सामाजिक दर्जा व्याख्या व अर्थ | Definition And Meaning Of Social Status
सामाजिक दर्जा म्हणजे एखाद्या व्यक्तीने सामाजिक संरचनेत असलेले सामाजिक स्थान होय. व्यक्तीचे विशिष्ट अशा सामाजिक स्थानाशी संबंधित असलेले हक्क आणि विशेष अधिकार म्हणजे दर्जा होय.
सामाजिक दर्जा व्याख्या | Definition Of Social Status
1) राल्फ लिंटन – “दर्जा म्हणजे एखाद्या विशिष्ट समाजव्यवस्थेत विशिष्ट काळी, एखाद्या विशिष्ट व्यक्तीला असलेले स्थान होय.”
( Status is the place in a particular system which a certain individual occupies at a particular time.” – Ralph Linton )
2) टालकॉट पार्सन्स – भूमिकांचा स्थानात्मक पैलू म्हणजे दर्जा होय
(A Status is the positional aspect of the role – Talcott Parsons )
3) इलियट आणि मेरिल “समूहांतर्गत स्थानांच्या श्रेणी-व्यवस्थेत व्यक्तीला तिच्या जन्म, वय, कुटुंब, वर्ग, व्यवसाय, विवाह आणि कर्तृत्वसिद्धी यामुळे प्राप्त झालेल्या स्थानाला दर्जा म्हणतात.
( Status is the rank order position , which the individual occupies in the group by virtue of his sex , age , family , class , occupation , marriage and achievement.” – Elliott and Merrill )
दर्जाचे प्रकार ( Types of Status )
राल्फ लिंटन यांनी दर्जाचे दोन प्रकार सांगितले आहेत. काही दर्जे समाजाने आपणाला दिलेले असतात, तर काही दर्जे आपण स्वप्रयत्नाने मिळविलेले असतात.
प्रदत्त किंवा अर्पित दर्जे ( Ascribed Statuses )
जन्म किंवा सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा काही घटकांमुळे, व्यक्तीने स्वतः त्यासाठी काहीही प्रयत्न न करता, जे दर्जे व्यक्तीला समाजाकडून बहाल करण्यात येतात, त्यांना प्रदत्त किंवा अर्पित दर्जे ( Ascribed Statuses ) असे म्हणतात. व्यक्तीची इच्छा वा हेतू असो वा नसो हे प्रदत्त दर्जे तिला मिळतातच.
अर्जित किंवा संपादित दर्जे ( Achieved statuses )
काही दर्जे व्यक्तीने त्यासाठी खास परिश्रम घेऊन, स्वकर्तृत्वाच्या जोरावर मिळविलेले असतात. त्यांना अर्जित किंवा संपादित दर्जे ( Achieved statuses ) असे म्हणतात.