाच्या काही गरजा असतात.
8) समाज हा व्यापक मानवी समूह आहे.
9) समाजात एकतेची भावना. असे आपलेपणाची भावना असते.
प्रत्येक वैशिष्ठ्य यांचे थोडक्यात स्पष्टीकरण खालीलप्रमाणे. (तुम्ही कोणत्याही पाच वैशिष्ठ्ये लिहण्याचा प्रयत्न करावे )
1) समाज सामाजिक संबंधाची व्यवस्था आहे.
सामाजिक आंतरक्रिया यांच्यामुळे व्यक्ती आणि समूहात स्थिर असे सामाजिक संबंध निर्माण होतात. त्यातून सामाजिक संबंधांचे व्यवस्था बनते. .
2) समाजाला निश्चित भू-प्रदेश असतो.
समाज हा हवेत असू शकत नाही, त्यांचे भौगोलिक स्थान, प्रदेश यावर त्यांचे अस्तित्व अवलंबून असते. भौतिक पर्यावरणाचा त्यांच्यावर समाजावर परिणाम होतो.
3) समाजाला सर्वसमावेशक / व्यापक अशी संस्कृती असते.
प्रत्येक समाजाला स्वःताची अशी संस्कृती असते. संस्कृती नसलेला समाज हा शोधून ही सापडणार नाही. . प्रत्येक समाजाची संस्कृती ही वेगळी असते. संस्कृतीमुळे समाज हा टिकून राहतो.
4) समाजात सातत्य असते. समाज हे कधी नष्ट होत नाही.
समाजाचे जे सदस्य मरण पावतात व त्यांची जागा हे नवीन जन्माला आलेले सदस्य घेतात. त्यामुळे समाजाचे सातत्य हे टिकून राहते. नवीन येणाऱ्या पिढीवर समाजाचे सातत्य अवलंबून असते.
5) समाज ही एक अमूर्त संकल्पना आहे.
समाज हा अमूर्त असतो. तो डोळ्यांनी दिसत नाही. मात्र ते सामाजिक संबंध रूपाने अस्तित्वात आहे. जशी व्यक्ती आपण दाखवू शकतो तसे, आपणास सामाजिक संबंध दाखवता येत नाही.
6) समाज हा परस्परवलंबन आणि सहकार्य यावर आधारित असतो.
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. मनुष्य एकटा राहू शकत नाही. तो एकटा राहून त्याच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. म्हणून तो त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमी दुसऱ्यावर अवलंबून असतो. म्हणून समाजातील व्यक्ती या परस्परवलंबन आणि सहकार्य करून जीवन जगतात.
7) समाजाच्या काही गरजा असतात.
माणसाच्या काही मूलभूत गरजा असतात. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि रोजगार या गरजा जर पूर्ण नाही झाल्या, तर व्यक्तीच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित होतो. जश्या मानवाच्या गरजा आहेत. तशा समाजाच्या पण गरजा आहेत. लोकसंख्येचे जतन करणे, समाजातील विविध कामाचे वाटप करणे, सामाजिक ऐक्य व एकात्मता टिकून ठेवणे आणि समाजाचे सातत्य टिकून ठेवणे या समाजाच्या गरजा आहेत.
8) समाज हा व्यापक मानवी समूह आहे. (large human group)
भारतीय समाज जर आपण म्हटलं, तर भारतीय समाज हा हजारो जाती, धर्मांनी व पंथांनी बनलेला हा एक विशाल समूह आहे. तो लहान मोठ्या आकाराच्या समूहांनी व उप समूहांनी मिळून बनलेला आहे.
9) समाजात एकतेची भावना. असे आपलेपणाची भावना असते.
प्रत्येक समाजातील लोकांना आपण एक आहोत असे वाटत असते. आपला समाज इतर राहून निराळा आहे, असे प्रत्येक समाजातील लोकांना वाटत असते. आपण एक आहोत, अशी भावना समाजातील लोकांत प्रबळ असते. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे वाक्य आपल्यातील ऐक्यी व एकतेची भावना दाखवते.
आता आपण समाजाचे प्रकार पाहूयात.
मानवी समाजाचे जगण्याचे मुख्य साधन व त्या संबंधित असलेले त्यांचे आर्थिक जीवन यांच्या आधारावर समाजाचे खालील सहा प्रकार पडतात.
समाजाचे सहा प्रकार
1) शिकार आणि अन्न संकलन करणारा समाज
2) बागायती समाज
3) पशुपालक समाज
4) शेती व्यवसाय करणारा समाज
5) औद्योगिक समाज
6) औद्योगिकोत्तर समाज
प्रत्येक समाजाच्या प्रकाराचे थोडक्यात स्पष्टीकरण खालीलप्रमाणे
1. शिकार आणि अन्न संकलन करणारा समाज (Hunting and food gathering society)
या समाजाचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे शिकार करणे व जंगलातील अन्नावर अवलंबून होते.
2. बागायती समाज (Horticultural society )
बागायती समाजाचा शोध हा स्त्रियांनी लावला असे म्हणतात.या समाजामध्ये मानवी शक्तीचा आणि हाताने वापरायच्या साधनांचा वापर करून लोक हे बागा आणि शेती तयार करून जगत होते म्हणून या समाजाला बागायती समजा असे म्हणतात.
3. पशुपालक समाज ( Pastoral society )
हा समाज हा पशुपालन आणि पशुसंवर्धन करून उदरनिर्वाह करीत असे. पशुपालन द्वारे या समाजाच्या सर्व मुलभूत गरजा या भागविल्या जात होत्या.
4. शेती व्यवसाय करणारा समाज ( agriculture society )
मानवी शक्ती वापराबरोबर प्राणी शक्तीचा वापर करून विविध साधनांचा जसे की नगरांचा उपयोग करून शेती करणाऱ्या समाजाला शेती व्यवसाय करणारे समाज असे म्हणतात.
5. औद्योगिक समाज ( Industrial society )
या प्रकारच्या समाजामध्ये वस्तूच्या उत्पादनासाठी यंत्राचा, विविध तंत्रांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर कारखाना उत्पादन पद्धतीद्वारे वस्तूंचे उत्पादन होऊ लागले. खास करून हा समाज औद्योगिक क्रांतीनंतर जगभरामध्ये उदयास आला असलेला दिसून येतो. आज भारतीय समाज हा औद्योगिक समाज म्हणून आपण ओळखू शकतो.
6. औद्योगिकोत्तर समाज ( Post -Industrial society )
या समाजाला नवउदार समाज असेही म्हटले जाते. या समाजामध्ये संपूर्ण जग ही बाजारपेठ समजली जाते.आणि मुक्त व्यापाराला प्रोत्साहन दिले. या समाजातील अर्थव्यवस्था सेवाभिमुखी असते. जागतिकीकरणा नंतर हा समाज उदयास आले आहे.