फ्रेंच राज्यक्रांती भाग -1| French Revolution Part-1
फ्रेंच राज्यक्रांती सुरुवात- १४ जुलै-१७८९ रोजी १६ व्या लुई या राजाच्या विरुद्ध उठाव करून
फ्रेंच राज्यक्रांती सुरुवात हि १४ जुलै-१७८९ रोजी झाली असे आपल्याला म्हणता येईल. झाले असे की, यादिवाशी फ्रासमधील परीस शहरातील जनता सकाळी सकाळी मोठ्या संख्याने शहराच्या मध्यवृत्ती भागात असलेल्या सरकारी कार्यालय असणाऱ्या सिटी हॉल जवळ गोळा होऊ लागली. जवळपास ७००० च्या आसपास हि लोकसंख्या होती. येथे येण्याचा सर्व लोकांचा हा उद्देश होता की, त्यांना हत्यारे हवी होती. जेणेकरून हत्यारांच्या सहाय्यने त्यांना १६ व्या लुई या राजाच्या विरुद्ध उठाव किंवा लढायचे होते.
बॅस्टिल तुरुंगावर हल्ला
जेव्हा लोक सिटी हॉल जवळ गोळा होत होती, त्याचवेळी लोकांचा एक गटाने शहराच्या पूर्व दिशेला असणाऱ्या किल्यामधील बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला. या हल्यात तेथील कमांडर याचा मृत्यू झाला. तुरुंगातील कैदी मुक्त केले गेले. तुरुंगात मात्र फक्त सात कैदी होते. लोकांनी फक्त या सात कैद्यांची मुक्तता म्हणून हा हल्ला केला नव्हता तर, लोकांनी हल्ला यासाठी केला कि, तुरुंग हे राजाचे दमनकारी यंत्रणाचे प्रतिक होते. जुलमी राजवटीचे प्रतिक होते. म्हणून लोकांनी हल्ला करून किल्ल्यातील तुरुंग पडण्याचा / उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला.
लोकांकडून किल्याचे नुकसान केले गेले. किल्ल्यांचे जे काही तुकडे होते ते लोकांनी घरी नेले. काहींनी ते बाजारात विकले तर, काहींनी मात्र, यादिवशी आपण खूप मोठे काम म्हणजेच राज्याविरुद्ध उठावाची सुरुवात केली म्हणून एक आठवण म्हणून आपल्या घरात जतन करून ठेवले होते. या दिवसानंतर परीस मध्ये अराजकता, दंगे व हल्ले करणे वाढले. नंतर संपूर्ण फ्रान्स मध्ये असे वातावरण पसरले. जनतेत असंतोष होता. राजेशाही विरुद्ध लोक प्रदर्शन करीत होते.
फ्रेंच राज्यक्रांती घडून येण्यापाठीमागील सामाजिक कारणे
१४ जुलै-१७८९ रोजी फ्रान्सच्या जनतेने असे का केले? त्यानंतर संपूर्ण परीस सह फ्रान्स मध्ये तेथील राजेशाही विरुद्ध बंडाची स्थिती का निर्माण झाली? याची सामाजिक कारणे आपण येथे समजून घेऊयात.
फ्रेंच जनता ही तीन वर्गात विभागली गेली होती
तत्कालीन फ्रान्समध्ये सरंजामशाही/ सामंतशाही (Feudal system ) तेथे होती. समाज हा तीन वर्गात विभागाला होता.
प्रथम वर्ग (First Estate)
प्रथम वर्ग (First Estate)- यांची लोकसंख्या ही 1% होती. हा वर्ग सर्व प्रकारच्या करांपासून मुक्त होता(Exempt from paying taxes).
द्वितीय वर्ग (Second Estate)
द्वितीय वर्ग (Second Estate) वर्गाची लोकसंख्या ही 2% इतकी होती. हा सुद्धा सर्व प्रकारच्या करांपासून मुक्त होता.(They Also exempt from paying taxes ).
तृतीय वर्ग (Third Estate)
तृतीय वर्ग (Third Estate) -जो की सर्व सामान्यांनाच म्हणजेच कारागीर व कामगारांचा होता आणि त्याची लोकसंख्या ही मात्र 97% इतकी होती. या वर्गास मात्र,राजा, त्याचबरोबर चर्च, व जमीनदार-सरंजामदार या सर्वाना त्यांना कर द्यावे लागत होते. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूवर ही कर द्यावे लागत होते. (Third Estate Was giving / Paid taxes to the king, taxes to the church, and taxes and dues to the lord of the manor, as well as numerous dues on wine, salt, and bread).
फ्रेंच लोकांची आवश्यकता / Needs of the French People
1. राजकीय सत्ता (राजकीय प्रतिनिधित्व ) 2. सामाजिक समानता 3. अन्न 4. आदर 5. समान कर पद्धत |
पहिले दोन वर्गास विशेष अधिकार होते आणि खास सवलती
फ्रान्समधील हे पहिले दोन वर्ग हे आरामशीर मजेत विलासी जीवन जगात होता. यांना विशेष अधिकार होते आणि खास अश्या सवलती त्यांना होत्या. करांचा सगळा भार मात्र तिसऱ्या वर्गातील लोकांवर पडला होता. यामुळे लोकांच्या मनात असंतोष होता. त्यावेळी लोकांना खायला अन्न नव्हते. त्यात राजांनी तिसऱ्या वर्गातील लोकांवर पुन्हा कर वाढवला होता. त्यामुळे लोकांच्या संतापात भर पडली. तत्कालीन फ्रान्स मध्ये १० पैकी ९ व्यक्ती हे उपासमारी व भुकेने मरत होती. १० पैकी १ व्यक्ती ही अति खाण्याने अति पोषणाने मरत होती. हे चित्र लोकांना व फ्रान्सच्या जनतेला अस्वस्थ करणारे होते. त्यामुळे लोकांनी १४ जुलै १७८९ रोजी रस्त्यावर येऊन राजाच्या विरुद्ध उठाव केला. French Revolution Part-1 वरील व्हीडीओ contend पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
If you want to explore the tumultuous era of the French Revolution, watch our video here to delve into the key events, figures, and the impact of this pivotal historical period
वरील पोस्ट संदर्भातील पुढील भाग वाचा – फ्रेंच राज्यक्रांती भाग -2 | French Revolution Part-2
हेही वाचा.-ज्ञानोदय म्हणजे काय? | What is Enlightenment
हेही वाचा:-समाजशास्त्राचा उदयाची पाश्वभूमी