असमानता | विषमता | Social inequality | Asamanata
सामाजिक असमानता ही समाजशास्त्रातील एक मुलभूत संकल्पना आहे. समाजात सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांचे विषम पद्धतीने वितरण झालेले असते. त्यामुळे समाजातील व्यक्ती, समूहात व समाजात असमानता निर्माण होते. जातीव्यवस्था हे भारतीय समाजाचे खास वैशिष्ट्ये आहे. आज ही जातीच्या आधारावर आपल्या समाजात भेदभाव केला जातो.
सामाजिक असमानता म्हणजे काय| what is social inequality
असमानता म्हणजे विषमता होय. थोडक्यात आपण म्हणू शकतो की, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, धर्म, जात, वर्ग, वंश, वर्ग संपती, लिंग, स्थान या आधारे समाजात आढळून येणारी असमानता म्हणजेच विषमता होय. यामुळे आहेरे व नाहीरे असे दोन वर्ग तयार होतात.
आहेरे म्हणजे काय ? तो कसा
आहेरे म्हणजे ज्याच्याकडे सर्व काही आहे. गरज नसतानाही त्यांच्याकडे मोठ्याप्रमाणात संपत्ती व संसाधने असतात.
नाहीरे म्हणजे काय ? तो कसा सामाजिक असमानता यामुळे बनतो.
समाजातील अशी व्यक्ती किंवा समूह ज्याकडे काहीच नाही श्रम करून जगणारी. जीवनावश्यक मुलभूत गोष्टीचा त्यांच्या कडे अभाव असतो. कोणत्याही प्रकारचे संपती व संसाधनाचा अभाव त्यांच्याकडे असतो.
सामाजिक असमानता व्याख्या | Social inequality definition
सामाजिक विषमता ( Social inequality ) म्हणजे समाजातील व्यक्ति – व्यक्ती वा समूहा – समूहात विशेषाधिकार, भौतिक पारितोषिके, संधी, सत्ता, प्रतिष्ठा , प्रभाव यांचे होणारे विषम वितरण होय.
टिशलेर , व्हायटन आणि हंटर यांनी केलेली सामाजिक असमानता यांची व्याख्या
सामजिक विषमता जेव्हा समाज – संरचनेचा भाग बनते तेव्हा सामाजिक स्तरीकरण अस्तित्वात येते . समाजातील विविध सामाजिक संस्थांद्वारा मग अस्तित्वात आलेली स्तरीकरण व्यवस्था टिकवून ठेवली जाते.
सामाजिक असमानतामुळे विविध सामाजिक स्थाने व दर्जा असलेले व्यक्ती व समूह बनतात.
समाजात व्यक्तीला दोन पद्धतीने स्थान मिळत असते. एक जन्माने तर दुसरे हे स्वकष्टाने. जन्माने जेभी काही आपल्याला मिळते त्याला अर्पित दर्जा असे म्हणतात. स्वकष्टाने जेभी काही आपण मिळवतो त्याला अर्जित दर्जा असे म्हणतो.
व्यक्तीं या विविध भूमिका त्यांनी योग्य रीतीने वठवाव्या म्हणून पारितोषिके दिली जातात.
व्यक्ती योग्य पद्धतीने त्याला दिलेली भूमिका किंवा जबाबदारी वठवावी म्हणून काही पारितोषिके दिली जातात. ही पारितोषिके पैशाच्या स्वरूपात जशी असतात ( उदा. वेतन किंवा पगार ) तशीच भौतिक वस्तूंच्या रूपात ( उदा. बंगला, गाडी, टेलिफोन, फॅक्स इ ) किंवा आत्मसन्मान, प्रतिष्ठा, सत्ता या स्वरूपातही असतात. या गोष्टी समाजातील सर्वाना सारख्या प्रमाण दिल्या जात नाहीत. त्यामुळे समाजात सामाजिक असमानता आढळून येते.