QUIZ on Social Exclusion | सामाजिक वर्जीतता
QUIZ on Social Exclusion | सामाजिक वर्जीतता या पोस्ट मध्ये तुम्ही सामाजिक वर्जीतता किंवा वंचितता म्हणजे काय? त्यांचा अर्थ शब्दाचा उगम, भारतातील प्रमुख सामाजिकदृष्ट्या वंचित गट, गरिबी आणि सामाजिक वंचितताचे करणे ई. FAQ आपणास प्रश्ने व उत्तरे मिळतील.
जर आपणास खाली FAQ दिसत नसतील तर पुढील लिंकवर जाऊन क्लिक करा प्रश्ने व उत्तरे मिळवा. QUIZ on Social Exclusion.
सामाजिक वंचितता किंवा वर्जीतता या संकल्पनेवरील प्रश्ने व उत्तरे
सामाजिक वर्जीतता (Social Exclusion ) ही एक महत्त्वपूर्ण समाजशास्त्रातील संकल्पना आहे. या शब्दाचे मूळ ( Social Exclusion ) फ्रान्समध्ये झाल्याचे आढळते. 1970 च्या दशकातील सामाजिक संरक्षणाच्या संदर्भात गणले न गेलेले लोकसमूह ( वगळलेले ) जसे एकेरी पालक, विकलांग, विम्याचे संरक्षण प्राप्त न झालेले कामगार यांना उद्देशून ‘सामाजिक वंचितता’ शब्द वापरला गेला होता.
- सामाजिक वंचितता ही एक प्रक्रिया आहे की, ज्याद्वारे एखाद्या संपूर्ण गटातील किंवा श्रेणीतील लोक सामाजिक जीवनात आवश्यक असणाऱ्या सहभागापासून निष्कासित केले जातात.
- सामाजिक वंचिततेच्या प्रक्रियेत लोक समाजातील मुख्य प्रवाहाच्या सहभागापासून दूर ढकलले जातात. सामाजिक वंचितता जात, वर्ग, संस्कृती, वर्ण, वंश, ग्रामीण, शहरी, आदिवासी, गरिबी, लिंग, वांशिक, वय अशा अनेक आयामांसह भेदभाव दर्शविते. अशा गटांना सामाजिक सेवांची उपलब्धता, संधी आणि श्रमिकांच्या बाजारपेठेत त्यांच्या सहभागाच्या संधींवर मर्यादा आणते.
- सामाजिक वर्जीतता ही एक जटिल व बहुआयामी प्रक्रिया आहे. यामध्ये समाजातील सर्वसामान्य लोकांना आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या क्रिया-प्रक्रियांमध्ये सहभागी होण्याची असमर्थता, वस्तू व सेवांचा अभाव, अधिकार यांचा समावेश होतो. यामुळे व्यक्तीच्या व त्या अनुषंगाने त्या गटाच्या जीवनाची गुणवत्ता आणि म्हणून संपूर्ण समाजाचे एकत्रीकरण, एकात्मिकता या दोन्हींवर परिणाम होतो.
भारतातील प्रमुख सामाजिकदृष्ट्या वंचित गट
- अनुसूचित जाती Scheduled caste (SC)
- अनुसूचित जमाती Scheduled tribes (ST),
- विमुक्त जाती व भटक्या जमाती Vimuk Jati, & Nomadic Tribes ( VJNT/ NT DNT
गरिबी आणि सामाजिक वंचितताचे करणे पुढीलप्रमाणे
- संसाधनाचा अभाव असणे.
- रोजगाराच्या किंवा कामाच्या संधीचा अभाव असणे.
- शिकण्याची संधी न मिळणे.
- चंगल्या आरोग्यच्या सोयी न मिळणे.
- राहण्यासाठी जागा व स्वःता घर नसणे.
- कौटुंबिक जीवना विस्कळीतपणा असणे, नातेसंबंधाचा आधार नसणे.
- योग्य ठिकाणी राहण्याचे वसतीस्थान नसणे / चंगला शेजारी नसणे.