फ्रेंच राज्यक्रांतीला दिशा व प्रेरणा देणारे, तत्त्वज्ञ व विचारवंत यांची भूमिका | Role of philosophers in French Revolution | French Revolution Part-3
फ्रेंच राज्यक्रांती भाग-2 मध्ये, आपण फ्रेंच राज्यक्रांतीचीआर्थिक कारणे समजून घेतली. या पोस्टद्वारे फ्रेंच राज्यक्रांतीला दिशा व प्रेरणा देणारे, विचार देणारे तत्त्वज्ञ, विचारवंत, बंडखोर क्रांतिकारक यांचे क्रांतीप्रवण विचार व भूमिका (Role of philosophers) जाणून घेणार आहोत.
सन १७८९ ते १८०२ या काळात फ्रेंच राज्यक्रांतीला दिशा व प्रेरणा देणारे देणाऱ्यामध्ये थॉमस हॉब्ज, जॉन लॉक, रुसो, व्हॉल्टेअर, मॉन्टेस्क्यू यांसारखे अनेक विचारवंत सामील होते. या विचारवंतानी मांडलेले विचार, नवीन कल्पना या संबध युरोपवर चर्चा करीत होत्या. त्यातूनच लोकांना प्रेरणा मिळाली. आपल्यावर अन्याय होतंय याची जाणीव लोकांना झाली. ही जुलमी राज्य व्यवस्था बदलली पाहिजे असे लोकांना वाटले त्याचा ही परिणाम १४ जुलै-१७८९ रोजी लोक रस्त्यावर येण्यात झाला होता.
फ्रेंच राज्यक्रांतीला दिशा व प्रेरणा देणारे तत्त्वज्ञ व विचारवंत | Role of philosophers in French Revolution
जॉन लॉक ( १६३२-१७०४ )
प्रत्येक व्यक्तीस काही अधिकार आहेत. ते कोणत्याही सत्तेला डावलता येणार नाही.
जॉन लॉक यांनी खालील अधिकाराबाबत जोर दिला होता.
१. जीवन जगण्याचा अधिकार
२. संपत्तीचा अधिकार
३.व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार
४. वरील सर्व अधिकारांचे संरक्षण राजांनी करावे करायला हवे..
५. जन्माने कोणालाही अधिकार मिळू नये,असे ही त्यांनी सांगितले होते.
मॉन्टेस्क्यू ( १६८९ -१७७५ )
मॉन्टेस्क्यू यांनी ‘द स्पिरीट ऑफ द लॉ (The spirit of the laws) या पुस्तकात त्यांच्या विचार मांडले आहे.
१. प्रशासन, कायदा आणि न्यायपालिका ही एका व्यक्तीकडे केंद्रित होऊ नये.
२. अधिकारांचे विकेंद्रीकरण व्हावे.
३. सत्तेचे विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यात विभाजन व्हायला पाहिजे,( Division of power within the government between the legislative, The executive & judiciary )
त्यांच्या याच विचारातून, अमेरिकेमध्ये १७७४ मध्ये ब्रिटीशांच्या ताब्यातील १३ वसाहती मुक्त होऊन त्याठिकाणी वरील सत्तेचे विभाजन असलेले मॉडेल स्वीकारले गेले आहे. असे त्यांनी विचार मांडले होते
रुसो ( १७१२-१७७८ )
१. सामजिक करार बाबत आपले विचार मांडले.
२.लोकांनी त्याचे लोकप्रतिनिधी ठरवले पाहिजे आणि त्यांच्यात एक सामाजिक करार असला पाहिजे. त्यांनी लोकांची सेवा केली पाहिजे. (Social contract between people’s and their representatives.)
३. लोकांनी सरकार निर्माण केले पाहिजे.
४ . राज्यांचे सर्वभौम हे लोकांच्या हातात असले पाहिजे.
५. लोकांच्या हातात अंतिम सत्ता असायला पाहिजे.
६. लोकशाही पद्धतीने सरकार लोकांसाठी काम करायला हवे.
७. कायदा सर्वाना सारखाच लागू पाहिजे असे ही त्यांचे मत होते. असे काही रुसोचे विचार होते. यातून लोकांना प्रेरणा मिळाली होती.
Role of philosophers in French Revolution (John Locke, Rousseau, Montesquieu) In English
वरील पोस्ट संदर्भातील पुढील पोस्ट वाचा:- फ्रेंच राज्यक्रांतीची राजकीय कारणे | फ्रेंच राज्यक्रांती भाग -4 | French Revolution Part-4
वरील पोस्ट संदर्भातील मागील पोस्ट वाचा:- फ्रेंच राज्यक्रांती भाग-2 | French Revolution Part-2