औद्योगिक क्रांती वैशिष्ट्ये, कारणे व परिणाम | Industrial Revolution (1760 -1840) |
युरोप अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी आणि एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक यांत्रिक शोध लागून युरोपच्या उत्पादन पद्धतीत जी क्रांती घडून आली तीच औद्योगिक क्रांती या नावाने ओळखली जाते. सर्वप्रथम या क्रांतीची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली व नंतर हळहळू ती संपूर्ण युरोपमध्ये जाऊन पहोचले.
औद्योगिक क्रांतीमुळे नेमके कोणते बदल घडले आले ? | What exactly were the changes that happened due to the industrial revolution?
- एका छपराखाली शेकडो-हजारो कामगारांसमवेत नव्या यंत्र-तंत्राच्या साहाय्याने कारखानदारी (Factory) ही नवी उद्योगव्यवस्था आकाराला आली.
- शोधांची मालिका ( Series of Inventions ) – वाफेच्या शक्तीवर चालणारे इंजीन, स्पिनिंग जेनी, म्यूल जेनी, पवनचक्की, लोखंडी रुळावर धावणारी रेल्वे, लोखंडी ब्रीज, विमान, तारयंत्रे, रेडिओ अशा अनेक शोधांनी उत्पादन, वितरण, वाहतूक, संपर्क यांना गती आली.
- बाजारकेंद्री आणि नफ्याच्या हेतूने उत्पादन होऊ लागले १ ९व्या शतकाच्या पूर्वार्धात फ्रान्स, अमेरिका, जर्मनी येथेही औद्योगिक क्रांतीचा विस्तार झाला.
- अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, समाजरचना, संस्कृती, राजकारण अशा सर्वच क्षेत्रांत औद्योगिक क्रांतीने मूलगामी क्रांतीकरी परिणाम घडविले.
- नव्या व्यवस्था, नवी मूल्ये, नवे अर्थोत्पादन, नव्या भांडवली व्यवस्था, नवे रोजगार, नागरीकरण, सर्वच सामाजिक संस्थांमध्ये झालेले आमूलाग्र बदल या गोष्टी औद्योगिक क्रांतीमुळे घडून आल्या.
- विविध सामाजिक समस्या –अरिष्टे निर्माण हि झाले होते.
- या गोष्टी समाजशास्त्राला तातडीचे व कळीचे वर्तमान विषय पुरविणारी होती
औद्योगिक क्रांतीची प्रामुख्याने तीन वैशिष्ट्ये सांगता येतील | Three main features / characteristics of the Industrial Revolution
अ) हातानी उत्पादन करण्याऐवजी आता यंत्राने उत्पादन होऊ लागले.
ब ) व्यवसायाचे ठिकाण घर न राहता कारखाना हे व्यवसायाचे ठिकाण बनले.
क) भांडवल अथवा कारखानदारीच्या समाजात उदय झाला.
इंग्लंडमध्ये प्रथम औद्योगिक क्रांती का सुरू झाली? | Why did the first industrial revolution start in England?
- इंग्लंडला शत्रूपासून धोका कमी होता. कारण संपुर्ण भू-भाग हा समुद्रवेष्टीत होता.
- इंग्लंड मध्ये खनिज साधनसंपत्तीही ( लोखंड, कोळसा, चुना तसेच खाणी इत्यादी ) मोठ्या प्रमाणात होत्या
- जगभरात अनेक देशात ब्रिटीशांच्या वसाहती होत्या. अश्या या वसाहती देशातून प्रचंड प्रमाणत नैसर्गिक साधनसंपत्ती लुट ब्रिटिशांकडून केली जात होती.
- जगातील सर्व सागरीमार्गावर त्याचे वर्चस्व होते. व्यापारी जहाजे ही मोठ्याप्रमाणात त्यांच्याकडे होत्या. त्यामुळे मालांची ने-आण करणे त्यांना खूप सोपे होते. वसाहती देशातून नैसर्गिक साधनसंपत्ती व कच्चा माल वसाहती देशातून आणून इंग्लंड मध्ये त्यावर प्रक्रिया करून परत पक्का माल करून वसाहती देशांना विकले जात होते.
- सर्व वसाहती देश हे मार्केट म्हणून इंग्लंडला उपलब्ध होते. त्यामुळे आर्थिक सुबत्ता आली.
- कामांसाठी कारखान्यामध्ये स्वस्त दारात मजूर उपलब्ध होते.
- नवीन कारखाना उघडण्यास सर्व प्रकारची अनुकूल परिस्थिती होती.
- सन १६८८ मध्ये इंग्लंडमध्ये लोकशाहीची स्थापना झाली होती. लोकांना यामुळे आचार व विचाराचे स्वातंत्र्य होते.
