परीक्षेकरिता अभ्यास कसे करावे | How to study for Exam in Marathi
आजच्या काळात शिक्षणाचे महत्व आपण सगळे जाणतोच. या पोस्ट मध्ये आपण परीक्षेकरिता अभ्यास कसे करावे यांच्या टीप्स पाहणार आहोत. शिक्षण नसेल तर काय होते याबदल महात्मा ज्योतीबा फुले यांनी त्यांच्या सांगितलेलं काव्यातून सांगितले आहे.
“विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥
निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।।
वित्त विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥”
आपल्या आज्ञानाची ओळख करून देते.
शिक्षण हे व्यक्तीला त्यांच्या अज्ञानाची जाणीव करून देतो. एखादी गोष्टीची माहिती नसेल आपल्याला त्याची भीती वाटते. आपला आत्मविश्वस कमी होतो. आपण चिंतीत होतो.
जेव्हा आपल्या भीती वाटाणाऱ्या गोष्टीची संपूर्ण माहिती होते किंवा त्यातील तथ्य व सायन्स कळते मग बघा आपला कॉन्फिडन्स, भीतीचा कोणताचा लवलेश नसतो.
शिक्षणामुळे व्यक्तीच्या ज्ञानात भर पडत जाते.
शिक्षण घेतल्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आजूबाजूची व्यवस्था कळते. न्याय व अन्यायची ओळख होते. कायदा कळतो. म्हणून शिक्षणाची व्याख्या ही ‘व्यक्तीच्या वर्तनातील अपेक्षित बदल अशी केली जाते ते यासाठी.
डॉ. बाबासाहेब यांचे आणखीन एक फेमस मुलमंत्र आहे. शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा. शिकलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
आपल्या प्रत्येकांच्या आयुष्यातील दहावी, बारावी आणि पदवी आणि पदवीत्तरचे टप्पे अतिशय महत्वचा मनाला जातो. या टप्प्यावरील विविध परीक्षातील यश-अपयशावर आयुष्यातील बऱ्याच गोष्टी ठरवतात.
कोणत्यही परीक्षेची तरी कशी कराल. परीक्षेकरिता अभ्यास कसे करावे
स्वतःच्या नोट्स तयार करा.
प्रत्येक विषयच्या स्वतःच्या नोट्स तयार केल्या पाहिजे. या नोट्स लिहताना मात्र मागील एक दोन वर्षातील पेपर पॅटर्न पाहावे. नेमके प्रश्न कसे विचारला जातो. हे पाहून आपल्या नोट्स ची खोली किंवा व्याप्ती ठरायला हवे.
पेपर पॅटर्न वरून लक्षात सर्वसामावेशक मुद्देसूद , प्रश्नाचे नोट्स काढा.
आपण ज्या ही संकल्पना किंवा मुद्दा, प्रश्नाचे नोट्स काढत आहात. ते सर्वसामावेशक असायला हवे. म्हणजेच समजा एखादी संकल्पना किंवा प्रश्न हे पेपर मध्ये 2 मार्क, 4 मार्क, 6 मार्क आणि 10 मार्क असे येऊ शकते हे आपल्याला पेपर पॅटर्न वरून लक्षात येते. कितीही मार्कल प्रश्न आला तर आपल्याला व्यवस्थित लिहता यायला हवे.
काढलेल्या नोट्सचे वारंवार वाचन करणे. सराव करणे
एकदा का आपण स्वतःच्या हाताने तयार केलेली नोट्स काढल्या असतील तर त्याचे वारंवार वाचन होने आवश्यक आहे. सराव करणे गरजेचे आहे. एकच संकल्पना तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वाचत असाल तर स्मरणात राहण्यास अडथळा येतो. त्यामुळे एकदा अनेक संदर्भ घेऊन जर नोट्स काढल्या असतील तर दुसरे काही वाचन साहित्य बघण्याची गरज पडत नाही.
लिखाण हे एक कौशल्य व कला आहे.
लिखाण किंवा परीक्षेच्या प्रश्नाची उत्तरे लिहणे ही एक कला आहे. मोठ्या प्रश्नाचे उत्तर लिहताना मुद्देसूद लिहणे आवश्यक असते. वस्तुनिष्ठ ज्याला आपण एक वाक्यात उत्तरे द्या. किंवा रिकाम्या जागा भरा किंवा जोड्या लावा. या प्रश्नच्या बरोबर उत्तरांसाठी बोर्डाची पाठ्यपुस्तके समजून घेऊन एक दोन वेळा वाचले पाहिले. नोट्स काढण्याआधी हे होने आवश्यक आहे.
वाचनाला कृतीची म्हणजेच लिखाणाची जोड द्या.
चांगल्या अभ्यासाठी पहाटेची वेळ सर्वात चांगली असते. यावेळी नवीन विषयाची सुरुवात करावे. वाचनाला कृतीची म्हणजेच लिखाणाची जोड द्यावी. नुसते वाचन योग्य राहत नाही. लक्षात राहण्यासाठी प्रथम समजून घेऊन वाचन नंतर परत वाचन व लिखाण असे ठेवावे.
वाचन त्यानंतर लिखाण केल्यामुळे गोष्टी दीर्घकाळ स्मरणात राहतात.
लिखाण हे जादू सारखे काम करते. हे अनेकांनी सिद्ध केले आहे. वाचन आणि लिखाण केल्यामुळे गोष्टी स्मरणात लोकांच्या दीर्घकाळ राहिलेल्या आहेत.
रात्री झोपण्यापूर्वी दिवसाभरात जेभी काही केले त्याचे स्मरण करा.
शेवटची टीप देतो ही हे पाळलात तर समजा यश हमखास मिळणार ती म्हणजेच रात्री झोपल्या पूर्वी दिवसाभरात जेभी काही तुम्ही अभ्यासला असला, वाचला असाल त्याचे स्मरण करणे. आठवण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला थोडा त्रास होईल, काही आठवणार नाही. पण हळूहळू तुम्हांला सगळ्या वाचलेल्या गोष्टी लक्षात राहू लागेल. अशी उजळणी जर का विद्यार्थ्यानी केली की हमखास चांगले यश मिळते. आणि परीक्षेच्या वेळी किंवा दिवशी त्यास कोणताही ताण येणार नाही. वरील सर्व गोष्टी करण्याच्या सवयी एकदा का लागल्या की त्या तुमच्या डेली आयुष्यचा भाग बनतात. ही सवय पुढील आयुष्यासाठी यश मिळवून देणारी सवय बनते