प्राथमिक व दुय्यम समूहाची वैशिष्ठ्ये | Primary & Secondary groups characteristics
मागील पोस्टमध्ये आपण समूहाचे प्रकार पाहिले. या पोस्टमध्ये आपण प्राथमिक व दुय्यम समूहाची वैशिष्ठ्ये पाहणार आहोत. ही वैशिष्ठ्ये आपण तुलनात्मक पद्धतीने पहाणर आहोत.
प्राथमिक व दुय्यम समूहाची वैशिष्ठ्ये | Primary & Secondary groups characteristics
मुद्दे | प्राथमिक समूहाची वैशिष्टे | Characteristics of primary groups | दुय्यम समूहाची वैशिष्टे | Characteristics of Secondary groups |
व्याख्या | ज्या समूहात सदस्यांमधील परस्परसंबंध अत्यंत घनिष्ठ (intimate ), समोरासमोरचे (face to face) , दीर्घकाळ टिकणारे (durable) आणि प्रामुख्याने सहकार्यावर आधारित (based on co-operation) असे असतात, त्या समूहाना सी. एच्. कूले यांनी प्राथमिक समूह असे म्हटले आहे | ड्रेसलर आणि विलीस – “ज्या समूहातील सदस्यांमधील संबंध हे व्यक्तिनिरपेक्ष असतात त्या समूहाला ‘ दुय्यम समूह ‘ असे म्हणतात.” ऑगबर्न आणि निमकॉफ –“जो समूह घनिष्ठतेचा अभाव असलेले अनुभव प्रदान करतो त्यास ‘दुय्यम समूह’ असे म्हणतात.” |
उदा. | कुटुंब ( family ) , मैत्री ( Friendship) , बालसंवंगडी (Play Groups), शेजारी (Neighbors) आणि जोडपे (A couple ) | शाळा (School), राजकीय पक्ष (Political parties), बिजनेस ऑर्गनायझेशन (Business organizations) & कामाचे ठिकाण ( Work place) |
सान्निध्य | भौतिक सान्निध्य (Physical proximity ) | भौतिक सान्नीध्यांचा अभाव ( Lack of physical proximity ) |
आकार | समूहाचा आकार लहान ( Small Size ) | समूहाचा मोठा आकार ( Large Size ) |
संबंध | संबंधात सातत्य (Continuity in relationships ) | तुटक संबंध ( Discontinuous relationship) |
संबंध | समोरासमोरचे संबंध (Face to face relationships) | अप्रत्याक्ष संबंध ( Indirect relationship ) |
संबंध | घनिष्ठ संबंध (intimate relationships) | कमी घनिष्ट संबंध ( Less intimate relationship) |
संबंध | व्यक्तिगत संबंध (personal relationships) | व्यक्तिनिरपेक्ष संबंध ( Impersonal relationships) |
संबंध | अनौपचारिक संबंध (Informal relationships) | औपचारिक संबंध ( Formal relationships) |
संबंध | स्वयंस्फुर्त संबंध ( Spontaneous relationships) | कराराच्या स्वरूपाचे संबंध ( Contractual relationships) |
संबंध | अहस्तांतर्णीय संबंध (relationship is not transferable ) | 1.हस्तांतर्णीय संबंध ( Relationship is transferable ) |
प्राथमिक समूहाचे महत्व | Importance of Primary Group
- प्राथमिक समूह हे मानवी स्वभावाचे जन्मस्थान आहे.
- प्राथमिक समूह हे मानवाला सामाजिक प्राणी बनवायला मदत करतात.
- प्राथमिक समूह व्यक्तींच्या सामाजिकीकरणात मदत करतात.
- प्राथमिक समूह व्यक्तीच्या सामाजिक जीवनावर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे व्यक्ती कसे ही वागू
- सभासदांना त्यांच्या नियमानुसार समाजत कसे वागायचे व इतरांशी व्यवहार कसे करायचे हे शिकवते.
- प्राथमिक समूह व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकास घडवून आणण्यासाठी मदत व मार्गदर्शन करतात.
- प्राथमिक समूह हे व्यक्तीच्या शारीरिक गरजाबरोबर मानसिक आणि भावनिक गरजा पूर्ण करते.
वरील पोस्ट संदर्भातील मागील पोस्ट वाचा:-समूहाचे प्रकार | Types of groups in sociology