समाजशास्त्राचे जनक | father of sociology | who is the father of sociology
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, समाजशास्त्रला इंग्रजी मध्ये Sociology असे म्हणतात. Sociology हा शब्द Socious+Logos या संकरीत दोन शब्दांपासून तयार झाला आहे. म्हणजेच Sociology= Socius ( Latin )+ logos (Greek ) लॅटिन भाषेतील ‘ Socius ‘ म्हणजे सहचर ( Companion ) ग्रीक भाषेतील logos ‘ म्हणजे शास्त्र किंवा उच्च पातळीवरील अभ्यास. या पोस्ट मध्ये समाजशास्त्राचे जनक ( father of sociology ) कोण आहे हे पाहणार आहोत.
ऑगस्ट कॉम्त (Auguste Comte) यांना समाजशास्त्राचा जनक ( Father of Sociology ) असे म्हणतात.
ऑगस्ट कॉम्त या समाजशास्त्रज्ञ यांनी सन १८३८ मध्ये पहिल्यांदा ‘समाजशास्त्र'(Sociology) हा शब्दप्रयोग केला. त्यांनी ते त्यांच्या एका अ डिसकोर्स अन पॉझिटिव्ह फिलॉसॉफी (A Discourse on Positive Philosophy) या पुस्तकात केला म्हणून त्यांना समाजशास्त्राचा जनक ( Father of Sociology ) असे म्हणतात. यांनी फक्त शब्दप्रयोग केला म्हणून जनक म्हटले जात नाही तर त्यांनी समाजाचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करूनच केला गेला पाहिजे असे आग्रह धरला होता.
सामाजिक घटनांचा अभ्यास शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करून करणे शक्य आहे.
ज्याप्रमाणे भौतिकशास्त्रात (Physics मध्ये ) अणु, रेणू ,चुंबकत्व, अवकाश, काळ, गती, पदार्थ, विद्युत, प्रकाश, उष्णता आणि ध्वनी या भौतिक घटनांचा अभ्यास करण्यासाठी जसे शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केला जातो.
त्याचप्रमाणे सामाजिक घटनांचा (सामाजिक परिवर्तन, संघर्ष, सामाजिकीकरण, स्तरीकरण, सामाजिक चळवळी इत्यादींचा ) अभ्यास करण्यासाठी देखील शास्त्रीय पद्धती होणे आवश्यक आहे यावर ऑगस्ट कॉम्त यांनी जोर दिला होता.
कॉम्त यांनी समाजशास्त्र ला एक चौकट, अभ्यासविषय आणि शास्त्रीय पद्धती पुरवली म्हणूनही यांना Father of Sociology असे म्हणतात.
त्याचबरोबर ऑगस्ट कॉम्त यांनी समाजशास्त्र या विषयाला एक शास्त्र म्हणून चौकट, अभ्यासविषय आणि शास्त्रीय पद्धती पुरवली होती. त्याला ते प्रत्यक्षवादी पद्धती ( Positive Method ) म्हणतात. यांनी यासंदर्भात पाॅझीटीव्हीझम हा सिद्धांत मांडलेला आहे.
Sociology ला Social Physics (सामाजिक भौतिकशास्त्र ) असे नाव दिले होते.
खरेतर, ऑगस्ट कॉम्त सुरुवातीला त्यांनी Sociology ऐवजी Social Physics (सामाजिक भौतिकशास्त्र ) असे नाव दिले होते. ‘Social physics म्हणजे Science of society म्हणजेच समाजाचे विज्ञान असे त्यांनी समाजशास्त्राची व्याख्या केली आहे. मात्र १८३५ मध्ये बेल्जियन सांख्यिकीशास्त्रज्ञ अडॉल्फ क्विटलेट यांनी त्यांच्या एका निबंधाला ” An Essay on Social Physics” असे शीर्षक दिल्यामुळे कॉम्त यांना नाइलाजाने “Social Physics’ ऐवजी ‘Sociology’ असे शब्दप्रयोग वापरावे लागले.
सामाजिक घडामोडींचा आणि घटकांचा वैज्ञानिक, चिकित्सकपणे अभ्यास करणारे विज्ञान किंवा शास्त्र म्हणून समाजशास्त्र १९ व्या शतकात युरोपमध्ये उदयाला आले. मात्र उदयापूर्वीची अशी कोणती पार्श्वभूमी यास कारणीभूत होती? अशी कोणती करणे किंवा परिस्थितीजन्य घडामोडी, घटना, परिस्थिती, वैचारिक स्थिती युरोपमध्ये निर्माण झाल्या होत्या, जिचा परिणाम म्हणून समाजशास्त्र हि एक ज्ञानशाखा म्हणून कसे उदयास आले? याबदल जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वर अधिकची माहिती वाचा: समाजशास्त्राचा उदय एक विद्याशाखा म्हणून कसा झाला | How Sociology Emerged as a Discipline