Social Position in Marathi | सामाजिक स्थान
सामाजिक स्थान (Social Position) मी इंजिनियर आहे. शिक्षक आहे, पोलीस आहे, उद्योगपती आहे असे व्यक्ती आपला परिचय करून देताना सांगते. समाजशास्त्रीय परिभाषेत ही सर्व सामाजिक स्थाने आहे. चला तर विविध उदाहरणादाखल सामाजिक स्थान ही संकल्पना आपण समजून घेऊयात.
सामाजिक स्थान ( Social Position )म्हणजे काय?
व्यक्तीचे तिच्या समूहातील स्थान म्हणजेच सामाजिक स्थान होय.
व्यक्तीची सामाजिक स्थाने (Social Positions ) गट सापेक्ष किंवा समूह सापेक्ष असतात.
कोणत्याही समाजातील विविध समूहात विविध स्थाने असतात. एक दोन उदाहरणासह आपण समजून घेऊयात.
- कुटुंबात आई, वडील भाऊ आणि बहिण इत्यादी स्थाने असतात.
- शाळा-कॉलेजमध्ये विद्यार्थी, शिक्षक, शिपाई, क्लार्क, प्राध्यापक आणि प्राचार्य अशी स्थाने असतात.
- एखाद्या कंपनीत कामगार, सुपरवायझर, मनेजर आणि मालक अशी स्थानी असतात.
यावरून आपण असे म्हणूयात की व्यक्तीची सामाजिक स्थाने गट सापेक्ष किंवा समूह सापेक्ष असतात. म्हणजेच समूहा आणि गट प्रमाणे त्तांचे समाजिक स्थाने बदलतात. उदा. तुम्ही तुमच्या घरात कुणाचे तरी भाऊ किंवा बहिण असता, परंतु जेव्हा तुम्ही शाळा कॉलेज मध्ये जाता तेव्हा तुमची विद्यार्थी बनता.
एखाद्या समूहात किंवा समाजात एकच स्थान भूषवणाऱ्या अनेक व्यक्ती असू शकतात.
आणखीन एक उदाहरण पाहूयात, एखादी व्यक्ती कंपनीत व्यावस्थापाक काम करते. ती व्यक्ती कुटुंबात वडील, पती असते तर एखाद्या संस्थेत ही संचालक म्हणून कार्यरत असते. याचा अर्थ असा की, एकच व्यक्ती विविध सामाजिक समूहांची सभासद असते आणि त्यातील विविध सामाजिक स्थाने भूषवित असते ज्याप्रमाणे एकच व्यक्ती विविध समूहात भिन्न भिन्न स्थाने भूषवते. त्याचप्रमाणे एखाद्या समूहात किंवा समाजात एकच स्थान भूषवणाऱ्या अनेक व्यक्ती असू शकतात. शाळा-कॉलेजमध्ये शिक्षक स्थान भूषविणाऱ्या अनेक व्यक्ती असू शकतात.
प्रत्येक सामाजिक स्थानाला ( Social Position )विशिष्ट अशी प्रतिष्ठा असते
काही स्थाने मात्र एक विशिष्ट वेळी एकच व्यक्ती धारण करते. उदा. भारताचा पंतप्रधान तसेच राष्ट्रपती. या स्थानावर विशिष्ट काळ काळात एकच व्यक्ती असते प्रत्येक सामाजिक स्थानाला विशिष्ट अशी प्रतिष्ठा असते.
सर्व सामाजिक स्थानांची प्रतिष्ठा सारखी नसते
आपण पहिले की, प्रत्येक सामाजिक स्थानाला विशिष्ट अशी प्रतिष्ठा प्रेस्टिज असते. परंतु हे ही तितके खरे आहे की सर्व सामाजिक स्थानांची प्रतिष्ठा सारखी नसते. सोपे उदाहरण पाहूयात. कंपनीत काम करणाऱ्या HR स्थानी काम करणाऱ्या व्यक्तीच्या स्थानाला एवढी प्रतिष्ठा असते तेवढी होऊस्कीपिंग staff या स्थानाला नसते. सामाजिक स्थानाच्या या श्रेष्ठ कनिष्ठतेला त्या संपूर्ण समूहाची मान्यता असते. समूहातील सर्व स्थाने परस्पर संबंधित किंवा परस्परांना जोडलेली असतात.
प्रत्येक सामाजिक स्थानाला दोन पैलू असतात.
हक्क आणि विशेष अधिकार
कर्तव्य आणि जबाबदाऱ्या
सामाजिक स्थानांचे हे दोन पैलू म्हणजेच दर्जा आणि भूमिका होय.
दर्जा म्हणजे काय
विशिष्ट अशा सामाजिक स्थानाशी संबंधित असलेले हक्क आणि विशेष अधिकार म्हणजे दर्जा होय
भूमिका म्हणजे काय
सामाजिक स्थानाशी संबंधित अशा जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांचा यात समावेश असतो
एखाद्या समूहात व्यक्तीला काही विशिष्ट हक्क व अधिकार प्राप्त होतात आणि काही विशिष्ट गोष्टी करण्याची तिच्याकडून अपेक्षा केली जाते तेव्हा ती व्यक्ती एका विशिष्ट स्थानावर आहे असे म्हटले जाते. दर्जा व भूमिका या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हटले जाते. म्हणून हॅरी जॉन्सन दर्जा व भूमिका असे वेगळे असे म्हणण्यापेक्षा दर्जा-भूमिका असे एकत्र म्हणण्याचे सुचवतो. अंतिमता या दोन्ही शब्दामधून सामाजिक स्थानातच निर्देश होतो.