उद्देशिका | Preamble in Marathi
आपल्या सर्वाना माहिती आहेच की आपल्या देश हा 15 ऑगस्ट-1947 रोजी स्वतंत्र झाला. 26 जानेवारी-1950 आपण प्रजासत्ताक राज्याची अमलबजावणी झाली. 26 नोव्हेंबर -1949 संविधानाचे लिखाणाचे काम संपले आणि ते स्वीकारण्यात आले. त्यावेळी ही संविधान उद्देशिका किंवा प्रतिज्ञा किंवा प्रास्ताविक म्हटली गेली.
उद्देशिका
आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम,
समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्यास, तसेच
त्याच्या सर्व नागरिकांना:
सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय,
विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्धित करनेचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आपल्या या संविधान सभेत आज दिनांक
नोव्हेंबर २६, १९४९ ला या संविधानला अंगीकृत,
अधिनियमीत करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.