इंडियाला भारत का म्हणतात | India, that is Bharat
आपल्या देशाचे नाव काय असे जर कोणी प्रश्न केला तर कोणी म्हणेल भारत कोणी म्हणेल इंडिया. इंडियाला भारत का म्हणतात हा प्रश्न कधीतरी सामान्यमाणसाला पडतोच. आज हि अनेक लोक इंडिया ला भारत या नावाबाबत गोंधळून जातात. मात्र आपल्या राज्यघटनेत या दोन्ही नावांना अधिकृत देण्यात आली आहे.
घटनेच्या कलम 1 मध्ये इंडिया, दॅट इज भारत, शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स’ असे म्हटले आहे.
इंडिया आणि भारत ही दोन्ही नावे देशाची घटनेत नोंदवलेली अधिकृत नावे आहेत. घटनेच्या कलम १ मध्ये इंग्रजीत ‘इंडिया, दॅट इज भारत, शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स’ असे म्हटले आहे.
मराठी अनुवादित असलेल्या घटनेतील संदर्भ
मराठी अनुवादित असलेल्या घटनेत ‘इंडिया, अर्थात भारत, हा राज्यांचा संघ असेल’,
हिंदी अनुवादित असलेल्या घटनेतील संदर्भ
हिंदी ‘भारत, अर्थात इंडिया, राज्यों का संघ होगा’ असे म्हटले आहे.असे सांगण्यात आले आहेत.
इंग्रजीत असलेल्या घटनेतील संदर्भ
इंडिया, दॅट इज भारत, शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स’ असे म्हटले आहे. इंग्रजीत ‘इंडिया’ आणि इतर भाषांत ‘भारत’ असे लिहण्याकडे काळ आहे.
इंडिया, दॅट इज भारत बाबत झालेली संविधान सभेतील चर्चा | इंडियाला भारत का म्हणतात
या दोन्ही नावाबाबत संविधान सभेत चर्चा झाली आणि ते स्वीकारले गेले. ब्रिटिशांच्या काळात इंडिया, हिंदुस्थान, भारत अशी तीन नावे या देशाला होती.
- जवाहरलाल नेहरू यांनी ९ ऑगस्ट १९४६ रोजी संविधान सभेच्या सुरवातीला उद्दिष्टांचा ठराव मांडला होता त्यात देशासाठीचे संबोधन ‘इंडिया’ म्हणून केले होते
- १ ऑक्टोबर १९४७ ला संविधान सभेचे सल्लागार बी. एन. राव यांनी सादर केलेल्या संविधानाच्या प्राथमिक मसुद्यातही फक्त ‘इंडिया’ होते.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील मसुदा समितीने ४ नोव्हेंबर १९४८ ला संविधान सभेत सादर केलेल्या संविधानाच्या मसुद्यातही देशाचे नाव ‘इंडिया’ एवढेच होते.
- घटनेशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या अशा या तिन्ही दस्तावेजांत ‘भारत’ हे नाव आलेले नव्हते.
- डॉ. आंबेडकरांनी सादर केलेल्या मसुद्यात आपल्या देशाचे ‘मूळ नाव’ का नाही याबद्दल काही सदस्यांनी आक्षेप नोंदवले. या मुद्द्यावर चर्चा मात्र साडेदहा महिन्यांनी झाली. १७ सप्टेंबर १९४९ रोजी आपल्या मसुद्याच्या अनुच्छेद १ मध्ये दुरुस्ती करणारा प्रस्ताव डॉ. आंबेडकरांनी संविधान समितीत मांडला. ‘इंडिया शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स’ ऐवजी ‘इंडिया, दॅट इज, भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स’ असा हा दुरुस्ती प्रस्ताव होता. या दुरुस्तीत इंडियासह भारत शब्दाचा प्रथमच संविधानात समावेश केला गेला.
- ‘इंडिया म्हणजेच भारत’ याऐवजी ‘भारत, जो इंडिया नावाने ओळखला जातो’ असा शब्दप्रयोग करण्याची सूचना एच. व्ही. कामत यांनी केली. त्यांची दुसरी पर्यायी सूचना होती – ‘हिंदी अथवा इंग्रजी भाषेत इंडिया’ असा शब्दप्रयोग करावा.
- सेठ गोविंद दास यांनी ‘भारत, जो बाहेरच्या देशांत इंडिया नावानेही ओळखला जातो’ असे लिहिण्याची सूचना केली.
- आपल्या प्राचीन ग्रंथांत इंडिया हा शब्द दिसत नाही . तो ग्रीकांच्या आगमनानंतर आला. त्यांनी आपल्या सिंधू नदीला इंड्स म्हटले व या इंड्सवरून इंडिया आला इतिहासात नोंद आहे.
- वेद, पुराणे, उपनिषदे, , ब्राह्मणे, महाभारत या प्राचीन वाङ्मयांत भारताचे उल्लेख आढळतात. ह्यु एन त्संग या चिनी प्रवाशाच्या प्रवासवर्णनातही भारताचा उल्लेख केला होता.