- बौद्धिक स्वातंत्र्य असल्यामुळे नवनवीन शोध लागू शकले. तेथील राजा कडून अश्या लोकांना प्रोत्साहन दिले जात होते.
औद्योगिक क्रांतीचे परिणाम
अ ) औद्योगिक क्रांती मुळे समाजाची वाटचाल कृषिप्रधानतेकडून उद्योगप्रधानतेकडे
- नव्या भांडवलदारांचा व भांडवलाचा उदय आणि तंत्रज्ञान-यंत्रे यांचे शोध यामुळे नव्या उद्योगांची ( Modern Industry – Factory ) कारखान्यांची उत्पादन व्यवस्था रुजू लागली.
- नव्या भांडवलदारांचा व भांडवलाचा उदय आणि तंत्रज्ञान-यंत्रे यांचे शोध यामुळे नव्या उद्योगांची (Modern Industry- Factory ) कारखान्यांची उत्पादन व्यवस्था रुजू लागली.
- खेड्यात घरोघरी चालणारे पारंपरिक व्यवसाय, उद्योगांना घरघर लागली. व्यवसाय संघ ( Guilds ) मोडकळीला आले. शेती व्यवसाय किफायतशीर राहिला नाही. बेकारांचे तांडे कारखाने वाढणाऱ्या शहरांकडे धावू लागले. शहरांची आणि तेथील बाजारपेठांची तसेच व्यापाराची वाढ होऊ लागली.
- ग्रामीण ते शहरी स्थलांतराने शहरांचा विस्तार होऊ लागला.
- स्थलांतरित गृहोत्पादक-शेतकरी कारागीर-ग्रामीण अर्थव्यवस्थेचे आधार असणारे सर्वच व्यावसायिक आता शहरी, औद्योगिक-कामगार बनले.
- कारखाना उत्पादन व्यवस्थेने नवे वर्ग उदयाला आले.
- कारखाना मालक नवभांडवलदार बनले; तर नव्या उत्पादन साधनांवर मालकी नसलेले ( पण मुक्त असे ) कामगार बनले. ‘श्रम’ हे विकले जाणारे ( पगारी ) बनले. कमी पगारावर अधिक काळ राबवून कामगारांचे शोषण होऊ लागले.
- दारिद्र्य, बेकारी, शोषण यांनी गांजलेले शोषित कामगार झोपडपट्टीत राहू लागले आणि मानवी इतिहासात पहिल्यांदाच गलिच्छ वस्त्या ( Slums ) निर्माण झाल्या. भूकमारी, शोषण, अनारोग्य आणि अत्यल्प सुरक्षा यामुळे कामगार ‘सर्वहारा’ ( सर्व क्षेत्रांत हरलेला ) वर्ग बनला; तर बड्या कंपनी मालकांची व्यापारांची आर्थिक स्थिती कमालीची सुधारली. सामाजिक, आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढली.
ब ) औद्योगिक क्रांती मुळे मध्यमवर्गाचा उदय होऊ लागला
- ऑफिस कर्मचारी, व्यवस्थापक आणि अन्य अनेक नवे व्यवसाय उदयाला आले.
- मध्यमवर्गाचा विस्तार होऊ लागला. सामाजिक, राजकीय जीवनातील एक प्रभावी शक्ती म्हणून हा वर्ग पुढे आला.
- उद्योजक, भांडवलदारांचा उच्च वर्ग, मध्यमवर्ग आणि कामगारांचा कनिष्ठ वर्ग अशी नवी वर्गीय मांडणी झाली.
- उद्योगपूरक नव्या संस्था उदा. बँक, वित्त कंपन्या. उदयाला आल्या आणि ‘उत्पादन-व्यवसाय- वर्ग’ यांची स्थिती भांडवलशाहीवादी आणि गुंतागुंतीची बनली.
क) औद्योगिक क्रांती मुळे शहरी जीवनाचा विस्तार व शहरीकरण प्रक्रीयेने वेग घेतला
- नव्या तंत्रज्ञानाचा, यंत्रांचा शोध आणि त्यांचा वापर शेती, उत्पादन, खाणकाम, दळणवळण, व्यापार अशा मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रांत विस्तारला. त्याचे परिणाम ग्रामीण सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जीवनावर झाले.
- शेतीमध्ये यंत्रे आल्याने मानवी श्रमाचे महत्त्व कमी झाले; ग्रामीण बेकारी वाढली. जमीन ही विक्रीयोग्य झाली; जमिनीचे तुकडे पडले. त्यामुळे संयुक्त कुटुंबांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा कमकुवत झाला.
- ग्रामीण जीवनातील पारंपरिक व्यवसाय-उद्योगांचे स्वरूपही बदलले.
