सामाजिक संजाल | सामाजिक जाळे | Social Network | what is social network in sociology
सामाजिक संजाल (Network) ही समाजशास्त्रातील संकल्पना आहे. संजाल /नेटवर्क म्हणजे सामाजिक संपर्काचे जाळे होय. नेटवर्क मध्ये समूहातील व्यक्ती या सामाजिक संबंधांद्वारे एकमेकांशी जोडलेल्या असतात. व्यक्ती -व्यक्ती, व्यक्ती-समूह आणि समूह-समूहामध्ये नेहमी संपर्क किंवा अंतरक्रिया सातत्याने होत असतात. त्यातून सामाजिक संबंधातून तयार होतात. त्यामुळेच तर सामाजिक संबंधाचे जाळे म्हणजे समाज अशी समाजाची व्याख्या केली जाते.
सामाजिक संजाल /नेटवर्क म्हणजे काय | What is Social Network
सामाजिक संबंधांद्वारे एक किंवा अधिक एकमेकांशी जोडल्या जाऊन सामाजिक नेटवर्क बनते. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक संबंधांच्या जाळ्यातून ‘सामाजिक संजाल’ तयार होते.
सामाजिक संबंधांचे उदाहरण |
1.नातेसंबंध (Kinship ) ,
2. मैत्री (Friendship ) ,
3. संप्रेषण (Communication ) ,
4.अधिकारशाही (Authority )
सामाजिक संजाल व्याख्या | Definition of Social network
मार्सडेन– “सामाजिक संजाल म्हणजे सामाजिक क्रिया ( Social Actors ) करणाऱ्यांना जोडणाऱ्या संबंधांची रचना होय.”
Marsden – “Social network is a structure of relationships linking social actors.”
वॉसनमन आणि फॉस्ट:- “क्रिया करणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्यातील संबंधांचा संच म्हणजे सामाजिक संजाल होय.”
Wasserman and faust “The set of actors and ties among them.”
तंत्रज्ञान आणि संजाल | Technology & Network
वर आपण नेटवर्क म्हणजे काय हे पहिले आहे. आता आपण तंत्रज्ञान म्हणजे काय ते पाहू या. ‘तंत्रज्ञान म्हणजे ज्ञानाचे उपयोजन होय’ अशी व्याख्या केली जाते. तंत्रज्ञानाचे सॉफ्टवेअर व हार्डवेअर असे दोन प्रकार पडतात.
आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात व्यक्ती सामाजिक माध्यमांच्या (सोशल मीडिया ) सामाजिक नेटवर्क तयार करीत आहे.
सोशल मीडियाचे काही उदाहरणे
1.Facebook,
2. what app,
3. Twitter,
4. G-mail ,
5. TikTok,
6. WeChat,
7. Instagram,
8. LinkedIn.
सोशल मीडियाचे महत्व | Importance of social media
सोशल मीडिया एक आभासी जग
सोशल मीडिया हा आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. हे एक आभासी जग आहे. ज्यात व्यक्ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांशी संपर्कात राहून संबंध प्रस्थपित करते.
सोशल मीडिया हे संवादाचे एक उत्तम व्यासपीठ व प्रभावी लोकप्रिय माध्यम आहे
सोशल मीडिया हे संवादाचे एक उत्तम व्यासपीठ, प्रभावी माध्यम आहे. व्यक्तीची माहितीची गरज भागविण्याचे काम सोशल मीडिया हे करते. सोशल मीडिया द्वारे वायुवेगाने यामध्ये माहितीची देवाणघेवाण वापरकर्त्याद्वारा केला जातो.
सोशल मीडियाद्वारे क्षणात शेयर केली जाते.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून वापरकर्ता फोटो, व्हिडिओ, माहिती, कागदपत्रे, लोकेशन आणि इतर अनेक गोष्टी क्षणार्धात शेयर करीत असतो. त्यामुळे सोशल मीडिया हे एक अतिशय लोकप्रिय माध्यम बनले आहे. काळाबरोबर ते अधिकाधिक विकसित होत आहे. त्यामुळे व्यक्तीचे सामाजिक संबंधाचे स्वरूप बदलताना दिसून येत आहे.