मानवी हक्कांचा जाहीरनामा | Human Rights in Marathi
सन १९४५ साली संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली. १९४८ च्या डिसेंबर महिन्यात ‘:युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स ” म्हणजे “मानवी हक्कांचा जाहीरनामा” हा जाहीरनामा संपूर्ण मानवी समाजाच्या दृष्टीने महत्वाची घोषणा मानली जाते.
१० डिसेंबर हा मानवी हक्क दिन साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय समुदायाकडून दरवर्षी १० डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन पाळला जातो. १९४८ मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने मानवी हक्कांचा जाहीरनामा यांची घोषणा स्वीकारली म्हणून त्या दिवसाचे स्मरण म्हणून हा दिवस पाळला जातो.
मानवी हक्क कलम-1
सर्व माणसे किंवा व्यक्ती हे जन्मतः स्वतंत्र आहेत, व त्यांना समान प्रतिष्ठा व समान हक्क-आधिकार आहेत. त्याना प्रतिभा व् सदविवेकबुद्धि आहे. त्यानी परस्परांशी बंधूभावाने वागले पाहिजे.
मानवी हक्क कलम-2
प्रत्येक व्यक्तीला या जाहीरनाम्यात नमूद केलेले सर्व हक्क व सर्व प्रकारचे स्वातंत्र्याचा अधिकार आहे व ह्यात . वंश, रंग, वर्ण, लिंग, भाषा, धर्म, राजकीय किंवा इतर मतप्रणाली, राष्ट्र किंवा सामाजिक उगम, मालमत्ता, जन्म किंवा इतर कोणताही दर्जा या आधारे भेदभाव केला जाणार नाही.
. शिवाय, एखादी व्यक्ती ज्या देशाची किंवा प्रदेशाची आहे, त्या देशाच्या किंवा प्रदेशाच्या राजकीय, अधिकारक्षेत्रीय किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आधारावर कोणताही भेद केला जाणार नाही, मग ती स्वतंत्र असो, विश्वस्त असो, स्वयं-शासित असो किंवा सार्वभौमत्वाच्या इतर कोणत्याही मर्यादेखाली असो.
मानवी हक्क कलम-3
प्रत्येकाला जीवन जगण्याचा, स्वातंत्र्य उपभोगण्याचा व सुरक्षित असण्याचा हक्क-अधिकार आहे.
मानवी हक्क कलम-4
कोणालाही व्यक्तीला गुलामगिरीत किंवा दास म्हणून ठेवता कामा नये; सर्व प्रकारची गुलामी व गुलामांच्या व्यापारास मनाई असेल.
मानवी हक्क कलम-5
कोणाचाही छळ करता कामा नये. किंवा त्यास क्रूर, अमानुष किंवा अपमानस्पद कमीपणा आणणारी वागणूक देता कामा नये.
मानवी हक्कांचा जाहीरनामा नुसार मानवी हक्क कलम-6
सर्व व्यक्तींना सर्व ठिकाणी कायद्यासमोर माणूस म्हणून हक्क राहील.
मानवी हक्क कलम-7
सर्व लोक कायद्याच्या दृष्टीने समान आहेत व कोणताही भेदभाव न करता कायद्याचे सर्वाना समान संरक्षण मिळण्याचा हक्क राहील .
मानवी हक्क कलम-8
प्रत्येक व्यक्तीला आपले अधिकार आणि कर्तव्य तसेच गुन्हांच्या आरोपाबाबत स्वतंत्र व निपक्षपाती न्याययंत्रणेद्वारा उचित आणि जाहीर सुनावणीचा समान हक्क आहे
मानवी हक्क कलम-9
कोणालाही व्यक्तीला मनमानी पद्धतीने अटक, स्थानबद्ध किंवा हद्दपार केले जाणार नाही..
मानवी हक्क कलम-10
प्रत्येक व्यक्तीला आपले अधिकार आणि कर्तव्य तसेच गुन्ह्याचा आरोपाबाबत स्वतंत्र व निपक्षपाती न्याययंत्रणेद्वारा उचित आणि जाहीर सुनावणीचा समान हक्क आहे.
