फ्रेंच राज्यक्रांती भाग -2 | French Revolution Part-2
फ्रेंच राज्यक्रांती भाग-1 मध्ये आपण फ्रेंच राज्यक्रांतीची सुरुवात आणि सामाजिक कारणे पहिली. या पोस्टद्वारे आपण आर्थिक कारणे समजून घेऊयात.
फ्रेंच राज्यक्रांतीची आर्थिक कारणे | french Rajyakrantichi Arthik karanae
फ्रान्समध्ये बरबॉन ( Bourbon ) राजघराण्याची सत्ता होती. त्यामुळे वंशपरंपरेने १५ लुईनंतर १७७४ मध्ये १६ लुई ( Louis ) हा फ्रान्सचा राजा बनला होता. जेव्हा तो राजा बनला होता. त्यावेळी तो फक्त २० वर्षाचा होता. राज्यकारभारासंदर्भातील समज त्याला म्हणावी तशी नव्हती. त्यांचे लग्न हे एका ऑस्ट्रियन राजकुमारी मेरी अँटोइनेट ( Austrian Princess Marie Antoinette ) याच्याशी झाला होता.
ऑस्ट्रियन राजकुमारी मेरी अँटोइनेट या राणीने केलेली पैशाची उधळपट्टी
अश्या या सोळाव्या लुईची ही बायको राजकारणात मात्र अनुभवशून्य होती. तिच्याकडे दूरदृष्टीचा अभाव होता. ती उधळ्या प्रवृत्तीची होती. मेरी अँटोइनेट, राणी म्हणून तिच्या सुरुवातीच्या वर्षांत, पैसे उधळणारी आणि बेजबाबदार अशी त्याची ओळख होती. तिने कपड्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. दररोज जवळजवळ नवीन महागडे ड्रेस ती खरेदी करीत असे. ती ऑस्ट्रियाची असल्यामुळे ती फ्रान्समध्ये अत्यंत लोकप्रिय नव्हती.
एकदा लोकांनी राणीला सांगितले की, फ्रान्सची जनता उपाशी मरत आहे. त्यांच्याकडे खायला ब्रेड नाही. परंतु राणीनी लोकांना “लोकांना खायला ब्रेड नाही, तर मग त्यांना केक द्या खायला” असा सल्ला होता. यावरून त्याची समज लक्षात येते. फ्रेंच जनतेविषयी तिला अजिबात सहानुभूती नव्हती. त्यामुळे जनतेचा असंतोष आणखीनच वाढला होता. राणी मेरी अँटोइनेट यांच्याकडून होणारी पैशाची उधळपट्टी हे एक कारण होते कि फ्रेंच जनतेने राजेशाही विरुद्ध उठाव केला.
फ्रान्सची तिजोरी रिकामी झालेली होती.
१४ व १५ लुई राजांनी सतत युद्धे करून फ्रान्सची तिजोरी रिकामी केलेली होती. त्यावेळी ब्रिटिश हा फ्रान्सचा मुख्य शत्रू होता. चौदाव्या लुईने भारतात इंग्लंडशी स्पर्धा करून अमेरिकेत व भारतात वसाहती स्थापन केल्या होत्या.
जगभरातील काही वसाहती असणार्या देशात ठिकाणी इंग्लंड विरुद्ध (व्हर्सेस) फ्रान्स असा संघर्ष होता. या संघर्षापोटी फ्रान्सला बरेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. त्याचा परिणाम हा फ्रान्सची तिजोरी रिकामी होण्यास झाला होता.
१६ लुई यांनी पैसे नसताना ही अमेरिकेला मदत केली.
जेव्हा १६ लुई राजा बनला, त्यावेळी त्याच्या वाटयाला रिकामीच तिजोरी आलेली होती. त्याला राज्य, आर्मी, कोर्ट, विद्यापीठे चालवायचं होती. त्याचबरोबर राजवाड्याचा खर्च, तेथील लवाजमा, नोकर-चाकर, शोक या करिता प्रचंड पैसा लागत होता. असे असताना ही याच काळात त्यांनी अमेरिकेला मदत केली.
अमेरिकेच्या तेरा वसाहती इंग्लंड पासून मुक्त करण्याकरिता फ्रेंच सैनिक अमेरिकेच्या वतीने इंग्लंड विरुद्ध लढले. यांच्याकडे कोणताही पैसा नसताना सुद्धा त्यांनी कर्ज काढले होते. कर्ज देणारे हि जास्त इंटरेस्ट घेऊन पैसे देत होते. अमेरिकेला केलेल्या मदतीमुळे फ्रान्सवर जवळपास दोन बिलियन लिव्हर इतका कर्जाचा बोजा पडला होता. या सर्व कारणांमुळे फ्रान्सची आर्थिक परिस्थिती खालावलेली होती.
१६ लुईकडून फ्रेंच जनता उपाशी मरत असताना करांमध्ये (Taxes) वाढ केली.
फ्रासला आर्थिक परिस्थितीतून सावरण्यासाठी १६ लुईकडून फ्रेंच जनतेच्या करांत (Taxes) वाढ केली. जनता उपाशी मरत असताना करात वाढ केली गेली. करांत केलेली वाढ व डबघाईला आलेली अर्थव्यवस्था हे कुठेतरी हे एक आर्थिक कारण होतं, ज्यामुळे फ्रेंच जनतेने १४ जुलै १७८९ रोजी रस्त्यावर येऊन राजाला विरोध केला होता.
वरील पोष्ट संदर्भातील मागील पोस्ट वाचा- फ्रेंच राज्यक्रांती भाग -1
वरील पोष्ट संदर्भातील पुढील पोस्ट वाचा – फ्रेंच राज्यक्रांतीला दिशा व प्रेरणा देणारे, तत्त्वज्ञ व विचारवंत यांची भूमिका | Role of philosophers in French Revolution | French Revolution Part-3