मुलभूत प्रथमोपचार | Basic First Aid in Marathi
आपण दररोज वर्तमान पेपर आणि TV मध्ये विविध अपघाताच्या बातम्या. दरवर्षी अनेक अपघात होतात. रस्ते अपघात, कीटक व प्राणी चावण्यानेअपघात होतो. एखादी वस्तू हाताळत असताना ही अपघात घडून शकतो. आपल्या आजूबाजूला असंख्य गोष्टी आहेत. नेहमीच आपण धकाधकीच्या आयुष्यात जगात असतो. जर कधी तुमचा किंवा तुमच्या ओळखीच्या अथवा अनोळखी व्यक्तीचा अपघात झालाच तर खालील मुलभूत प्रथमोपचार करण्याबाबतची मुलभूत माहिती असायलाच हवे. संकटात व अपघात घडल्यावर भल्याभल्यांचे डोकी काम करीत नाहीत. अश्या स्थितीमध्ये देवदूत म्हणून तुम्ही मदतीला जाऊ शकता.
खालील प्रत्येक काळजीपूर्वक वाचा.
श्वसन किंवा श्वास मंदावत असल्यास मुलभूत प्रथमोपचार काय कराल
अपघात किंवा अनेक इतर कारणांनी व्यक्ती अचाकन निपचित पडते. एकदमच काही समजत नाही. हळूहळू श्वास मंदावत जाते. अशा वेळी कृत्रिम श्वासोच्छ्वास द्या. ते तुम्ही दोन प्रकारे तत्काळ देऊ शकता एक तोंड ते तोंड आणि दुसरे तोंड ते नाक अश्या पद्धतीने देऊ शकता.
रक्तस्त्राव मुलभूत प्रथमोपचार
व्यक्ती पडला तर कुठेतरी शरीराच्या बाहेरील भागास इजा होते आणि त्यातून रक्त येण्यास सुरुवात होते. अश वेळी शक्य तितक्या लवकर रक्तस्त्राव थांबवा किंवा थांबविण्याचा प्रयत्न करा. आणि जखमेला उघडे न ठेवता जखमेचे रक्षण करा. .ड्रेसिंग केल्यावर झाकून ठेवा, पॅड आणि फर्म पट्टी लावा.नंतरजवळच्या मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टरकडे न्या. त्यांच्या सल्यानुसार पुढील गोष्ट करा.
फ्रॅक्चर्स
शरीराचा जो भाग तुम्हांला वाटतो की फ्रॅक्चर्स झाला आहे. त्यांची विशेष काळजी घ्या. दोन्ही बाजूने सपोर्ट देणाऱ्या चांगल्या पॅड ने त्यास स्थिर करा. तत्काळ जवळच्या डॉक्टरकडे जा. वेदनाशामक गोळ्या घ्या जर दुखत असल्यास. नंतर हाडांच्या दवाखान्यात जा.
चटका किंवा जळण असेल तर
आगीच्या उष्णतेमुळे आणिगरम वाफ, खूप गरम पाणी किंवा गरम तेल सारख्या गोष्टीमुळे आपल्याला चटका किंवा जळण होते. . ताबडतोब थंड पाण्याने जळण क्षेत्र थंड करा -15 मिनिटे. वेदना कमी होईपर्यंत. लक्षात ठेवा फोड आले असेल तर फोडू नका, किंवा जळलेल्यांवर काहीही लावा. निर्जंतुकीकरण किंवा स्वच्छ कापड, पॅड आणि पट्टीने झाकून ठेवा.
नाकातून रक्तस्त्राव
अश्या व्यक्तीस वारा लागेल अश्या दिशेला तोंड करून आणि डोके थोडे पुढे करून बसवा. त्याला तोंडाने श्वास घेण्यास सांगा आणि नाक न फुंकण्यास सांगा. नाकावर कोल्ड कॉम्प्रेस लावा. नाकाचा मऊ भाग 10 मिनिटांसाठी बोटांनी जवळ चिमटावा. मानेच्या मागच्या बाजूला आणि कपाळावर कोल्ड लावण्यास रक्तस्त्राव थांबविण्यास मदत होते.
मधमाशांचे चावणे.
मधमाशी डसलेल्या डंक दाबू नका. लचकन ( पाचवा ) वापरा आणि डंक काढा. थंड किंवा हलकास अमोनिया लावा. जे आपल्या लाघवी मध्ये आहे.
प्राण्यांचा चावा ( कुत्रा, मांजर किंवा इतर ) मुलभूत प्रथमोपचार
साबणाने आणि भरपूर पाण्याने धुवा. सैल पट्टी लावली बांधून घ्या. त्वरित वैद्यकीय मदत मिळवा.
साप चावल्यास
रुग्णाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यास धीर द्या. भरपूर पाणी आणि साबणाने धुवा. जबरदस्तीने चावलेल्या ठिकाणी घासू नका. जिथे चवले आहे त्या बाजूच्या हृदयाच्या एका बाजूला एक संकुचित पट्टी लावा. (20 मिनिटांपेक्षा जास्त काळ सतत लागू करू नये.) जखमेला कापू नका किंवा चोखण्याचा प्रयत्न करू नका. त्वरीत डॉ ची मदत मिळवा. साप ओळखण्याचा प्रयत्न करा.
बेशुद्ध पडल्यास
बेशुद्ध पडलेल्याला खाली झोपवा आणि छाती आणि कंबरेभोवतीचे कपडे सैल करा. डोके एका बाजूला वळवा. पाय थोडे वर करा. कोणतेही घन किंवा द्रव देण्याचा प्रयत्न करू नका. बरे झाल्यावर थोडेसे पेय देऊ शकता. आणि विश्रांतीनंतर उठून बसण्याची परवानगी बसण्यास सांगा.
सामान्य ज्ञान
जर तुम्हाला उपचाराबद्दल शंका असेल तर काहीही करू नका. तुम्ही अधिक नुकसान करू शकता हे लक्षात घ्या माहिती असेल तरच प्रयत्न करा.