- त्यामुळे ग्रामीण संतुलित ऐक्यभावापासून तुटलेले, अतिरिक्त ठरलेले, बेकारांचे तांडे शहराच्या दिशेने जाऊ लागले.
- ग्रामीण भागातील स्थलांतरामुळे शहरे वाढली, विस्तारली.
- शहरी जीवनमान हे ग्रामीण जीवनापेक्षा मोठ्या प्रमाणात वेगळे होते. लहान, बकाल घरे, घराबाहेर काम, परंपरा- धर्म यांचा घटता प्रभाव, वर्गीय भेदाभेद, शोषण, मोठी लोकसंख्या, मोठे रस्ते, यांत्रिक वाहतूक, व्यक्तिवाद, भांडवलशाही इ. वर आधारलेल्या शहरी जीवनाचा विस्तार हा बदल विलक्षण होता.
ड ) औद्योगिक क्रांती मुळे सामाजिक संस्थांमधील मूलभूत परिवर्तन
- शहरी जीवनपद्धतीचे प्रमुख आधार म्हणजे तेथील सामाजिक संस्था, आर्थिक संस्था, राज्य संस्था, धर्म संस्था, कुटुंब, विवाह, कायदा, शिक्षण, मूल्य इ. व्यवस्था होत. यांपैकी सामाजिक संस्थांमधील लक्षणीय बदल हे औद्योगिक क्रांतीचे एक वैशिष्ट्य होय.
- अर्थोत्पादन, वाणिज्य, व्यापार क्षेत्रांत बदल झाले.
- पैशांवर आधारित भांडवलशाहीप्रधान अर्थव्यवस्था रूढ होत गेली.
- कुटुंबाचा आकार लहान झाला; विभक्त कुटुंबे वाढली.
- दैववादी धारणांना नाकारून विवेकाधारित विज्ञानवादी धारणांचा स्वीकार होत गेल्याने धर्म, कायदा या मूल्य संस्थांमध्ये मूलभूत बदल झाले.
- वर्ग, वर्गीय विषमतेचा तसेच शहरी जीवनाचा विवाहावर परिणाम झाला.
- शिक्षण संस्थेत बदल झाले. निरक्षर लोकांचा साधा समुदाय गुंतागुंतीचा, साक्षर, विशेषीकृत ज्ञान कौशल्ये मिळविणाऱ्यांचा झाला.
- नव्या राजसत्ता, आदर्श, घटना, कायदे, विचारप्रणाल्या यामुळे मानवी वर्तन-आंतरक्रियांमध्ये, संस्कृतीमध्ये मोठा बदल झाला. या आमूलाग्र बदलाने नैतिकता, आदर्श यांच्या संदिग्धतेबरोबर नव्या प्रश्नांचा, समस्यांचा उदय व विस्तार झाला.
इ ) नव्या सामाजिक समस्यांचा उदय
- प्रचंड दारिद्र्य, झोपडपट्ट्यामध्ये वाढ, पर्यावरणाची हानी व प्रदूषण, प्रचंड आर्थिक विषमता, परात्मता, कौटुंबिक विघटन यांसारख्या अनेक सामाजिक समस्या औद्योगिक क्रांतीमुळे उदयाला आल्या.
- औद्योगिकरणाच्या प्रसाराबरोबर त्या जगभर पसरल्या.
- पारंपरिक ग्रामव्यवस्थेमध्ये विविध हक्क-अधिकारांनी आश्वस्थ, सुरक्षित असणाऱ्या शेतकरी- कारागीर व्यावसायिकांना आपल्या हक्काच्या गावापासून, सुरक्षित रोजी-रोटीपासून, व्यवसायापासून वंचित होण्याची वेळ औद्योगिकरणाने आणली.
- अवजड यंत्रांबरोबरचे नीरस काम, कमी पगार, असुरक्षित कामाची स्थिती, १२ ते १८ प्रतिदिन कामाचे तास, शोषणवर्गीय असंतोष, संप-मोर्चे यांसारखे प्रश्न औद्योगिक शहरांना असंघटित करणारे होते. समाजाची बिघाडाची स्थिती दर्शविणारे होते.
- कार्ल मार्क्स यांना असे वाटत होते की, ही भांडवलशाही व्यवस्था व कारखाना उत्पादन पद्धती कामगारांच्या शोषणाची साधने बनत आहेत. त्यांच्यात क्रांतिकारक परिवर्तन घडविणे गरजेचे आहे.
If you’re interested in the transformative period known as the Industrial Revolution, watch our video here to uncover the profound changes, innovations, and societal shifts that shaped modern industry and society.
हे ही वाचा :- एक विद्याशाखा म्हणून समाजशास्त्रच्या उदयकरिता कारणीभूत ठरणारे घटक किंवा घटना
हे ही वाचा. फ्रेंच राज्यक्रांती भाग -1| French Revolution Part-1