पॅन कार्ड कसे बनवायचे | How To make Pan card In Marathi
नमस्ते साथी, या पोस्टमध्ये आज आपण पॅन कार्ड म्हणजे काय, त्यांचे long फॉर्म तसेच , पॅन कार्ड का काढायचे असते. पॅन कार्ड कसे बनवायचे किंवा apply करायचे बनवायचे आणि apply केल्यानंतर डाउनलोडकसे कराल याबाबत आपणास माहिती मिळेल.
PAN Full form
Permanent account number ( कायम खाते क्रमांक ) कायम खाते क्रमांक (PAN) हा दहा-वर्णांचा अल्फान्यूमेरिक आयडेंटिफायर फाउंडेशनल आयडी आहे. जो भारतीय आयकर विभागाकडून लॅमिनेटेड पॅन कार्ड स्वरूपात प्रदान करण्यात येते.
पॅन नंबर म्हणजे काय ?
पॅन (कायम खाते क्रमांक) हा भारतातील सर्व करदात्यांना नियुक्त केलेला ओळख क्रमांक आहे. पॅन ही एक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे ज्याद्वारे, व्यक्ती/कंपनीसाठी सर्व कर-संबंधित माहिती एका पॅन क्रमांकाद्वारे रेकॉर्ड केली जाते या नंबर अंतर्गत संपूर्ण आर्थिक व्यवहाराची माहिती साठवून ठेवली जाते.त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला एकच पॅन नंबर देण्यात येते.
यामध्ये 10 अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक असतो. जो कोणत्याही व्यक्ती, कंपनी, फर्म इत्यादींना प्राप्तिकर विभागाकडून जारी केला जातो. 1 जानेवारी 2005 पासून कोणत्याही चालानसाठी पॅन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. थोडक्यात पॅन कार्ड क्रमांकामध्ये एखाद्या व्यक्तीचा कर आणि गुंतवणुकीशी संबंधित डेटा असतो.
पॅन कार्ड एक ओळखपत्र आहे.
पॅन कार्डची संपूर्ण प्रक्रिया सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) अंतर्गत येते. त्यात नाव, पत्ता, जन्मतारीख, वडिलांचे नाव, स्वाक्षरी, फोटो अशी तुमची सर्व महत्वाची माहिती देखील असते.खाते उघडण्यासाठी, रोख रक्कम जमा करण्यासाठी आणि आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र आहे. पॅ
संपूर्ण देशभरात त्याचा अवलंब केला जातो म्हणून कोणत्याही दोन करदात्यांना समान पॅन क्रमांक नसतो. प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 272B नुसार, एकापेक्षा जास्त पॅन ठेवल्यास ₹ 10,000 चा दंड आकारला जाऊ शकतो.
पॅन कार्ड करिता पात्रता
जो कोणी कर ( व्यक्ती किंवा कंपनी ) भरतो त्यांना पॅन कार्ड दिले जाते. त्यांच्याकडे पॅन कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे असली पाहिजेत.
पॅन कार्डची किती वैधता असते.
पॅनकार्ड हा दस्तावेज आयुष्यभर वैध असतो. एकदा जारी केल्यानंतर ते कधीही अवैध होत नाही.
पॅन कार्डचे प्रकार
पॅन कार्डचे दोन प्रकार असतात.
- फॉर्म 49A
- फॉर्म 49AA.
PAN करिता फॉर्म 49A आहे.
फॉर्म 49A हा केवळ भारतात राहणाऱ्या व्यक्तींसाठीचा अर्ज आहे.अल्पवयीन आणि विद्यार्थी फॉर्म 49A भरून पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतात
PAN करिता फॉर्म 49AA आहे.
फॉर्म 49AA हा प्रामुख्याने परदेशी रहिवासी आणि भारताबाहेर अंतर्भूत नसलेल्या वैयक्तिक घटकांसाठीचा अर्ज आहे.
PAN कार्डसाठी अर्ज करताना खालील संवर्गातील आवश्यक तो एक निवडणे.
