संघटना म्हणजे काय | Benefits of being in an organization
भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना कलम-19 अंतर्गत स्वातंत्र्याचा हक्क बहाल केले आहेत. या हक्कामुळे नागरिकांना निशस्त्र एकत्र येवून शांततापूर्वक सभा भरविता येते. संस्था व संघटन स्थापन करता येते. संविधानाने दिलेल्या या मुलभूत हक्कामुळे लोक हे संस्था व संघटना स्थापन करतात.
संघटना म्हणजे काय | What is organization
विशिष्ट विचार, हेतू किंवा उद्देशासाठी एकत्र येऊन तयार झालेला गट म्हणजे संघटना होय. अशी संघटनेची व्याख्या केली जाते.
आज अनेक संस्था आणि संघटना आपल्या देशात आहेत. काही अनैपचारिक ( नोंदणी न केलेल्या) असतात. तर काही या औपचारिक ( नोंदणी केलेल्या) असतात.
आपल्या आजूबाजूला जातीच्या, धर्माच्या, विविध समाजाच्या संघटना दिसतील. जसे व्याख्येत सांगितल्याप्रमाणे या त्या विशिष्ठ हेतू ठेऊन तयार झालेल्या असतात. त्यांचा उद्देश हा व्यापक हित साध्य करणे हा असतो.
भारतात कामगारांच्या हितासाठी कामगार organization बनलेल्या आहेत.
उदा.
- भारतीय मजदूर संघ
- अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस’ (आयटक)
- इंडियन नॅशनल ट्रेड युनियन कॉंग्रेस(इंटक)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ही एक संघटनाचा आहे. एक हिंदूत्ववादी संघटना आहे. या संस्थेने राष्ट्रभक्ती व संस्कृतीच्या प्रसार प्रसार व संवर्धनासाठी कार्यरत आहेत.
काही अंतरराष्ट्रीय organization सुद्धा आहे.
उदा.
- रोटरी क्लब,
- संयुक्त राष्ट्र संघटना (UN),
- नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO),
संघटनेत काय असते. संघटनेत राहिल्याने काय साध्य होते
संघटनेत राहण्याचे अनेक फायदे असतात. तुम्हांला कधी एकटे वाटणार नाही. संघटनेत राहिल्याने व्यक्तीला अनेक मुल्यांची रुजवणूक केली जाते. लोकांना त्यांच्या हक्काप्रती जागृत केले जाते.
- संघटनेत राहिल्याने व्यक्तीला आनंद मिळतो .
- संघटनेतील लोकांमध्ये नेहमी संघटनेच्या उद्देशाला घेऊन उत्साह असतो.
- संघटनेत व्यक्तीला ध्येय व उद्दिष्टे साध्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
- संघटनेतील व्यक्तीव्यक्ती मध्ये जिव्हाळा असतो आणि एकमेकांची काळजी असते.
- संघटनेतील व्यक्तीत नेहमी सुसंवाद असतो. आणि व्यक्तीला सहकार्य मिळते.
- संघटनेत व्यक्तीला शक्ती मिळते. संकटात दिलासा मिळतो.
- संघटनेत व्यक्तीचे प्रबोधन होते.संघटनेत आदर मिळतो.
- व्यक्तीला प्रेम, आपुलकी, आपलेपणाची भावना संघटनेत राहूनच विकसित होते.
- व्यक्तीचे संघटन कैशल्य वाढते, संघटीत राहिल्याचे फायदे त्यास कळतात.
- हक्कची लढाई लढण्यासाठी संघटन महत्वाचे असते.
- व्यक्तीची विचारसरणी आणि विचारधारा तयार होते.
- व्यक्तीची ओळखत तयार होते.
हेही वाचा :- Civil Society As Social Institution | सिव्हील सोसायटी एक सामाजिक संस्था आहे.
नेटवर्क म्हणजे काय? | What Is Network In Marathi