नैराश्य कसे दूर करावे | How to overcome depression
मागील पोस्ट मध्ये आपण नैराश्य म्हणजे काय आणि त्यांची लक्षणे पहिले. या पोस्ट मध्ये आपण उपाय पहाणर आहोत. जर आपणास नैराश्याची ( depression )लक्षणे असतील तर खालील टीप्स वा उपाय करून पहा.
मनोसउपचार तज्ञ ( सायकोलॉजिस्ट ) सल्ला
- मनोसउपचार तज्ञ ( सायकोलॉजिस्ट ) यांना भेटा. निसंकोच सर्व गोष्टी विस्तारत त्यांना सांगा. काही लपवू नका. एक लक्षात घ्या त्याच्या गोळ्या औषधा शिवाय तुम्ही बरे होणार नाही. त्यामुळे अमक -तमक करण्यापेक्षा डॉ. सल्ला आणि औषध महत्वाचे आहे. जे ही औषधं डॉ. देतील ते नियमित घ्या. एकही दिवस चुकवू नका. जसे सांगितले आहे तसे औषधे घ्या.
नैराश्या करिता जबाबदार असणाऱ्यांचा संपर्क टाळा
ज्याच्यामुळे तुम्हाला असे दिवस आले आहे वाटते. अशा सर्व जण तुमच्यासाठी मेले आहेत असे समजा. येथून पुढे त्याच्याशी कोणताच संपर्क करायचे नाही. त्यावर कोणाशी बोलायचे नाही. त्याचा विचार करायचा नाही. माझे कसे किंवा काय होईल याचा अजिबात विचार करायचा नाही.
depression मध्ये स्वतःला आनंदी ठेवा.
- आता महत्वाच हे आहे की, तुम्ही बरे कसे व्हाल. लोकांचा अजिबात विचार करू नका. कोणाशी संपर्क ही करू नका. अश्या गोष्टी करा ज्या तुम्हांला मनापासून आवडतात व आंनद देतात.
- दुःख देणाऱ्या गोष्टी व माणसापासून कोसो लांब जावा. निदान बरे होई पर्यत तरी.
- स्वतः ला खूष ठेवण्यासाठी जे काही करावे लागेल ते करा. अश्या गोष्टी करा. ज्यातून आनंद मिळेल. तुम्हाला बरे वाटेल.
एखाद्या मैदानी खेळत स्वतःला गुंतवा.
खेळ खेळा. खेळा मुळे आपण स्वतः ला विसरतो. कृत्रिम पणे न करतात मनापासून वाटत असेल तर खेळा अन्यथा नको. कोणाही सोबत, लहान मुले असतील तर त्याचा सोबत खेळा. काय आंनद असतो त्याच्या सोबत खेळतांना.
डिप्रेशन असताना करियर आणि भविष्याचा विचार करू नका.
भविष्याची चिंता अजिबात करू नका. आता महत्वाचे आहे तुम्ही, तुमचा जीव आणि तुमचा आनंद. खा, पी आणि खेळा, झोप काढा. व्हॅलेंनटरी जबाबदाऱ्या घ्या. विना मानधन कुठेतरी आवडीचे तुम्हाला बरे वाटेल असे काम करा. कोणीही काम देईल. बिन पैसा म्हटले की.
आवडणारी पुस्तके वाचा
शक्य झाले तर मानसशास्त्र वरील पुस्तके वाचा. ज्यामध्ये अनेक व्यक्ती असतात ज्या डिप्रेशनच्या शिकार झालेल्या होत्या आणि त्या कश्या बाहेर पडल्या याबाबत माहिती दिलेली असते. तुमच्या सारख्या केसेस तुम्हाला मिळतीलच अश्या पुस्तकात.
हळू हळू व्यायाम, योग आणि ध्यानधारणा करा.
- तुम्हाला या सर्व परिस्थितीतून बाहेर पडायला सहा महिने किंवा एखादे वर्ष लागू शकतो. काहींना एक दोन नाही तर पाच दहा वर्षे लागली आहे. मला एक वर्ष लागेल होते.
- डॉ. ने दिलेल्या गोळ्या अजिबात बंद करू नका. जो पर्यत डॉ. सांगत नाही तो पर्यत.
- सकाळी सकाळी फिरायला जा. मोकळ्या हवेत. सकाळच्या गार वारेत. वर्ष दोन वर्षात तुम्ही पहिल्या सारखे व्हाल.
- काही काळ गोळ्यांचा साईड इफेक्ट आपल्या शरीरावर जाणवेल. मात्र बरे होण्यासाठी काही दुसरा पर्याय नसतो.
- हळू हळू बदाम, अंडी, फळे आणि व्यायाम सोबत योगा व पोहणे करून तुम्ही पूर्व पदावर याल.
depression हा डोक्यातील केमिकल लोच्याचा मुळे होतो.
काळ सर्व प्रश्नाचे उत्तर असते. थोडा वेळ जाऊ द्या. वरील सर्व गोष्टी हळूहळू सुरु करा. लवकर बरे व्हाल.