बचत गट कसे स्थापन कराल | How to prepare SHGs groups in Marathi
बचत गट याला इंग्रजी मध्ये self help group ( SHGs ) असे म्हणतात. बचत गट हे महिला व पुरुषाचे करतात येतात. बचत गट तयार करताना आपल्या व्यक्तीची संख्या लागते. कमीत कमी 5 आणि जास्तीजास्त 11 किंवा 13 सदस्यांचा असू शकतो. बचत गट कसे स्थापन कराल. चला तर Step by Step प्रक्रिया आपण काय असते ते पाहूयात.
इच्छुक महिला गटांनी प्रथम मिटिंग करणे.
या मिटिंग मध्ये, सर्वाना आपण सर्व आज बचत गट तयार करण्यासाठी एकत्र जमलो आहोत असे सांगा. आजच्या मिटींगच्या सभेत आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत.
बचत गटांतील येऊ इच्छुक महिलांची संख्या निश्चित करणे.
बचत गटांतील येऊ इच्छुक महिलांची संख्या निश्चित करणे आवश्यक असते. 7 किंवा 9 महिलांचा गट हा आयडीयल असतो. व्यवस्थापन आणि एकत्र येणे हे सोपे जाते.
सर्व महिलांची यादी करणे. ज्यामध्ये त्यांचे नाव, वय आधार कार्ड नंबर घेणे. प्रत्येक महिलाकडून तीन फोटो, आणि आधार कार्ड यांची झेरॉक्स कॉपी घेणे.
सर्वाना कोणत्या विषयावर चर्चा करणार आहोत याबद्दल माहिती द्या.
सभेमध्ये खालीलप्रमाणे विविध विषय चर्चेत घेणे.
विषय क्र.१:- बचतगटास नांव देणेबाबत सभेमध्ये चर्चा करणे.
ज्या उद्देशाने आपण बचत गट तयार केला आहे. तो उद्देश लक्षात ठेऊन बचत गटाला नाव द्यावे. प्रगती बचत गट, समृद्धी बचत गट असे काहीही नाव आपण देऊ शकता. नावावर सर्वांचे मत घ्या. बहुमत कोणत्या नावाला आहे ते पहा. ते नाव फायनल करा. शेवटी चार्चेअंती हे ……….. नाव निश्चित करण्यात आले असे घोषित करा.
विषय क्र २:- गटाचे अध्यक्षाची निवड करणेबाबत ..
बचत गटाला नाव दिल्यावर आपल्याला सभेमध्ये चर्चा करून अध्यक्षाची निवड करणे आवश्यक असतो. ही व्यक्ती थोडीशी शिक्षित लागते. थोडे बोलायला लागते. गटाचे नेतृत्व करू शकेल अशी महिला ही शक्यतो अध्यक्ष करावे. सभेमध्ये चर्चा करुन सौ ………………….. याची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड करणेत आली घोषित करा.
विषय क्र ३:- गटाचे सचिव व खजिनदार यांची निवड करणेबाबत
जसे अध्यक्षाची निवड केली तसे आपण गटाचे सचिव व खजिनदार यांची निवड करू शकता आणि सर्वानुमते घोषित करा की, सभेमध्ये चर्चा करुन सचिव म्हणून सौ . ….. आणि खजिनदार म्हणून सौ .. यांची निवड करण्यात आली.
विषय क्र ४ : – बचतीसाठी रक्कम ठरविण्यात बाबत .
महिलांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन दर महा 200 रुपये गोळा करू शकता. कमीत कमी 100 तरी असावे. सभेमध्ये चर्चा करुन रु.——————सर्व सभासदांचे एकूण रक्कम रु. ———-सर्वानुमते ठरविण्यात यावे.
विषय क्र ५: – गटाचे बँकेत बचत खाते उघडणेबाबत ( बचत गट )
दरमहा मासिक वर्गणी जमा करुन गटातील चे खाते बँकेत उघडणे, सर्व बचत गट सदस्यांची एकूण रक्कम बँकेत खाते उघडून ठेवण्यात बाबत सर्वानुमते मान्य करतात.
. विषय क्र ६ : – गटाचे आर्थिक व्यवहार करणेबाबतचे अधिकार देणेबाबत.
बचत गटाचे आर्थिक व्यवहार गटाचे अध्यक्ष, सौ. …………………व गटाचे सचिव सौ. ————————– तसेच गटाचे खजिनदार सौ. ——— या तिघींपैकी कुणीही दोघींकडे देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
असे बचत सभेत / मिटिंग मध्ये वेगवेगळे विषय घेऊन विषय मांडून ठराव घेणे घेतलेल्या ठरावावर सर्वांची सही घेणे. आणि जवळच्या बँकेत जाऊन ही ठरावाची सर्वांची सही केलेले ठराव आर्थिक व्यवहार करणाऱ्या व्यक्तींची आधार कार्ड घेऊन जाऊन खाते उघडू शकता.
बचतगटाची सर्वसाधारण नियमावली
येथे आपला बचत गट कसे असावे. त्यासाठी काही नियम आपण येथे करू शकता/
- बचतगटातील सर्व सभासदांनी दरमहा होणाऱ्या मासिक सभेस उपस्थित राहणे सर्वांना बंधनकारक राहील, गैरहजर सभासदांस रु …….. प्रमाणे दंड आकारणेत येईल .
- बचतगटातील सर्व सभासदांनी आपली मासिक वर्गणी प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला करावी .
- बचतगटातील सभासदांना अंतर्गत कर्ज रु. ——-प्रमाणे मिळेल व त्याची परतफेड दिलेल्या मुदतीत करणे बंधन कारक राहील .
- भविष्यात गटाने समुहकर्ज घेतल्यास सदर कर्जाची परतफेड समुहरुपाने ( एकत्रित ) करणे बंधनकारक राहील.
- बचत गटातील एखादा सदस्य काही अपरिहार्य कारणास्तव बदलायचा अधिकार सर्वानुमते गटातील सभासदांना राहील.
- गटाचे आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असे राहील.
वरील प्रमाणे आपण जे आवश्यक आहे असे सर्व नियम करावे. अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर जा. बचत गट.