नियोजन | धोरणात्मक नियोजन | Strategic Planning
तुम्ही हे वाक्य नक्की वाचले असालच, नियोजन ही यशस्वी जीवनाची पहिली पायरी आहे. आपल्या दैनंदिन जीवनात नियोजनाला खूप महत्व असते. आपण अनेक गोष्टी करताना करताना प्लान करतोच. सामान्य माणसे त्यांचे प्लान हे तोंडी करतात. केलेले प्लान डोक्यात ठेवतात. हेच जर आपण काम करण्याआधी लिहून ठेवले आणि काम झाल्यावर काय झाले आणि काय नाही झाले यांचा जर अंदाज घेऊन पुढील प्लान केले तर तेच काम अधिक चांगल्याप्रकारे होऊ शकते.
नियोजन म्हणजे काय?
ठरवून केलेले काम म्हणजे एक एक नियोजनच असते. लिखित स्वरूपात ज्या गोष्टी आपण ठरवतो, त्याला त्याला प्लानयोजन आपण म्हणतो. आपण एक तासाचे, एक दिवसाचे आणि एक आठवडा, पंधरवडा, महिना आणि वर्षाचे प्लान आपण करीत असतो.
प्लान करण्याच्या अनेक गोष्टी आहे. अनेक प्रकार आहेत. अनेक पद्धती आहेत. नवनवीन पद्धतीने आपण प्लान करू शकतो.
आता आपण वळूयात धोरणात्मक नियोजनाकडे.
धोरणात्मक नियोजन म्हणजे काय?
हा एक प्रकारचे नियोजनच आहे, पण थोडे दूरदृष्टी ठेवून केलेले हे प्लान असते. हे प्लान दैनिक ढोबळ नियोजनासारखे नसते. हे प्लान ध्येय, व्हिजन, मिशन आणि उद्दिष्टे ठेऊन दीर्घकालीन कृती योजना करण्याबाबतचे प्लान करण्यात येते.
धोरणात्मक योजना हा एक औपचारिक दस्तऐवज आहे जो एखाद्या संस्थेची व्हिजन, मिशन, ध्येय, उद्दिष्टे ही ठरविलेल्या कालावधीत, साधारणपणे 3-5 वर्षांमध्ये यश मिळविण्यासाठी मार्गदर्शन करण्यास मदत करतो.
धोरणात्मक नियोजन प्रक्रियेमध्ये सहसा वरिष्ठ नेते, व्यवस्थापक, कर्मचारी आणि इतर प्रमुख भागधारकांसह विविध भागधारकांकडून इनपुट समाविष्ट असते. एकदा योजना विकसित झाल्यानंतर, ती संस्थेसाठी एक रोडमॅप म्हणून काम करते, निर्णय घेण्यास आणि संसाधन वाटपासाठी मार्गदर्शन करते जेणेकरून संस्था तिचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने योग्य दिशेने वाटचाल करत आहे.
योजनेमध्ये कार्यप्रदर्शन उपाय, टाइमलाइन, बजेट आणि प्रत्येक ध्येय साध्य करण्यासाठी विशिष्ट कृती चरणांचा समावेश असू शकतो. धोरणात्मक योजनेचा उद्देश एखाद्या संस्थेला तिच्या दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करणे, माहितीपूर्ण निर्णय घेणे आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे हे त्याचे ध्येय साध्य करण्यासाठी कार्य करते.
धोरणात्मक योजनात सुनियोजित गोष्टी असतात. संस्थेची ताकद, कमकुवतपणा, संधी आणि धोके (SWOT विश्लेषण) विचारात घेऊन एक योजना तयार करण्यात येते.
संस्था विकसित होत असताना आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीला प्रतिसाद देत असताना धोरणाची पुनरावृत्ती आणि नवीन अपडेट लक्षात घेऊन नियोजन अपेक्षित असते.
वैयक्तिक, किंवा व्यवसाय किंवा संस्थेचे ध्येय, व्हिजन, मिशन आणि उद्दिष्टे ठरवा
- स्वतःला किंवा तुमच्या व्यवसाय व संस्थेचे ध्येय ठरवा.
- ध्येयाला अनुसरून व्हिजन, मिशन ठरविणे.
- व्हिजन व मिशन याला धरून उद्दिष्टे ठरविणे.
- उद्दिष्टेनुरूप प्रकल्प तयार करणे.
- प्रकल्पांनुरूप विविध उपक्रम तयार करणे.
- उपक्रम उद्दिष्टे निश्चित करणे.
- उद्दिष्टानुरूप कृती कार्यक्रम तयार करणे.
- कृती कार्यक्रमाचे सुक्ष्म प्लान करणे.
- सुक्ष्म नियोजन मध्ये कृतीचे नाव, कृती करण्याचे उद्देश, कृती कशी करणार यांचे नियोजन ( पद्धती ), निर्देशांकांची मुद्दे, अपेक्षित परिणाम आवश्यक बजेट इत्यादी मुद्यांचा विचार करणे गरजेचे असते.
या सर्व गोष्टींचा समावेशन हे धोरणात्मक प्लान मध्ये येतो.
SWOT विश्लेषण करून करा टीमचे आणि संस्थेची क्षमता
SWOT विश्लेषण हे एक मूलभूत मूल्यांकन करण्याचे साधन आहे. याद्वारे व्यक्ती किंवा संस्था ही त्यांचे बलस्थाने आणि कमकुवतपणा पराखते. त्याचबरोबर त्यांच्यासाठी असणाऱ्या संधी समजून घेते. आणि संभाव्य धोके यांचा अंदाज घेते.