धर्मसंस्था | Religion as social institution
धर्माचा अभ्यास समाजशास्त्रात एक प्राथमिक सामाजिक संस्था म्हणून केला जातो. मानवाच्या जश्या गरजा आहेत तश्या समाजाच्या देखील आहे. लोकसंख्येचे जतन, समाजातील कामाचे कर्याविभाजन, समाजातील ऐक्य किंवा एकात्मता टिकवून ठेवण्याची गरज आणि समाज सत्यात टिकवून ठेवणे या काही समाजाच्या गरजा आहेत. धर्मसंस्था ही समाजाला एकसंघ जोडून आणि समाजाला एकात्म ठेवते तसेच समाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम ही करते .
धर्म संस्थेचा उगम | Origin of Religion as social Institution.
धर्मसंस्थेचा इतिहास खूप प्राचीन आहे. तो समजून घेताना त्यांची निर्मिती नेमकी कशी झाली हे आपण प्रथम समजून घेऊयात. धर्माचा अभ्यास समाजशास्त्रात एक प्राथमिक सामाजिक संस्था म्हणून केला जातो. निसर्गात विविध नैसर्गिक घडामोडी घडत असतात. रात्र व दिवस होणे. पाऊस पडणे. बर्फ वृष्टी होणे. चक्रीवादळे, समुद्राची ओहोटी-भारती होणे. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण अश्याही अनेक गोष्टी घडत असतात. निसर्गातील या सर्व चमत्कारी वाटणाऱ्या गोष्टी या कोणतीतरी अज्ञात, अद्भुत आणि अदृश असणाऱ्या दैवी शक्ती मुळे शक्ती हे सर्व घडून आणत आहे. असा समज हि मानवी उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर संघटीत झालेल्या मानवी समूहास वाटत होते.
मानवाच्या विचार करण्याच्या शक्तीमध्ये तितकीशी वाढ झालेली नव्हती. निसार्गात घडणाऱ्या या घटना चमत्कारीक वाटणाऱ्या होत्या. त्यांच्या विचाराच्या पद्धतीने नैसर्गिक घटनांचे अर्थ लावत होते. त्यांच्याकडून लावले गेलेले अर्थ हे शास्त्रशुद्ध नव्हते. ते कल्पनेवर आधारित होते. निसर्गातील या सर्व घडामोडी या कोणत्यातरी अदृश्य दैवी शक्ती मुळे घडत असा समज दीर्घकाळ होता. अद्भुत, अदृश्य व अद्वितीय अश्या दैवी शक्तीच्या विश्वासाच्या स्पष्टीकरण देऊ लागला. या दैवी शक्तीच्या विश्वासातून श्रद्धा निर्माण झाल्या त्यातून धर्म संस्थेचा उदय झाला.
धर्माची व्याख्या | धर्मसंस्था म्हणजे काय | Definition of Religion
धर्माच्या समाजशास्त्रज्ञांनी अनेक व्याख्या केलेल्या आहेत.
एमिल दुरखिम – “धर्म म्हणजे पवित्र वस्तूंच्या संदर्भातील श्रद्धा आणि प्रथा यांची पद्धती होय. अश्या समान श्रद्धा व प्रथांवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व व्यक्ती यस एक समान नैतिक समुदायात बांधल्या जातात.” ( Religion is a unified system of beliefs and practices relative to sacred things , that is to say , things set a part and forbidden ” Emil Durkheim )
ऑगबर्न आणि निमकॉफ -“अतिमानवी शक्तीविषयी असणाऱ्या मानवी अभिवृत्ती म्हणजे – धर्म होय.” (“Religion is an attitude towards superhuman powers. ” –Ogburn and Nimkoff )
जेम्स जी. फ्रेझर- “धर्म म्हणजे मानवापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या अशा शक्तींवरील श्रद्धा की ज्या शक्ती मानवी जीवनाला दिशा देऊन त्यावर नियंत्रण ठेवतात अशी लोकांची धारणा असते.” ( Religion a belief in powers superiour to man which are believed to direct and control and control the course of nature of human life” – J. G. Frazer )
इ. बी. टॉयलर- “आध्यात्मिक शक्तीवर असणारी श्रद्धा आणि अशा श्रद्धांशी संबंधित-असलेल्या संस्था, विधी आणि आचरण म्हणजे धर्म होय.” ( “Religion is The belief in spiritual beings and the institutions and practices associated with these beliefs” –E.B. Tylor )
|
धर्माचा | धर्मसंस्थेचा अर्थ
धर्म ही अवैयक्तिक आणि अनामिक शक्ती असते व या शक्तीबाबत व्यक्तीच्या मनात आदराची भावना असते. ही अवैयक्तिक , अनामिक आणि सर्वव्यापी शक्ती म्हणजे समाज होय असे एमिल दुरखिम. समाजाला एकसंघ करण्यासाठी अशी समाज अशी शक्ती जाणूनबुजून तयार करतो जेणेकरून मानवी वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी.