मानवी हक्क कलम-11
दंडनीय गुन्ह्याचा आरोप असलेली प्रत्येक व्यक्ती जोपर्यत कायद्यानुसार त्यावरील आरोप वा गुन्हे सिद्ध होत नाही तो पर्यत ती निरपराध मानली जाण्याची हक्कदार आहे.
मानवी हक्क कलम-12
कोणत्याही व्यक्तीस खाजगीपण, कुटुंब, घर आणि पत्रव्यवहार याबाबत मनमानी हस्तक्षेप केला जाणार नाही. तसेच आत्मसन्मान व प्रतिष्ठेवर हल्ला केला जाणार नाही. प्रत्येक व्यक्तीला अशा हा हस्तक्षेप व हल्ल्याविरुद्ध कायद्याच्या संरक्षणाचा हक्क आहे.
मानवी हक्क कलम-13
प्रत्येक व्यक्तीला राष्ट्राच्या हद्दीत किंवा सीमेच्या आत मुक्त संचार व वास्तव्य करण्याचा हक्क-अधिकार आहे.
मानवी हक्क कलम-14
प्रत्येक व्यक्तीला छळाच्या कारणासाठी अन्य देशात आश्रय घेण्याचा व तिथे राहण्याचा हक्क आहे
मानवी हक्क कलम-15
प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रीयत्वचा हक्क आहे. कोणीही व्यक्तीला राष्ट्रीयत्वाचा हक्कापासून तसेच राष्ट्रीयत्व बदलण्याच्या हक्कापासून मनमानी पद्धतीने वंचित केले जाणार नाही
मानवी हक्क कलम-16
सज्ञान पुरुष आणि स्त्रियांना वंश, राष्ट्रीयता, धर्म यांच्या कुठल्याही बंधनाशिवाय विवाह करण्याचा आणि कुटुंब वसवण्याचा अधिकार आहे. त्यांना विवाह विषयक, वैवाहिक जीवनविषयक आणि घटस्फोट विषयक समान हक्क आहेत.
विवाहास इच्छुक जोडीदारांच्या मुक्त आणि पूर्ण संमतीने विवाह होईल.
कुटुंब हा समाजाचा एक नैसर्गिक व मुलभूत समुच्चय घटक आहे. व त्याला समाज आणि राज्यसत्ता दोघांकडून संरक्षण मिळविण्याचा हक्क आहे.
मानवी हक्क कलम-17
प्रत्येक व्यक्तीला स्वतःला आणि तसेच दुसऱ्या सोबत संयुक्तपणे मालमत्ता धारण करण्याचा हक्क आहे.
कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या मालमत्तेपासून त्यांच्या मनमानीपणे वंचित करता येणार नाही.
मानवी हक्क कलम-18
प्रत्येक व्यक्तीला विचार, सदसदविवेकबुद्धी आणि धर्म यांच्या स्वतंत्र्याचा हक्क आहे. या हक्कात त्यांचा धर्म किंवा पंथ बदलण्याचा हक्क समाविष्ट आहे, आणि एकट्याने किंवा समाजात इतरांसह जाहीरपणे अथवा खाजगीत शिक्षण, आचरण, पूजा किंवा पालनाने त्यांचा धर्म किंवा पंथ प्रगट करण्याचा स्वतंत्र्याचा या हक्कात समावेश होतो.
मानवी हक्क कलम-19
प्रत्येक व्यक्तीला मत स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. या हक्कात कोणाचाही हस्तक्षेपाशिवाय आपली मते बनवण्याचा हक्क सामाविष्ट आहेत. तसेच या हक्कात कोणत्याही प्रसारमाध्यमांद्वारे आणि कोणत्याही सीमांचे बंधन न ठेवता माहिती मागविणे, मिळवणे आणि देणे याबाबतच्या स्वातंत्र्याचा समावेश आहे.
मानवी हक्क कलम-20
प्रत्येक व्यक्तीला शांतीपूर्ण सभा आणि संघटन स्वातंत्र्याचा हक्क आहे.
कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही सभा किंवा संघटनेत सामील होण्याची शक्ती केली जाणार नाही.
