वर्गाची वैशिष्ठ्ये | Characteristics of class system
वर्ग व्यवस्थेमध्ये गतीशिलातेला वाव असतो. वर्ग हे खुले स्तरीकरण आहे. एकाच प्रकारची आर्थिक स्थिती असणाऱ्यांना लोकांचा वर्ग बनतो. अश्या वर्गातील लोकांचा अर्थव्यवस्थेतील त्यांचे स्थान हे समान असते. जाती व्यवस्थेत व्यक्तीला मिळालेला सामाजिक दर्जा बदलता येत नसते. मात्र वर्ग व्यवस्थेत व्यक्ती स्वकष्टाने शिक्षण, कौशल्य विविध क्षमता, पात्रता आत्मसात करून समाजातील उच्च दर्जा हशील करू शकते. त्यामुळे आज SC, ST वVJNT संवर्गातील व्यक्ती IAS व IPS झालेली आपणास दिसून येईल. या पोस्टमध्ये आपण वर्गाची वैशिष्ठ्ये पाहणार आहोत.
वर्गाची वैशिष्ठ्ये | Characteristics of class system
जन्माचा आधार नाही.
वर्ग व्यवस्थेत जातीव्यवस्थेप्रमाणे जन्माचा आधार नसतो. व्यक्ती कोणत्याही जातीत जन्मलेली असेल तरी ती प्रगती करू शकते. कोणतेही काम करू शकते. त्याला वाटेल ते शिक्षण घेऊन शकते.
सामाजिक व्यवहारावर निर्बंध नसतात.
व्यक्तीला सामाजिक जीवन जगण्यास, अनेक अनेक गोष्टी करण्यास मुभा असते.
व्यवसाय निवडीचे स्वतंत्र असते.
वर्ग व्यवस्थित कोणत्याही व्यक्तीस कोणताही व्यवसाय आपल्या इच्छेनुसार व क्षमतेनुसार करण्याची संधी उपलब्ध असते. जातीव्यवस्थेप्रमाणे एक व्यवसाय करण्याचे बंधन येथे नसते. व्यक्ती त्याला हव्या असणारा व्यवसाय व नोकरी करण्याच्या अनुशंगाने अनेक कैशाल्ये, प्रशिक्षण व क्षमतांचा विकास या प्रकारच्या वर्गव्यवस्था असणाऱ्या समाजात विकसित करण्याची सोय असते.
विवाहाचे जोडीदार निवडण्यावर निर्बंध नसतात.
वर्गव्यवस्थेत लग्न करता व्यक्ती किंवा कुटुंबाचा आर्थिक दर्जा पाहिला जातो. त्यांची जात पाहिली जात नाही. जातीव्यवस्था ही अंतर्विवाही गट असतो. वर्ग व्यवस्थेत जोडीदार निवडीला स्वतंत्र असते.
समान संधी आणि अधिकार- वर्गाची वैशिष्ठ्ये
भारतीय संविधानाने सर्वाना समान हक्क- अधिकार दिला आहे. कोणाला ही जात, धर्म, वंश, ठिकाण आणि लिंग यांच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. त्यामुळे सर्वाना वर्गव्यवस्थेत समान संधी आणि अधिकार मिळते. प्रगती करण्यास वाव असतो. ज्याच्या त्यांच्या वैयक्तिक ज्ञान, कौशल्य आणि क्षमता प्रमाणे समाजातील दर्जा व स्थान व्यक्तीला मिळू शकते.
अर्जित दर्जा महत्वचा असतो.
ज्या गोष्टी स्वकष्टाने प्रयत्नपूर्वक आपल्याला घ्याव्या किंवा मिळवाव्या लागतात त्यांना आपण अर्जित दर्जा असे म्हणतो. त्यामुळे कष्ट करणाऱ्यांना वाव असतो. आज आपल्या समाजात कोणतीही व्यक्ती मेहनत करून, शिक्षण घेऊन आपला सामाजिक दर्जा वाढवू शकते.
गुणांना वाव
वर्गव्यवस्थेत व्यक्तीच्या कलागुणांना वाव मिळतो, कौशल्य आणि गुणांना आधारावर त्याला चांगल्या नोकरीच्या किंवा व्यवसाय करण्याच्या संधी उपलब्ध होतात.
सामाजिक वर्गाचे निकष | Determinants of social class
समाजात वर्गाचे निकष ठरविणारे विविध निकष आहेत.
1.मिळकत व संपत्ती ( wealth and income )
2.व्यवसाय (occupation )
3.शिक्षण ( education )
4.घराण्याची प्रतिष्ठा (family prestige )
5.सत्ता (powar )
6.वसतीस्थान व राहणीमान Location of residences and standard of living )
वरील घटक हे व्यक्तीचे वर्ग निश्चितीचे निकष म्हणून काम करतात.
वरील पोस्ट संदर्भातील मागील पोस्ट येथे वाचा. :- वर्ग | Class | What is Class system