कमी झोपेचे दुष्परिणाम | Loss of Sleep in Marathi
पुरेशी झोप न घेतल्यामुळे अनुभवयास येणाऱ्या भावना व शरीरावर होणारा नकारात्मक परीणाम याबाबतची माहिती आपण कमी झोपेचे दुष्परिणाम | Loss of Sleep in Marathi या पोस्ट मध्ये पाहूया.
झोप कमी अथवा पूर्ण झाल्याबाबत शरीर देते माहिती.
तुम्हांला स्वःता ला वाटते का की माझी झोप पूर्ण झाली आहे ( भलेही तुम्ही 5 तास झोपले असाल.) येथे समजायला हरकत नाही की तुमची झोप व्यवस्थित झाली आहे.
तुम्हांला पुन्हा झोपावे असे वाटते ( भले ही तुम्ही 8 तास झोप घेतली असेल) येथे तुम्ही समाजवे की तुमच्या शरीराला आणखी आराम किंवा झोपेची गरज आहे. येथे व्यक्तीने कोणतेही उत्तेजक पदार्थ घेता कामा नये.
झोपेतून उठल्यावर तुमचे डोके जड आहे असे वाटणे. ( कमी झोपेचे दुष्परिणाम )
डोके जड होण्याची अनेक करणे आहे. हे लक्षात घ्या की अपुऱ्या झोपेमुळे सुद्धा होते डोके जड. डोक्यात एका विशिष्ट ठिकाणीच दुखण्याची, टोचण्याची अथवा अस्वस्थ करणारी संवेदना जाणवते. ( काही केसमध्ये ज्या व्यक्तींना नंबरचा चष्मा आहे. नंबर वाढल्यामुळे असे होऊ शकते. अनेक वेळा झोप घेऊन ही असे स्थिती जाणवत असेल तर तात्काळ डोळे तपास व सुधारित नंबरचा चष्मा लावावे. पुढील 5-7 दिवसानंतर वरील अनुभव आपणास येणार नाही)
कामाचे ताण आणि चिंता यामुळे झोप येत नाही. कमी झोपेचे दुष्परिणाम
झोपलेले असताना व सकाळी उठताना एखादे काम जे आपल्याकडून वेळेत होत नाही, किंवा करण्यास अवघड जातंय. किंवा नेमकी तयारी नसल्यामुळे रात्रभर तेच विचार डोक्यात राहून राहून येणे. सकाळी उठल्यावर तोच विचार डोक्यात घोळत राहणे.
कुणाशी मतभेद किंवा बिनसले तर त्यांचा झोपेवर परिणाम होते.
जर कोणासोबत आपले वैचारिक मतभेद झाले आहे. वादविवाद झाले आहे. तुम्ही कोणीही वेगवेगळ्या कारणाने दुखविले असल्यास अथवा तुम्ही कोणा-दुसऱ्या दुखविले असल्यास तो विचार सातत्याने राहून राहून येत असल्यास व सकाळी झोपेतून उठल्यावर तसेच वाटत असल्यास मात्र तुम्ही व्यवस्थित झोप झालेली नसते.
डिजिटल साधनांमुळे होतंय डोळ्यावर आणि झोपेवर घातक परिणाम ( कमी झोपेचे दुष्परिणाम )
मोबाईल व तत्सम साधनांमुळे आजकाल व्यक्ती खूपच एकलकोंडी झाली आहे. व्यक्तीचा जास्तीत जास्त वेळ हा या साधनांच्या वापराभोवती चे त्यामुळे रात्री उशिरापर्यंत विनाकारण अथवा वेबदुनियेतील उत्सुकतापोटी जागरण होते परिणामी झोप कमी होते आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो अंग जड होते.अशी अनेक कारणे आपल्याला सांगता येतील.
अपुरी झोपेमुळे कामावर लक्ष लागत नाही. आत्मविश्वास कमी होतो & दिवसभर थकल्या सारखे वाटत राहते.
अपुरी झोप घेतल्यामुळे आपला संपूर्ण दिवस ताण मध्ये जातो, कामावर लक्ष लागत नाही. आत्मविश्वास कमी होतो, विनाकारण चिडचिड आपण करतो. या सगळ्यांचा परिणाम आपल्याला कामावर अथवा विद्यार्थी असाल तर अभ्यास व शिकण्यावर होतो. अपुरी झोपेमुळे पाठीत ताण येतो आणि दिवसभर तुम्ही थकल्या सारखे वाटते. हे सगळे फक्त आणि फक्त अपुरी झोपेमुळे आपणास अनुभवयास येते.
सकाळी उठल्यावर दोन्ही डोळ्याच्या डाव्या व उजव्या कोपऱ्यात पाणी आल्यास समजावे झोप कमी झाली आहे.
9) अपुऱ्या झोपेमुळे सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा दोन्ही डोळ्याच्या डाव्या व उजव्या कोपऱ्यात पाणी येते. वारंवार आपण झोप कमी घेतली तर विस्मरणाचा धोका बळावतो.
झोप पुरेशी घेण्याचे जाणून घ्या फायदे | Benefits of sleep in Marathi