मानवी हक्क कलम-21
प्रत्येक व्यक्तीला आपल्या देशाच्या सरकारमध्ये प्रत्यक्ष किंवा मुक्तपणे निवडलेल्या प्रतिनिधीमार्फत भाग घेण्याचा हक्क आहे. प्रत्येकास आपल्या देशाच्या शासकीय सेवेत प्रवेश मिळण्याचा समान अधिकार आहे.प्रत्येक व्यक्तीला आपल्या देशातील सार्वजनिक सेवांमध्ये प्रवेश मिळवण्याचा समान हक्क आहे.
मानवी हक्क कलम-22
प्रत्येक व्यक्तीला समाजाचा सदस्य म्हणून सामाजिक सुरक्षेचा अधिकार आहे. आणि राष्ट्रीय प्रयत्न आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने तसेच प्रत्येक राज्याच्या संस्था आणि संसाधनाच्या आधारे आत्मसन्मान आणि व्यक्तिमत्त्वाचा मुक्त विकास यासाठी अनिवार्य असतील असे आर्थिक, सामाजिक सांस्कृतिक अधिकार प्राप्त करण्याचा हक्क आहे.
मानवी हक्क कलम-23
प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळण्याचा, आपल्या इच्छेनुरूप काम निवडण्याचा, कामाच्या न्याय्य व अनुकूल परिस्थितीचा फायदा मिळवण्याचा व बेकारीपासून संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला कोणत्याही भेदभावशिवाय समान कामासाठी समान वेतनाचा हक्क आहे.
प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीला स्वतःला व त्याच्या कुटुंबियांना मानवीय सन्मानासह जीवन जगण्याची सुनिश्चिती देईल अशा न्याय आणि यथोचित वेतनाचा हक्क आहे. आणि आवश्यक असल्यास सामाजिक सुरक्षेच्या अन्य साधनांनी त्याची परिपूर्ती केली जाईल.
प्रत्येकाला स्वतःच्या हिताचा संरक्षणासाठी मजूर संघटना स्थापण्याचा किंवा त्यात सामील होण्याचा हक्क आहे.
मानवी हक्क कलम-24
प्रत्येक व्यक्तीला विश्रांती आणि अवसर याचा हक्क आहे. या हक्कात कामाच्या तासांवर यथोचित मर्यादा आणि नियतकालिक रजेचा समावेश होतो.
मानवी हक्क कलम-25
प्रत्येक व्यक्तीला त्याचे स्वतःचे व त्याच्या कुटुंबीयांचे स्वास्थ व कल्याणास आवश्यक जीवनस्तराचा अधिकार आहे. त्यात अन्न, वस्त्र, निवारा, औषध उपचार व आवश्यक सामाजिक सेवांचा अंतर्भाव आहे आणि बेरोजगारी, आजार, अपंगत्व वृद्धापकाळ आणि व्यक्तीच्या नियंत्रणाबाहेरील परिस्थितीत इतर जीवनावश्यक वस्तूंचा अभाव या पासून सुरक्षितता मिळवण्याचा हक्क आहे.
मातृत्व व बालपण हे विशेष काळजी व सहाय्यास अधिकार प्राप्त आहे. सर्व बालकांना, ज्यांना जन्म लग्नसंबंधातून किंवा त्याबाहेर झाला असेल तरी समान सामाजिक संरक्षणाचा हक्क आहे.
मानवी हक्क कलम-26 | मानवी हक्कांचा जाहीरनामा in ENGLISH
प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क आहे. कमीत कमी प्राथमिक व सुरुवातीच्या काळातले शिक्षण हे मोफत असावे. प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे असावे. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण हे सर्वसामान्यपणे सर्वांना उपलब्ध असावे. आणि उच्च शिक्षण सर्व व्यक्तींना गुणावर आधारित समानते उपलब्ध असावे.
शिक्षणाचा उद्देश मानवी व्यक्तिमत्त्वाचा विकास व मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्याचा आदर वृद्धिंगत करणे हा असेल. ते सर्व राष्ट्रे, वांशिक व धार्मिक गट यामध्ये सलोखा, सहिष्णुता आणि मैत्रीभावनेचा प्रोत्साहन देणारे आणि शांततेच्या जपवणूकसाठी संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्रमांना पुढे नेणारे असेल.
