सामाजिक स्तरीकरण | Social stratification in sociology
कोणत्याही समाजात सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांचे विषम पद्धतीने वितरण झालेले असते. या विषम वाटपामुळे समाजाचे भिन्नभिन्न दर्जा व वर्गांमध्ये स्तरीकरण होते. ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा आहे तो जास्त श्रीमंत बनतो. यापैकी ज्यांच्याकडे दोन गोष्टी आहेत तो गरीबापेक्षा अधिक श्रीमंत होतो. ज्यांच्या कडे या तिन्हीही गोष्टी नाहीत, त्यांच्या सामाजिक दर्जा सर्वात खाली असतो.यामुळे कोणीतरी गरीब असतो तर कोणीतरी श्रीमंत बनतो. कोणता तरी समूह हा श्रेष्ठ बनतो, तर कोणता तरी समूह कनिष्ठ. म्हणजेच एक प्रकारे समाजाचे वेगवेगळ्या स्तरामध्ये विभागणी झालेली असते. या पोस्टमध्ये आपण सामाजिक स्तरीकरण ( Social stratification ) ही समाजशास्त्रातील एक मूलभूत संकल्पना पाहणार आहोत. ही संकल्पना पाहण्याआधी आपण स्तरीकरण म्हणजे काय हे पाहू.
स्तरीकरण अर्थ | Meaning of Stratification
स्तरीकरण (Stratification) हा इंग्रजी शब्द Stratum या मूळ शब्दापासून बनला आहे. ‘Stratum’ हा ग्रीक शब्द आहे , त्याचा अर्थ layer म्हणजे ‘ थर ‘ किंवा ‘स्तर’ होय. ‘Strata’ म्हणजे अनेक स्तर, आता या स्तरांची जी रचना तयार होते तिचा निर्देश करणारा इंग्रजीतील stratification हा शब्द वापरतात. ‘stratification’ म्हणजे नुसते अनेक सामाजिक स्तर नव्हेत तर त्या स्तरांची श्रेणीबद्ध अशी रचना किंवा व्यवस्था असते.
सामाजिक स्तरीकरण म्हणजे काय | What is social stratification
समाजातील विविध स्तरांची दर्जाच्या आधारे झालेली अशी उतरंडी सारखी रचना म्हणजे सामाजिक स्तरीकरण होय. समाजाची विभागणी ही अनेक स्तरात झालेली असते. हे स्तर दर्जेच्या आधारावर ठरतात. उदा. आर्थिक दर्जावरून समाजाचे तीन प्रमुख स्तर पडतात. उच्च वर्ग ( Upper class ), मध्यम वर्ग (middle class) & कनिष्ठ वर्ग ( lower class ). जातीच्या आधारावरून समाजाचे श्रेष्ठ आणि कनिष्ठ असे समाजाचे प्रकार पडतात. राहण्याच्या वास्तव्याच्या ठिकाणावरून शहरी , ग्रामीण आणि जगलात राहणाऱ्या समाज अशी प्रकार पडतात. आपल्या समाजामध्ये भेद हे काही मानव निर्मित असते, तर काही निसर्गनिर्मित असतात. उदा. व, लिंग आणि वर्ण हे निसर्गनिर्मित भेद आहेत परंतु जेव्हा या भेदांना समाजाकडून श्रेष्ठ- कनिष्ठ अर्थ लावतात तेव्हा त्याला सामाजिक स्तरीकरण असे म्हणतात.
सामाजिक स्तरीकरण व्याख्या | Definition of Social stratification
एली चिनॉय -“श्रेष्ठ आणि कनिष्ठ , श्रीमंत आणि गरीब , सत्ताधारी आणि सत्ताविहीन यांच्यातील तफावत किंवा भेद हा सामाजिक स्तरीकरणाचा गाभा होय”.
सामाजिक स्तरीकरण या संकल्पनेच्या विविध समाजशास्त्रज्ञ यांनी केलेल्या व्याख्या येथे वाचा
सामाजिक स्तरीकरणाचा अर्थ | Meaning of Social stratification
- सामाजिक स्तरीकरणामध्ये समाजाची उतरंडी सारखी रचना/व्यवस्था असते.
- श्रेष्ठ – कनिष्ठ या तत्वावर ही रचना तयार झालेली असते.
- सामाजिक स्तरीकरणाचा विषमता ( inequality ) हा प्रमुख आधार असतो.
- विविध सामाजिक स्थाने आणि भूमिका याप्रमाणे दर्जा व पारितोषिकाचे ( असमान ) वितरण होते.
- दर्जा व पारितोषिकांचा असमान वितरणामुळे विभिन्न दर्जाचे अनेक स्तर समाजात अस्तित्वात येतात.
- एकावर एक रचल्या गेलेल्या विभिन्न स्तराची जी रचना तयार होते तिलाच सामाजिक स्तरीकरण असे म्हणतात.
- विषमतेवर आधारित अशी ही स्तरीकरणाची व्यवस्था त्या त्या समाजाच्या संरचनेचा एक भाग बनते आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केली जाते.
- समाजातील प्रमुख सामाजिक संस्थांद्वारे स्तरीकरण व्यवस्थेचे सातत्य टिकवून ठेवले जाते.
वरील पोस्टसंदर्भातील पुढील पोस्ट येथे वाचा :- सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार | Types of Stratification | Forms of Social Stratification