- वैयक्तिक
- हिंदू अविभक्त कुटुंब
- कंपनी
- फर्म/भागीदारी
- ट्रस्ट
- संस्था
- परदेशी नागरिक
पॅन कार्ड फी | pan card साठी किती खर्च येतो.
PAN card अर्जदाराला शुल्क म्हणून ₹ 107 भरावे लागतात.( प्रक्रिया शुल्क ₹ 93 +18% GST ). परदेशी नागरिक नागरिकांकडून सरकार ₹ 1020 शुल्क आकारते. ( अर्ज शुल्क ₹ 93 + डिस्पॅच शुल्क ₹ 771 + 18% GST ).
पॅन कार्डसाठी नाव नोंदणी कसे कराल. | PAN card कसे बनवायचे
पॅनसाठी आपण नाव नोंदणी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करू शकता. या दोन्ही पद्धत आपण सोप्या पद्धीतीने पाहूयात.
पॅनसाठी ऑनलाइन नोंदणी कसे कराल.
सर्वप्रथम NSDL आणि UTIITSL च्या वेबसाइटवर जावे लागेल पुढील लिंक वर जा. https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html
.आवश्यक माहिती भरा. फी भरल्यानंतर फॉर्म भरून सबमिट करावा लागेल. त्यानंतर पॅन कार्ड अर्ज करताना पुरविलेल्या पत्त्यावर पाठवला जातो.
पॅनसाठी ऑनलाइन नोंदणी कसे कराल.
सर्वप्रथम एक ऑनलाइन नोंदणी करीताचा अर्ज घ्यावा लागेल. यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडून विहित शुल्कासह सादर करावी लागतील. यानंतर पॅनकार्ड अर्जदाराच्या पत्त्यावर पाठवले जाते.
पॅन कार्ड वरील नंबर कोडींग कसे असते. | PAN कार्ड वरील नंबर कसे बनते.
पॅनकार्डवर खालीलप्रकारची माहिती असते.
- कार्ड धारकाचे फोटो
- कार्ड धारकाचे नाव,
- त्याच्या वडिलांचे नाव,
- जन्मतारीख.
- अर्जदाराची सही
पॅन क्रमांक (ज्यामध्ये पहिली 3 अक्षरे A ते Z पर्यंत वर्णमाला आहेत), पुढील 4थे अक्षर ची श्रेणी दर्शवते. करदाते जसे की कंपनी. फर्म, सरकार, स्थानिक प्राधिकरण, व्यक्तींची भारतीय संघटना इ. दाखवते. 5 वे अक्षर हे अर्जदाराच्या आडनावाचे पहिले अक्षर आहे, उर्वरित अक्षरे यादृच्छिक आहेत. ज्यामध्ये 4 वर्ण संख्येत आहेत आणि उर्वरित एक वर्णमाला आहे. आर्थिक व्यवहारांसाठी अर्जदाराची सही पॅनकार्डवरही छापली जाते. ओळखपत्रासाठी वापरण्यासाठी अर्जदाराचे छायाचित्रही जोडलेले आहे. कंपनी आणि फर्मच्या बाबतीत छायाचित्र दाखवलेले नाही.
पॅनसाठी अर्ज करण्यासाठी कागदपत्रे
ई-पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी, पॅन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील जेणेकरून अर्जदाराची ओळख आणि त्याचा कायमचा पत्ता आणि जन्मतारीख कळू शकेल. अर्जदार वापरू शकतो अशी काही कागदपत्रे खाली दिली आहेत.
खालीलपैकी एक ओळखीचा पुरावा लागेल.
- रेशनकार्ड,
- मतदार ओळखपत्र,
- पासपोर्ट कार्ड,
- ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कोणतेही कागदपत्र देऊ शकतो.
राहत्या ठिकाणचा पुरावा खालीलपैकी एक पुरावा लागेल.
- पासपोर्ट,
- ड्रायव्हिंग लायसन्स,
- आधार कार्ड,
- मतदार ओळखपत्र वापरू शकतो.
जन्म तारखेचा पुरावा
अर्जदार त्याच्या/तिची 10वी आणि 12वीची मार्कशीट देखील जन्म प्रमाणपत्रात जोडू शकतो.