सिव्हील सोसायटी | नागरी समाज | Role of Civil Society
आजच्या आपल्या समाजात नागरी समाजाची भूमिका खूप मोठी आहे. सिव्हील सोसायटी ही कुटुंब ( family ), राज्य (State ) आणि बाजारपेठा (Market ) या तिन्हींच्या नियंत्रणाबाहेरील असते.
सिव्हील सोसायटी म्हणजे काय?
सिव्हील सोसायटी मध्ये सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, संघटना आणि अशासकीय व बिगर बाजारपेठीय अश्या पासून हा समाज तयार होतो.
यामध्ये समाजातील विविध व्यक्ती आपल्या इच्छेने व स्वेच्छेने एकत्र येतात. संस्था व संघटना निर्माण करतात. समाजातील विविध प्रश्नांची, समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करतात. शांसनावर स्तरावर लोकांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात प्रभाव टाकतात. विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी प्रयत्न करतात.
नागरी समाज म्हणजे स्वयंसेवी, गैर-सरकारी, आणि ना-नफा संस्था आणि संस्थांचा वा व्यक्तींचा गट, जे कुटुंब, सरकार आणि उद्योग क्षेत्रापासून स्वतंत्रपणे कार्य करतात. या संस्था नागरिकांच्या हिताचे आणि मूल्यांचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्या अधिकारांचा प्रचार आणि संरक्षण करण्यासाठी तसेच सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बदलांसाठी समर्थन व प्रयत्न करतात.
सिव्हील सोसायटीमधील घटक
यामध्ये विविध स्वयंसेवी संस्था / संघटना ( NGO ), बिगर – सरकारी संस्था, राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, कामगार संघटना, इतर सेवाभावी संस्था यांचा समावेश होतो. यांच्यावर राज्यसंस्थेचे कोणतेही नियंत्रण नसते. व्यावसायिक नफा मिळविणे हा त्यांचा हेतू नसतो.
नागरी समाज संस्था अनेक रूपाने कार्यरत असतो. जसे की लोकांच्या प्रश्नांना घेऊन जनवाकल करणारा गट, तळागाळातील संस्था , धर्मादाय संस्था आणि सामाजिक चळवळी. ते स्थानिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करू शकतात आणि मानवी हक्क, पर्यावरण संरक्षण, लैंगिक समानता आणि सामाजिक न्याय यासारख्या विस्तृत समस्यांमध्ये सहभागी घेत असतात.
सिव्हील सोसायटीसमोर अनेक समस्या व आव्हाने
आज भारतासह जगभरातील सिव्हील सोसायटीसमोर अनेक समस्या व आव्हाने आहेत.
उदा.
- तीव्र राष्ट्रवाद
- भांडवलशाहीचा वाढता प्रभाव
- प्रादेशिक विषमता,
- भाषावाद,
- जातीयवाद.
- दहशतवाद
- गरिबी,
सिव्हील सोसायटी ने जर सुदृढपणे काम करावयास हवा असेल तर त्यांना विचार आणि कृतीचे स्वातंत्र्य मिळविण्याची ताकद यांच्यात असावी लागते. विचारविमर्श करणे, वादविवादाची तयारी असणे. भारतात अनेक सामाजिक चळवळी वर्षानुवर्षे अत्यंत प्रामाणिक व चोखपणे आपले काम पार पाडत आहेत.
उदा.
- शेतकरी चळवळी
- पर्यावरणवादी चळवळी ,
- स्त्रीवादी चळवळी ,
- मानवाधिकारांसाठीचा लढा
सर्वच स्वयंसेवी संस्था, संघटना, गट हे लोकशाहीचे पुरस्कर्ते व धर्मनिरपेक्ष विचारांचे नसतात. तसेच सर्वच स्वयंसेवी संघटनांची सामाजिक बांधीलकी, त्यांना असणारे सामाजिक भान, प्रश्नांची जाण व तळमळ सारखीच असते असे नाही.
भारतीय संविधानातील समाजवादी,धर्मनिरपेक्षता, लोकशाही न्याय, स्वातंत्र्य, समता, एकता व बंधुत्व ही मुल्ये टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने सक्रिय असणाऱ्या सिव्हील सोसायटीची गरज असते.
सिव्हील सोसायटी असते कशी.
- नागरी समाज व्यक्तिस्वातंत्र्यासाठी नेहमी जागरूक असते. .
- सिव्हील सोसायटीचे दैनंदिन व्यवहार, कार्य हे आधुनिकतेशी व समकालीन प्रश्नांशी सुसंगत असते.
- सिव्हील सोसायटीचे व्यवहार पारदर्शी असतात.
- ते सर्वांसाठी खुले असतात आणि ती धर्मनिरपेक्ष असतात.
- कोणाच्याही दबावाखाली त्या काम करत नाहीत.
- सिव्हील सोसायटीतील सदस्य हे मनापासून दृढनिश्चय व निर्धार करून मानवतेचे व्यापक हित साधण्याच्या उद्देशाने स्व-इच्छेने एकत्र आलेले असतात.
- त्याच्यावर कोणी लादलेले नसते. एक संकल्प करून त्याच्या पूर्णत्वाच्या उद्देशाने कार्यरत असतो.
- वैश्विक मानवी हक्क आणि मुल्यांवर त्यांची प्रागाड अशी श्रद्धा असते. त्यामुळे सिव्हील सोसायटी या दीर्घकाळ त्या टिकून राहतात.
- बळ किंवा ताकदीच्या जोरावर, जबरदस्तीने सिव्हील सोसायटीची निर्मिती होत नाही . त्यासाठी तिला इच्छाशक्तीची गरज भासते , संवेदनशीलता लागते.
नागरी समाज हे लोकशाही मूल्ये, उत्तरदायित्व आणि पारदर्शकता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते, तसेच नागरिकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आणि सत्तेत असलेल्यांना जबाबदार धरण्यासाठी जागा/ platform प्रदान पुरवितात. हे नागरिक आणि सरकार यांच्यातील पूल म्हणून काम करते, त्यांचा आवाज वाढवण्यास आणि त्यांच्या हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यास मदत करतात. एकूणच, नागरी समाज हा निरोगी आणि चैतन्यशील लोकशाहीचा एक आवश्यक घटक आहे.
सिव्हील सोसायटी रोल | Civil society roles pdf