संकरीकरण | Hybridization| What is Hybridization
दोन भिन्न प्रजातीच्या प्राण्यापासून निर्माण झालेल्या नवीन उत्पत्तीच्या अनुषंगाने हा शब्द वापरण्यात येतो. तसेच दोन संस्कृतीच्या मिश्रणातून निर्माण होणाऱ्या तिसऱ्या संस्कृतीला निर्देश कार्यासाठी संकरीकरण ( Hybridization )हा शब्द प्रयोग केला गेला आहे.
संकरीकरण शब्दाचा उगम व अर्थ | Meaning of Hybridization |
Hybrid (संकरित) या शब्दाचा उगम लॅटिन भाषेतील ‘Hibrida’ या शब्दापासून आलेला आहे. भिन्न जातींच्या मिश्रणातून/एकत्रीकरणातून नवीन उत्पत्ती निर्माण होण्याच्या प्रक्रियेला संकरीकरण (Hybridization) असे म्हणतात.
संकरीकरण म्हणजे काय| What is Hybridization
संकरीकरण या प्रक्रियेत बाह्याप्रवाहाचा संपर्क अंतर्गत प्रवाहाशी होऊन एकमेव एक अशी नवीन संमिश्र संस्कृती निर्माण होते, की जे दोन घटकांच्या एकत्रित करण्यातून बनते.
Hybridization involves a process with external flows interact with internal flows producing a unique cultural hybrid that combines element of the two.
जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण या धोरणामुळे देशोदेशातील अनेक लोक हे रोजगार, शिक्षण आणि व्यवसाय स्थलांतर करतात.त्यामुळे संस्कृतीच्या संकरीकरण घडून येते.
संकरीकरणमध्ये भिन्न संस्कृती एकत्र येऊन त्या दोघांच्या मिश्रणातून एक नवीन संस्कृती उदयास येते.
मानवी विकासाच्या विविध टप्प्यांवर आपल्याला एका सामाजिक समूहाने दुसऱ्या सामाजिक समूहाच्या भाषेचा, त्यांच्या संस्कृतीचा अवलंब केलेला दिसतो. दोन वेगवेगळे सामाजिक, सांस्कृतिक समूह एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यात होणाऱ्या सामाजिक व सांस्कृतिक देवाण-घेवाणीतून नवीन संस्कृती उदयास येताना दिसते. तेव्हा त्या प्रक्रियेला आपण सांस्कृतिक संकरीकरण असे म्हणू शकतो.