सामाजिक परिवर्तन म्हणजे काय? | What is social change?
सामाजिक परिवर्तन ही समाजशास्त्रातील संकल्पना आहे. या संकल्पनेत दोन शब्द आलेले आहे. एक सामाजिक आणि दुसरे परिवर्तन. सामाजिक शब्दाचा अर्थ ( Meaning of word Social ) -सामाजिक म्हणजे काय तर समाजाने किंवा मानवी समूहाने निर्माण केलेल्या दृश, अदृश अश्या घटकांशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टींचा निर्देशन करण्यासाठी सामाजिक शब्दात सामावलेला आहे.
परिवर्तन या शब्दाचा अर्थ | Meaning of word Change
आता, आपण ‘परिवर्तन’ या शब्दाचा अर्थ समजून घेऊयात. परिवर्तन म्हणजे बदल होय.
बदल म्हणजे कोणत्याही गोष्टीची किंवा घटकांची काही काळाने निरीक्षण केल्यावर जाणवलेला फरक किंवा बदल होय. अश्या फरकास आपण बदल म्हणतो.
परिवर्तन म्हणजे – एखाद्या घटकातील त्यांच्या आधीच्या स्थितीमध्ये झालेला बदल होय. अशी व्याख्या फिक्टर
बदल हा संसाराचा नियम आहे. तसेच हे निसर्गाचा ही नियम आहे. भूतलावर न बदलणारी अशी कोणतीच अस्तित्वात नाही. सजीवामध्ये बदल तर होतेच,त्याचबरोबर निर्जीव घटकांवर सुद्धा बदल दिसतात.निर्जीव घटकांवर ऊन, वारा व पाऊस यांचा परिणाम होऊन त्यांच्यात ही बदल घडून येते. हे बदल कोणालाही थांबविता येत नाही. सर्वत्र घडणारी ही प्रक्रिया आहे. निरंतर चालणारी ही प्रक्रिया आहे.
सामाजिक परिवर्तन संकल्पनेचा अर्थ | Meaning of concept Social Change .
आता, आपण ‘सामाजिक परिवर्तन’ या संकल्पनेचा अर्थ समजून घेऊयात.
सामाजिक संबंधामध्ये होणाऱ्या बदलांना सामाजिक परिवर्तन असे म्हणतात. आता आपणास प्रश्न पडेल की सामाजिक संबंध म्हणजे काय?सामाजिक संबंध म्हणजे काय ? ते कुठे आढळून येते?सामाजिक संबंध हे व्यक्ती-व्यक्तीमध्ये दिसून येतात-उदा. पती-पत्नी संबध; तसेच व्यक्ती-समूहामध्ये दिसून येतात उदा.-विद्यार्थी-शिक्षक संबध, नेता-अनुयायी संबध. त्याचबरोबर आपल्याला समूह-समूहामध्ये दिसून येतात- उदा. दोन देशातील संबध. विवाह करिता एकत्र आलेले दोन कुटुंबातील संबध. जेव्हा व्यक्ती -व्यक्ती, व्यक्ती-समूह आणि समूह-समूह यामधील सर्व घटक परस्परांचे वर्तन प्रभावित करतात तेव्हा त्यांच्यात सामाजिक संबध बनतात.
सामजिक संबध हे व्यक्ती किंवा समूह पर्यत मर्यादित नाही तर ते व्यक्ती किंवा समूह व विविध सामजिक संस्था, संघटन व मंडळे आणि यांच्याशी असतात. एक सामाजिक संस्थेचा, संघटनेचा व मंडळांचा दुसऱ्या सामाजिक संस्थेशी, संघटनेशी व मंडळांशी संबध असतो. त्यांच्यात आंतरक्रिया सातत्याने सुरु असतात. जेव्हा सामाजिक संबंधामध्ये तसेच या विविध घटकांतील दर्जा, भूमिका व कार्यामध्ये आणि रचनेमध्ये जेव्हा बदल होते तेव्हा सामाजिक परिवर्तन घडून येते.
यावरून आपल्याला असे म्हणता येईल की सामाजिक परिवर्तन म्हणजे
सामाजिक संबंधामधील बदल;
सामाजिक संरचानेतील बदल;
संस्थांच्या कार्यामधील बदल;
मुल्ये व व श्रद्धा यातील बदल होय
सामाजिक परिवर्तन विविध व्याख्या | Definition of Social Change.
हॅरी जॉन्सन यांनी केलेली सामाजिक परिवर्तनाची व्याख्या
‘सामाजिक परिवर्तन म्हणजे सामाजिक संरचनेतील बदल होय. ” ( ” social change means change in social structure . ” )
हॉर्टन आणि हंट यांनी केलेली सामाजिक परिवर्तनाची व्याख्या
“सामाजिक संरचनेतील आणि सामाजिक संबंधातील बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन होय. ” (Social change changes in the social structure and social relationships)
किंग्जले डेव्हिस याने केलेली सामाजिक परिवर्तनाची व्याख्या
“केवळ समाजाच्या संघटनात म्हणजेच समाजाच्या संरचनेत आणि कार्यात घडून येणाऱ्या बदलांनाच सामाजिक परिवर्तन असे म्हणतात.” (Social change means only such alterations as occur in social organization i.e., the structure and functions of society)
टिशलेर, व्हायटन आणि हंटर यांनी केलेली मॉरिस गिन्सबर्ग यांच्या मते व्याख्या
“समाजाच्या सामाजिक संघटनात, दर्जे, संस्था आणि सामाजिक संरचनेत घडून येणाऱ्या बदलांचा सामाजिक परिवर्तनात समावेश होतो.” (Social change consists of alterations in society’s social organization, statuses, institutions, and social structure.)
मॉरिस गिन्सबर्ग यांच्या मते
“अभिवृत्ती आणि श्रद्धा यांच्यात होणाऱ्या बदलांचाही सामाजिक परिवर्तन या संज्ञेत समावेश केला जाणे आवश्यक आहे, कारण या घटकांमुळेच सामाजिक संस्था टिकून राहतात आणि त्यांच्याबरोबरच त्या बदलतात.” (Term social change must also include changes in attitudes and beliefs in so far as they sustain institutions and change with them,”)
सामाजिक परिवर्तन कसे असते?
सामाजिक बदल वा परिवर्तन कसे असते तर ते दोन्ही स्वरूपाचे असते. म्हणजेच सकारात्मक व नकारात्मक अश्या प्रकारचे असू शकते. कधी ते पुरोगामी तर कधी प्रतिगामी असते. कधी वर्धमान तर कधी र्हासमान असते. कधी ते स्थायी असते, तर कधी अस्थायी. कधी ते कायमचे, तर कधी हंगामी, कधी ते योजनापूर्वकतरक असते. तर कधी योजनाविरहित असते. कधी एकदिशावर्ती, तर कधी बहुदिशावर्ती,कधी उपकारक, तर कधी अपकारक असते. कधी हितकारक तर कधी हानीकारक असते.
येथे आपल्याला लक्षात घ्यावयाचे आहे की सामाजिक परिवर्तन कोणत्याही प्रकारचे कमी जास्त प्रमाणत स्थल, कालसापेक्ष वेगळे असू शकते. म्हणून म्हटले जाते की परिवर्तनाची दिशा ही अनिश्चित असते. ही एक सापेक्ष संकल्पना आहे. त्यास विशिष्ट परिस्थिती जबाबदार असते. आज जगभरात राजेशाही जाऊन लोकशाही अनेक राष्ट्रात नांदताना दिसते त्यांचे कारण फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये आपल्याला सापडते.