कुटुंब संस्थेची वैशिष्ट्ये व कार्ये | Important function of family
कटुंब संस्था ही मुलभूत व वैश्विक सामाजिक संस्थ आहे. कुटुंबावाचून मानवाचे अस्तित्व शून्य म्हणावे लागेल. विवाह संस्थेद्वारे स्त्री व पुरुष यांना समाजात पती व पत्नी दर्जा मिळतो. त्यांच्यातील लैंगिक संबंधाना मान्यता मिळते मगच कुटुंबांची स्थापन केली जाते. कुटुंबांचे अस्तित्व टिकण्यासाठी कुटुंबसंस्थेला काही महत्वाची कार्ये करावे लागते. कुटुंब संस्थेची कार्ये पाहण्याच्या आधी आपण त्यांची वैशिष्ट्ये पाहूयात.
कुटुंब संस्थेची वैशिष्ट्ये | Characteristic of family
आकार हा लहान आहे | Limited size
कुटुंब हा एक प्राथमिक समूहा आहे म्हणून त्याचा आकार हा लहान आहे. आकार लहान असल्यामुळे एकमेकांची काळजी घेतली जाते, जिव्हाळ्याचे व घनिष्ठ संबंध सदस्यांना मध्ये असते.
स्वरूप हे सार्वत्रिक आहे | Universality
पृथ्वीवरील सर्व समाजात ही संस्था दिसून येथे म्हणून त्याचे स्वरूप हे सार्वत्रिक आहे. म्हणून कुटुंबाला वैश्विक व मुलभूत सामाजिक संस्था म्हणून ओळखले जाते.
स्त्री-पुरुष यांच्यात स्थिर व कायमचे संबंध असते | Permanent in relation
हा प्राथमिक समूह असल्यामुळे स्त्री-पुरुष यांच्यात स्थिर व कायमचे संबंध असते. विवाह द्वारे स्त्री-पुरुष कुटुंबांची निर्मिती करतात.
वंश नामाची एक व्यवस्था असते | A system of nomenclature
प्रत्येक कुटुंबांमध्ये वंश नामाची एक व्यवस्था असते. ही व्यवस्था एक तर परुष अथवा माताद्वारे तयार होते. त्याला आपण पितृवंशिय किंवा मातृवंशीय असे म्हणतो. त्यानुसार कुटुंबातील सदस्यांना आडनाव दिले जाते.
सामान्य निवासस्थानाची म्हणजेच एक घराची व्यवस्था केली जाते.| A common habitation
कुटुंबातील सदस्यांना राहण्यासाठी सामान्य निवासस्थानाची म्हणजेच एक घराची व्यवस्था केली जाते. अश्या घरावर सर्वांचे समान हक्क असतात.
कुटुंबांचा मुख्य आधार हा भावनात्मक असतो | Emotional Basis
कुटुंबातील सदस्यांमध्ये अनौपचारिक संबंध असतात. सर्वांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध असतात. सदस्यांमध्ये प्रेमाची व त्यागाची भावना असते. सुख दुःखात एकमेकांची साथ असते. कुटुंबांचा मुख्य आधार हा भावनात्मक असतो.
आर्थिक सहकार्य असते |An economic provision
व्यक्ती कमवती झाली की समाज त्याला जबाबदार व्यक्ती समजते. स्वःता बरोबर इतरांचे पालनपोषण करू शकते. अर्थउत्पादन करून ती इतर सदस्यांना जगवते. कुटुंबांमध्ये आर्थिक सहकार्य असते.
कटुंब संस्थेची कार्ये | Important function of family
- व्यक्तीची लैंगिक किंवा काम वासनेची गरज भागविण्याचे काम कुटुंबाला करावे लागते.
- प्रजोत्पादन व बालसंगोपन करणे.
- सामाजिकीकरण करणे यामध्ये व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे, संस्कार करणे अपेक्षित असते.
- मानवाच्या मुलभूत गरजा भागविण्याबरोबर व्यक्तीची मानसिक गरज ज्यामध्ये प्रेम, जिव्हाळा, सहकार्य, चांगल्या कामाची स्तुती आणि दुःखामध्ये आधार देण्याचे काम करते.
- शालेयपूर्व शिक्षण देणे आणि संस्कार करणे. मुलांना सुसंस्कृत बनविणे.
- कुटुंबांतील सदस्यांची विविध गरजा भागविण्यासाठी कुटुंबाला अर्थार्जन करून आर्थिक सहकार्य ठेवते.
- कुटुंबाला अवलंबून असलेल्या सदस्यांची काळजी घ्यावी लागते.
- कुटुंबातील सदस्यांना विविध दर्जा व भूमिका धारण करून नेमून दिलेले कर्तव्य पार पडावे लागते.
- कुटुंबातील सदस्यांची करमणूक ही गरज पूर्ण करणे.
- सामाजिक नियंत्रण व कुटुंबातील सदस्यांच्या स्वैर वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचे काम कुटुंब करते.