वरील सर्व व्याख्यांवरून आपल्याला थोडक्यात धर्माबदल असे सांगता येईल कि धर्म म्हणजे अति नैसर्गिक किंवा अति मानवी शक्तीवर असणारा विश्वास किंवा श्रद्धा होय. अज्ञाताबाबतची भीती आणि अति नैसर्गिक शक्तीवर असणारी श्रद्धा यातून धर्म अस्तित्वात आला.
शतकानुशतके, मानवजातीने “जीवनाचा अर्थ” समजून घेण्याचा आणि स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक तत्त्वज्ञांचा असा विश्वास आहे की हे चिंतन आणि विश्वातील आपले स्थान समजून घेण्याची इच्छा मानवजातीला इतर प्रजातींपासून वेगळे करते.
धर्म अनेक स्वरूपात सर्व मानवी समाजांमध्ये आढळून आलेला दिसला आहे. यासंदर्भातील पुरावे हे पुरातत्व खोदकाममध्ये मिळालेल्या प्राचीन वस्तू, औपचारिक दफन स्थळे आणि इतर धार्मिक कलाकृती पाहून लक्षात येईल.
समाजशास्त्रज्ञांनी धर्मसंस्थेचा अभ्यास का केला पाहिजे?
धार्मिक विवादांमुळे बरेच सामाजिक संघर्ष आणि युद्धे देखील झाली आहेत. मानव समाजाची संस्कृती समजून घेण्यासाठी, समाजशास्त्रज्ञांनी त्याच्या धर्माचा अभ्यास केला पाहिजे हि गरज पुढे आली. धर्माला एक संस्था म्हणून पाहताना, समाजशास्त्रज्ञ त्याचा मानवी समाजांवर होणाऱ्या परिणामाचे सर्वकष मूल्यांकन करतात. एक संस्था म्हणून, धर्माने धार्मिक भावना, श्रद्धा आणि प्रथा यांचे प्रमाणीकरण करण्यासाठी आणि त्यांचा प्रसार आणि कायम ठेवण्यासाठी कार्य केले आहे. हे सामाजिक नियंत्रण आणि सामाजिक एकीकरणाचे एक शक्तिशाली साधन आहे.
विचारांच्या समुदायाला चालना देऊन सामाजिक ऐक्याचे हे मजबूत बंधन आहे. हे दैवी मंजूरी तसेच वर्तमान आणि भविष्यातील पुरस्कार आणि शिक्षा यांच्याशी संबंधित आहे. याद्वारे, एखाद्याच्या वर्तनावर त्याचा खोल प्रभाव पडतो.
धर्माकडे वैयक्तिक आणि सामाजिक दोन्ही दृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकते. सामाजिक एकसंधता आणि सामाजिक नियंत्रणाची कार्ये मोठ्या समाजाच्या दिशेने असतात, तर भावनिक आणि सामाजिक समर्थन प्रदान करतात आणि इतर मानसिक स्पष्टीकरण व्यक्तीकडे अधिक केंद्रित असतात.
धर्म, इतर सर्व संस्थांप्रमाणे बदलला असला तरी, आधुनिक नव-उदारमतवादी जोखमीच्या जगामध्ये आपल्या जीवनात अधिक जोमाने न जाता तो एक शक्तिशाली शक्ती आहे. ‘देव मेला आहे’ हे विधान जगाच्या लोकसंख्येच्या मोठ्या भागासाठी खरे नाही.
19 व्या शतकापासून विज्ञान आणि अनुभववादाच्या महत्त्वामध्ये अविश्वसनीय वाढ झाली असूनही, ज्यामुळे अनेक लोक धर्माला अंधश्रद्धा मानत आहेत, एक तर्कहीन विश्वास आहे आणि लोकांमध्ये धार्मिक आणि अध्यात्मिकता कोणत्या ना कोणत्या मार्गाने वाढत आहे. अनेक वेळा, धर्म वैज्ञानिक पुराव्यांसमोर टिकून राहतो.