मतदान ओळखपत्र करिता अर्ज कसे कराल. | How to apply for Voter ID card
भारतात वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावतो येतो. मात्र, त्यासाठी आपल्या नावाची नोंदणी निवडणूक आयोगाकडे मतदार ओळखपत्र अर्ज करणे महत्वाचे आहे.
मतदान ओळखपत्र नोंदणी दोन पद्धतीने करू शकता.
मतदान ओळखपत्रसाठी ऑनलाईन अर्ज कसे कराल.
1. ऑफलाइन मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी तुम्हाला प्रथम फॉर्म 6 भरावा लागेल. बूथ लेव्हल ऑफिसर किंवा इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर यांच्या कार्यालयात तुम्हाला ते मोफत मिळेल. यानंतर, तो अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह (documents needed for voter id) तेथे सबमिट करता येईल किंवा ते पोस्टाद्वारे पाठवले जाऊ शकतात किंवा बूथ लेव्हल ऑफिसरकडे जमा करू शकता
मतदान ओळखपत्रसाठी ऑफलाईन अर्ज कसे कराल.
2. ऑनलाइन मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी (voter id registration) तुम्हाला प्रथम राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP) वर जावे लागेल. www.nvsp.in किंवा www.voterportal.eci.gov.in/# आहे. प्रथम Sign up करा. तुमची प्रोफाईल बनवा. ID पासवर्ड मिळेल. परत home पेज वर जा. ID पासवर्ड टाकून log in करा.
3. होम पेज वर ‘नवीन मतदार नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज करा’ वर क्लिक करा किंवा नवीन मतदार/मतदारवर क्लीक करा.
4. त्यावर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर एक फॉर्म दिसेल. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, तुमची जन्मतारीख भरायची आहे.
5. फॉर्मवर सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला काही कागदपत्रे (documents needed for voter id) अपलोड करावी लागतील. अपलोड करण्याच्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची माहिती मिळेल. याद्वारे तुमच्या जन्मतारखेची सत्यता पडताळली जाईल.
6. फॉर्म भरल्यानंतर आणि डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर, तुम्ही सर्व स्टेप पूर्ण केल्यावर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
7. या सर्व गोष्टी केल्यानंतर तुम्हाला ईमेल आयडीवर मतदार ओळखपत्राची लिंक पाठवली जाईल. जो मेल आयडी तुम्ही फॉर्म भरता प्रविष्ट केला आहे त्यावर. येथून तुम्हाला तुमच्या मतदार ओळखपत्राच्या निर्मितीशी संबंधित सर्व माहिती मिळेल.
8. वरील सर्व टप्पे पूर्ण केल्यानंतर आणि फॉर्म पूर्ण केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 1 महिन्यात नवीन मतदान ओळखपत्र मिळेल.

मतदार म्हणून नावनोंदणी करण्यासाठी रहिवासाचा & निवासाचा पुरावा (खालील पैकी एक पुरावा लागेल )
1) बँक/किसान/पोस्ट ऑफिस चालू पासबुक
2) शिधापत्रिका
3) चालक परवाना
4) भारतीय पासपोर्ट
5) इन्कम टॅक्स रिटर्न दाखल/असेसमेंट ऑर्डर
6) नवीनतम भाडे करार
7) नवीनतम पाणी/टेलिफोन/वीज/गॅस कनेक्शन बिल
8) टपाल विभागाच्या पोस्ट्स अर्जदाराच्या नावाने दिलेल्या पत्त्यावर प्राप्त / वितरित केल्या आहेत
9) बेघर / इतर
वय किंवा जन्मतारखेचा पुरावा (खालील पैकी एक पुरावा लागेल )
1) आधार कार्ड
2) पॅन कार्ड
3) चालक परवाना
4) भारतीय पासपोर्ट
5) इयत्ता दहावी/इयत्ता आठवी/इयत्ता पाचवीची मार्कशीट, जर त्यात जन्मतारीख असेल
6) शाळा/इतर शैक्षणिक संस्था (सरकार/मान्यताप्राप्त), शेवटचे शिक्षण घेतलेले जन्म प्रमाणपत्र
7) महानगरपालिका प्राधिकरणाने दिलेला जन्म दाखला
8) जन्म आणि मृत्यूचे निबंधक
9) बाप्तिस्मा प्रमाणपत्र