संस्कृतीचे घटक | Aspects of culture | Element of culture in Sociology
मागील पोस्ट मध्ये आपण संस्कृती म्हणजे काय, त्यांच्या विविध व्याख्या आणि वैशिष्ठ्ये पाहिले. या पोस्ट मध्ये आपण संस्कृतीचे विविध घटक ( Aspects of culture) पाहणार आहोत. संस्कृतीमध्ये मानवाने निर्माण केलेल्या दृश आणि अदृश अश्या सर्व घटकांचा समावेश होतो.
संस्कृतीचे घटक | Aspects of culture| components of culture
1) नियमने | Norms
व्यक्तींच्या वर्तनविषयीच्या समूहाच्या अपेक्षा म्हणजे नियमन होय. (A norm is a group expectation of behaviour – Horton and hunt)
सामाजिक नियमनांची काही उदाहरणे
- जेवताना एकाच हाताचा वापर करावा,
- पाहुण्यांचे हसून स्वागत करावे,
- दुसऱ्याने नमस्कार केल्यास आपणही नमस्कार करावा ,
- वडिलधारी मंडळींचा मान राखावा
- गुरुजनांशी आदराने वागावे ,
- पवित्र वस्तूंचे पावित्र्य बिघडवू नये,
- स्वत:चे काम करण्यासाठी इतरांना धमकी देऊ नये
- राष्ट्रध्वजाचा मान राखावा ,
- पति-पत्नींनी एकमेकांशी एकनिष्ठ राहावे ;
- व्यभिचार करू नये ,
2) मुल्ये | Value
मुल्ये हे संस्कृतीचे अविभाज्य घटक आहे. मुल्ये ही प्रत्येक समाजाचे किंवा संस्कृतीचे आदर्श असतात. मुल्ये ही वर्तनविषयक मानदंड ( Standard) असतात. वर्तन वा एखादी गोष्ट चांगली की वाईट, बरोबर की चूक, योग्य की आयोग्य, हे ठरवण्याचे निकष म्हणजे मुल्ये होत.
मूल्यांचे काही उदाहरणे
- समता,
- स्वातंत्र्य,
- समानता,
- देशभक्ती,
- बंधुता,
- न्याय,
- लोकशाही,
- सत्य,
- अहिंसा इत्यादी मुल्यांची उदाहरणे आपल्याला येतील.
3) चिन्हे आणि प्रतीके | Symbols
एखादी विशिष्ट घटना, किंवा विचार किंवा भावना प्रकट करण्यासाठी, एखाद्या गोष्टीचे निर्देशन करण्यासाठी संस्कृतीमध्ये चिन्हांचा व प्रतीकांचा वापर केला जातो. प्रतीके किंवा चिन्हांचा संस्कृतीमध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे.
आपल्या सगळ्यांना माहिती आहेच की शब्दापेक्षा काही वेळा चिन्हे व प्रतीके अधिक प्रभावी ठरतात. चिन्हे किंवा प्रतिकामुळे निश्चित अर्थ स्पष्ट केला जातो. उदाहरणार्थ -वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सिग्नल यांचा वापर केला जातो. घंटेचा मंदिर आणि शाळा वापर केला जातो.
हिदू संस्कृतीमध्ये मंगळसूत्र लाल रंगाचे कुंकू मंगळसूत्र हे सौभाग्याचे चिन्ह म्हणून हिंदू धर्मात समजले
आजकल सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा इमोजीचा वापर केला जातो. आनंद व्यक्त करताना वेगळे ईमोजी, दुःख व्यक्त करताना किंवा राग आल्यावर ही अशा वेगवेगळ्या इमोजीचा वापर केला जातो, हे एक प्रकारचे चिन्हांचा माध्यमातून व्यक्ती व्यक्त होतो. अशा सगळ्या गोष्टींचा समावेश संस्कृतीमध्ये होतो.
4 )भाषा | Language
भाषा ही कोणत्याही संस्कृतीचे एक मूलभूत वैशिष्ट्य असते. भाषेतील शब्दे हे प्रतीके असतात. भाषेमुळे व्यक्तीला अमूर्त पातळीवरील विचार करता येते शक्य होते. भाषेवर संस्कृतीचा विकास अवलंबून असतो. भाषेच्या माध्यमातून एक पिढी दुसऱ्या पिढीकडे संस्कृतीचे संक्रमण करते.
5) तंत्रज्ञान | Technology
तंत्रज्ञान हा संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. तंत्रज्ञानाच विकास आणि विस्तार जेवढ्या झपाट्याने होईल तितक्या वेगाने संस्कृतीच्या विविध घटकांत परिवतर्न घडवून आणते.
वरील पोस्ट संदर्भातील मागील पोस्ट येथे वाचा:- संस्कृती म्हणजे काय | what is Culture | संस्कृतीची वैशिष्ठ्ये | Characteristics of Culture