जागतिकीकरण | Everyone Should Know About Globalization Process
जागतिकीकरण जागतिक पातळीवर विविध देशांनी व्यापार करण्याच्या उद्देशाने एकत्र येण्याची ही प्रक्रिया आहे. यामध्ये देशांच्या सीमांचा विचार न करता अनेक गोष्टी करण्यासाठी सर्व देशांनी मिळून तयार केलेली ही प्रक्रिया आहे.
यामध्ये संयुक्त राष्ट्र संघटना (UN) , जागतिक बँक (WB), आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF), जागतिक व्यापार संघटना (WTO), जागतिक आरोग्य संघटना (WHO) इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्था व संघटना यांचा असतो. या सर्व संस्था या जागतिकीकरण प्रक्रिया अनुकूलतेसाठी व्यवस्थापन करते, या प्रक्रियेला गती देते, त्यावर नियंत्रण राखते.
जागतिकीकरणामुळे भांडवलशाहीचा प्रसार
जागतिकीकरणामुळे अमेरिका पुरुस्कृत भांडवलशाही अर्थसंस्थाची पाळेमुळे खोल रवली गेली. त्यासाठी मुक्त आणि खुले व्यापाराला चालना देण्यात आले.
यामध्ये उत्पादने, सेवा, आणि भांडवल इत्यादी विकसित राष्ट्रांनी अविकसित आणि विकसनशील पुरविल्या आणि अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांनी विकसित राष्ट्रांना कच्चा माल, स्वस्तातील मनुष्यबळ सह पायाभूत सुविधा बहुराष्ट्रीय कंपन्याना ( MNC ) पुरविल्या तसेच मार्केट उपलब्ध करून दिले.
त्यामुळे विकसित राष्ट्रांच्या विविध बहुराष्ट्रीय कंपन्याचा विस्तार वायुवेगाने या जगभर विस्तारले गेले.अनेक राष्ट्रांनी या बहुराष्ट्रीय कंपन्यामधील कॉर्पोरेट लॉबीमुळे विदेशी आर्थिक गुंतवणूक धोरणात शिथिलता आणून उदारीकरण व खाजगीकरण याला देशा अंतर्गत चालना देण्यात आल्या.
जागतिकीकरण अर्थ व व्याख्या | Definition of Globalization
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जागतिकीकरण म्हणजे व्यापारीदृष्ट्या जग जवळ येणे होय. शब्दशः अर्थ सांगायचे झाल्यास जागतिकीकरण म्हणजे जगभर पसरणे, किंवा एकाच वेळी संपूर्ण जगाचा किंवा जगातील सर्व लोकांचा विचार करणे.
जागतिकीकरणाचा हेतू किंवा ध्येय हे आर्थिक सुधारणा घडवून आणणे असे होते.
जागतिकीकरणामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी होत्या
जागतिकीकरणामध्ये पुढील गोष्टीचा समावेश होता. ज्यामध्ये ज्या ठिकाणी स्वस्त आणि रास्त कच्चा माल आणि इतर स्त्रोत उपलब्ध असतील , अशा ‘जगातील कोणत्याही ठिकाणी उत्पादन घेणे. जगातील कोणत्याही काना- कोपऱ्यापर्यंत वस्तू आणि सेवा (goods and services) पुरविणे.त्यासाठी संपूर्ण जग हीच एक बाजारपेठ असणे. विदेशी गुंतवणूक करणे इत्यादी.
वरील या सर्व घटकांमुळे विविध देशांची विदेशी गुंतवणूक विविध देशांत होऊ लागली. त्यामुळे देशांच्या अर्थव्यवस्थाही एकमेकांशी जोडल्या जाऊन ते जागतिकीकरण प्रक्रियेत सहभागी झाले.
समाजशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रज्ञ यांनी जागतिकीकरणाची केलेल्या व्याख्या.
दिपक नायर यांच्या मते, देशांच्या राजकीय सीमांमध्ये आर्थिक क्रियांचा विस्तार करणे म्हणजेच जागतिकीकरण होय.
डॉ. यशवंत मनोहर यांच्या मते जागतिकीकरण म्हणजे जगातील वेगवेगळ्या देशांनी परस्पर व्यापार करणे होय.
मार्टिन आलब्रो आणि एलिझाबेथ किंग -“ज्यामुळे जगातील लोक एकाच वैश्विक समाजाचे सदस्य बनतात अशा सर्व प्रक्रियांचा संदर्भ जागतिकीकरणाशी जोडलेला आहे” .
ॲन्थनी गिडेन्स-“ज्यामुळे दूरवरच्या प्रदेशांशी असलेले नाते अशा पद्धतीने जोडले जाते , की अनेक मैल दूर असलेल्या प्रदेशात घडणाऱ्या घटनांचे पडसाद स्थानिक घटनांवर होतात आणि त्याच न्यायाने स्थानिक घटनांचा परिणाम जागतिक पातळीवरील घटनांवर होतो ती प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण.”
जागतिकीकरण आणि भारत
भारतामध्ये सन १९९० नंतर जागतिकीकरणाला सुरुवात झाली असे आपल्याला म्हणता येईल. १९९१ साली भारतावर विविध विदेशी देशांचे कर्ज वाढले होते.हे कर्ज ७० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले होते. म्हणजेच आजच्या भारतीय रुपयामध्ये हि रक्कम Rs- 55,312,655,547.94 इतकी होती. इतके वाढलेले विदेशी कर्ज पाहून जागतिक बँक (World Bank), आंतरराष्ट्रीय नाणे निधी (International Monetary Fund) ह्या खाजगी जागतिक संघटनांनी भारताला आणखी कर्ज देणे सुरुवातीला नाकारले होते. नंतर कर्ज भारताला काही अटीवर देण्यात आले.
खा.ऊ.जा. धोरण | खाऊजा धोरण | जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरण
ह्या अटींमध्ये भारताने आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काही धोरणात्मक बदल करण्याबाबत सांगण्यात आले. अनेक विदेशी MNC कंपन्यांना भारतात बिजनेस येऊ द्यावे असे सांगितले होते. अर्थव्यवस्थेमधील ह्या बदलांना “आर्थिक सुधारणा” म्हटले जाते. तत्कालीन अर्थ मंत्री डॉ मनमोहनसिंग यांनी खुले आर्थिक धोरण देशाला सादर केले होते. त्यालाच आपण खा.ऊ.जा. धोरण असे म्हणतो म्हणजेच जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरण होय.
जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये
- भांडवलशाहीचा प्रसार करणे
- नफा मिळवणे
- खासगी उदयोग यास चालना देणे
- खाजगीकरण उदारीकरण धोरण स्वीकारणे
- तत्वांची उदारता
- परस्परावलंबित्व
- ज्ञानाचे सामायिकीकरण
- बाजारीकरण जागतिकीकरणामुळे औदयोगिक उत्पादन वाढले .
- बहुराष्ट्रीय कंपन्याचा विस्तार करणे
- विदेशी गुंतवणूक करणे