आपल्या मुलांना कशा प्रकारचे शिक्षण द्यावे याची निवड करण्याचा माता-पित्यांना पूर्ण हक्क आहे.
मानवी हक्क कलम-27
प्रत्येक व्यक्तीला समाजाच्या सांस्कृतिक जीवनात मुक्तपणे सहभागी होण्याचा, कलांचा आस्वाद घेण्याचा आणि वैज्ञानिक प्रगती आणि त्याचे फायदे यात हिस्सा प्राप्त करण्याचा पूर्ण हक्क आहे.
प्रत्येक व्यक्तीला स्वनिर्मित वैज्ञानिक, साहित्यिक आणि कलात्मक कृतीतून निर्माण होणाऱ्या परिणाम स्वरूप नैतिक व भौतिक हिताच्या संरक्षणाचा हक्क आहे.
मानवी हक्क कलम-28
प्रत्येक व्यक्तीला या जाहीरनाम्यात वर्णन केलेले हक्क व स्वातंत्र्य याचे पूर्ण समाधान करेल अशा सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा हक्क आहे.
मानवी हक्क कलम-29
ज्या विशिष्ट समाजात तिच्या व्यक्तिमत्त्वाचा मुक्त आणि पूर्ण विकास शक्य आहे अशा समाजाप्रत त्या व्यक्तीची कर्तव्ये आहे
प्रत्येक व्यक्तीच्या हक्काच्या आणि स्वातंत्र्याच्या वापरावर एवढीच मर्यादा लावण्यात येईल की ज्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीचे हक्क आणि स्वातंत्र्याबद्दल योग्य मान्यता करणे सन्मान राखला जाईल. तसेच लोकशाही समाजात नैतिकता सार्वजनिक सुव्यवस्था आणि सर्वसाधारण कल्याणाच्या न्याय गरजा पूर्ण करण्यासाठी कायद्याने मर्यादा सुनिश्चित करण्यात येतील.
कोणत्याही परिस्थितीत हे हक्क व स्वातंत्र्य संयुक्त राष्ट्राच्या उद्देश व तत्वाच्या विरोधात वापरले जाणार नाही.
मानवी हक्क कलम-30
या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेल्या कोणत्याही हक्काचा किंवा स्वातंत्र्याचा ऱ्हास होईल असे कृत्य किंवा कार्य कोणतेही राज्य समूह किंवा व्यक्ती करू शकेल अशा पद्धतीने या जाहीरनाम्यातील कोणत्याही बाबीची चा अर्थ लावला जाऊ नये.
मानवी हक्कांचा जाहीरनामा आणि कोव्हेनन्ट्स | आंतरराष्ट्रीय करारनामे
या विश्वघोषणेनंतर संयुक्त राष्ट्रसंघाने विविध हक्कांची विस्तृत आणि सखोल व्याख्या करण्यासाठी वेळोवेळी विशिष्ट ‘ कोव्हेनन्ट्स ‘ म्हणजे आंतरराष्ट्रीय करारनामे प्रसृत केले आहेत. कालानुक्रमे पाहिले असता या आंतरराष्ट्रीय करारनाम्यात १९६६ मध्ये खालील तीन विशेष महत्वाचे ठरतात .संमत झालेला
- आर्थिक , सामाजिक व सांस्कृतिक हक्कांचा आंतरराष्ट्रीय करारनामा
- नागरिक आणि राजकीय हक्कांचा आंतरराष्ट्रीय करारनामा आणि
- नागरिक आणि राजकीय हक्कांच्या आंतरराष्ट्रीय करारनाम्याचा वैकल्पिक मसुदा
मानवी हक्कांची विश्वघोषणा तसेच वर उल्लेखिलेले तिन्ही दस्तऐवज याना संयुक्तपणे दि इंटर नॅशनल बिल ऑफ ह्युमन राईट्स किंवा मानवी हक्कांची आंतरराष्ट्रीय सनद म्हणून सर्व जगभर मान्यता मिळालेली आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने वरील तिन्ही करारनामे संबंधीत राष्ट्रांवर बंधनकारक मानले जात असले तरी मानवी हक्कांचा जाहीरनाम्यातील घोषणा बंधनकारक मानली जात नाही.