सामाजिक स्तरीकारणाची वैशिष्ठ्ये | Characteristics of Social Stratification
विषमता हे सामाजिक स्तरीकारणाचा आधार असतो. अनेक सामाजिक घटकांच्या (सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा आर्थिक दर्जा, व्यवसाय, शिक्षण, सत्ता व प्रतिष्ठा, वर्ण, जात, लिंग, वय, घराणे ) आधारावर सामाजिक स्तरीकरण आढळून येते. मागील पोस्ट मध्ये स्तरीकरणाचे प्रकार पाहिले. या पोस्टमध्ये सामाजिक स्तरीकारणाची वैशिष्ठ्ये हे पाहणार आहोत.
सामाजिक स्तरीकारणाची वैशिष्ठ्ये | Characteristics of Social Stratification
सामजिक स्तरीकरण हे सर्वत्र आढळून येते.
सर्व जगातील समाजात व सामाजिक समूहात सामाजिक स्तरीकरण आढळून येते. प्राचीन काळी तसेच आधुनिक काळात ही आपल्याला सामाजिक स्तरीकरण दिसते.
उदा. प्राचीन काळी वर्णव्यवस्था होती व्यवस्थेतून जाती व्यवस्था तयार झाल्या. तर आधुनिक काळामध्ये वर्ग व्यवस्था तयार झाले आहे. व्यक्तीचे ज्ञान, शिक्षण, कौशल्य, पात्रता याच्या आधारावर कोणतेही व्यक्ती समाजातील कोणतेही पद, दर्जा किंवा स्थान मिळू शकतात.
सामजिक स्तरीकरण अस्तित्वात येण्यासाठी सामाजिक घटकांचा आधार असतो.
सामजिक स्तरीकरण हे मानवनिर्मित आहे. ते निसर्गनिर्मित नाहीत. समाजात सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा याची विषम वाटप झालेले असते आणि त्यातून मग समाजामध्ये विविध सामाजिक स्थान असणारे सामजिक समूह निर्माण होतात.
या व्यतिरिक्त सामाजिक स्तरीकरणाचे अनेक निकष आपल्या समाजामध्ये आढळून येतात. व्यक्तीच्या आर्थिक दर्जा, व्यवसाय, शिक्षण, सत्ता व प्रतिष्ठा, वर्ण, जात, लिंग, वय, घराणे इत्यादी सामाजिक स्तरीकरणाचे आपल्याला निकष सांगता येईल. यावरून आपल्याला सांगता येईल की सामजिक स्तरीकरणास सामाजिक आधार असते.
सामाजिक स्तरीकरण मध्ये समाजाची श्रेणीबद्ध रचना असते.
आपण मागील पोस्टमध्ये पाहिले की, समाजातील विविध स्तरांची दर्जाच्या आधारे झालेली अशी उतरंडी सारखी रचना म्हणजे सामाजिक स्तरीकरण होय. स्तरीकरण म्हणजे नुसते अनेक सामाजिक स्तर नव्हे तर त्या स्तरांची श्रेणीबद्ध अशी रचना किंवा व्यवस्था असते.
समाजात फक्त 1-टक्के लोकांकडे प्रचंड प्रमाणामध्ये सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा त्यांच्याकडे आहे. तर समाजातील 99 टक्के लोकांकडे तिन्ही घटकांचा अभाव असतो. म्हणून तर एली चिनॉय यांच्या मते “श्रेष्ठ आणि कनिष्ठ , श्रीमंत आणि गरीब , सत्ताधारी आणि सत्ताविहीन यांच्यातील तफावत किंवा भेद हा सामाजिक स्तरीकरणाचा गाभा होय”.
सामाजिक स्तरीकरण हे प्रक्रियेद्वारे व्यवस्थेत हळूहळू काळाप्रमाणे बदल होत जाऊन अस्तित्वात येते.
सामाजिक स्तरीकरण हे अचानकपणे किंवा एका रात्रीत समाजात निर्माण झालेली नाही. तर समाज विकासाच्या प्रक्रियेत ते हळूहळू निर्माण झाले आहे.
सामाजिक स्तरीकरण ही एक प्रक्रिया आहे. ही निरंतर चालणारी प्रक्रिया म्हटले तरी चालेल. एकदा निर्माण झालेली सामाजिक स्तरीकरण व्यवस्था अगदी जशीच्या तशी कायम राहत नाही तर प्रक्रियेद्वारे त्या व्यवस्थेत हळूहळू काळाप्रमाणे बदल होत जाऊन अस्तित्वात येते.
सामाजिक स्तरीकरण हे श्रेष्ठ आणि कनिष्ठ या तत्त्वावर आधारलेले असते.
आपल्या समाजामध्ये सर्वजण सारखे नसतात आणि सर्वांना सारखे लेखले जात नाहीत. कारण समाजातील व्यक्ती व समूह मध्ये सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा याचे विषम वितरण झालेले असते.
त्यामुळे समाजामध्ये कोणीतरी सर्वात श्रेष्ठ, दुसरा त्याहून कमी श्रेष्ठ आणि तिसरा त्याहून कमी दर्जा असणारा असे समाजातील वेगळे स्थान किंवा दर्जा धारण करणारे समूह निर्माण झालेले असतात.
वरील पोस्ट संदर्भातील मागील पोस्ट येथे वाचा :-सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार | Types of Stratification | Forms of Social Stratification
वरील पोस्ट संदर्भातील पुढील पोस्ट येथे वाचा