आयुष्मान भारत योजनाद्वारे केंद्राकडून गरीब कुटुंबाना मिळतोय 5 लाखाचा आरोग्य विमा कवच | 5 lakh Health insurance under Ayushman Bharat scheme
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना |आयुष्मान भारत योजना
केंद्र सरकारद्वारा दारिद्र रेषेखालील कुटुंबाना दर वर्षी 5 लाख रुपयाचा आरोग्य विमा आयुष्मान भारत योजनेंतर्गत प्रदान करते. या योजनेचे पात्र लाभार्थी हे दारिद्र रेषेखालील कुटुंब तसेच 2011 साली झालेल्या सामाजिक, आर्थिक, जातीनिहाय जनगणना (SECC-Socio-Economic cast census-2011) झाली होती. या सर्वेक्षणात आढळून आलेल्या कमी आर्थिक उत्पन्न गटांतील बेघर लोकांना या योजनेचे पात्र लाभार्थी ठरविले गेले आहे.
अश्या पात्र व्यक्तींना केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या कडून कुटुंब प्रमुखांना लाभार्थी असल्याच पत्र पाठविण्यात आले आहे. सदरच्या पत्रात आयुष्मान भारत भारत योजनेत निवड झालेल्या कुटुंबाचा तपशील देण्यात आलेला आहे.
कुटुंबांतील किती सदस्यांना विमाचे संरक्षण दिले गेले आहे त्यांची नावे त्यात आलेली आहेत. ही नावे 2011 साली SECC चा जो सर्वे केला गेला होता त्यावेळच्या कुटुंबांच्या रेशन कार्ड वर ज्या व्यक्तींची नावे होती तीच नावे केंद्र सरकार कडून पत्रात नमूद करून पाठविण्यात आले आहे. जर त्या पत्रात कुटुंबातील एखाद्या सदस्यांचे नाव नसेल तर त्याला विमा कवच मिळत नाही.
आयुष्मान भारत योजना पात्र लाभार्थी कसे शोधावे .
4 प्रकारे तुम्ही आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी आहात की नाही हे तपासून पाहू शकता. पुढील वेबसाईट जा. https://mera.pmjay.gov.in/search/login तुम्हला LOGIN हा पर्याय दिसेल. तिथे आपला मोबाईल आपणास विचारेल, जो मोबाईल तुमच्या जवळ आहे तो टाका. Enter Captcha from image हा पर्याय खाली आपणास दिसेल तो क्यापचा टाका. त्यांच्या खाली Generate OTP हा पर्याय खाली आपणास दिसेल त्यावर क्लिक करून OTP मिळवा. 6 अंकी एक OTP येईल तो टाका.
OTP टाकल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो उघडेल. तिथे आपणस एक SERACH पर्याय दिसेल. तिथे तुम्ही तुमचा राज्य निवडा.
राज्य निवडल्या नंतर Select Category हा पर्याय आपणस दिसेल त्यावर आपणस 4 पर्याय दिसतील.
SEARCH BY NAME
SERACH BY HHD NUMBER
SERACH BY RESTION CARD NOUMBER
SEARCH BY MOBILE NUMBER
असे हे चारही पर्याय वापरून तुम्ही आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी आहात की नाही हे तपासून पाहू शकता. नाव टाकून कसे सर्च करायचे या करिता पुढील व्हिडीओ पाहू शकता. https://www.youtube.com/watch?v=fXhxOZED-Ks केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण, मंत्रालय यांच्या कडून तुम्हला पत्र आले असल्यास त्यावर HHD NUMBER असतो. जर पत्र असले नसेल इतर पर्यायाद्वार तपासून पाहता येऊ शकते. पुढील लिंक वर जाऊन सुद्धा आपण फक्त कोणताही मोबाईल न टाकून कोणत्याही गावातील आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांची यादी मिळवू शकतो .
या योजनेकरिता आवश्यक कागदपत्रे
- कुटुंबातील सर्व व्यक्तींचा आधार कार्ड
- कुटुंबांचा रेशन कार्ड
- APL / BPL
- मोबाईल
- निवसास्थानचा पुरावा
- सामाजिक-आर्थिक जातीनिहाय जनगणना सूची (SECC 2011) तील कमी आर्थिक उत्पन्न गटात असणारे लोक.
- पात्र असल्याबाबत सरकार कडून आलेले पत्र
आयुष्मान भारत योजनेत पात्र कुटुंबाना मिळणारे लाभ व मोफत उपचार
- या योजनेंतर्गत पत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना किंवा संपूर्ण परिवारास रुपये 5 लाख मोफत उपचार हे या योजनेच्या खाली जोडलेल्या दवाखाना करता येईल.
- कोणत्याही उपचारास कोणताही शुल्क भरावे लागत नाही.
- वैद्यकीय तपासणी,
- उपचार आणि समुपदेशन
- रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा खर्च
- औषधे आणि वैद्यकीय उपभोग्य वस्तू
- क्लिनिकल आणि प्रयोगशाळा चाचण्या
- वैद्यकीय अरोपण सेवा (जेथे आवश्यक असेल)
- हॉस्पिटलायझेशनचा खर्च
- हॉस्पिटलमधील जेवणाचा खर्च
- उपचारादरम्यान उद्भवणाऱ्या गुंतागुंत
- हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर 15 दिवसांची काळजी
अर्ज प्रक्रिया | योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया
आयुष्मान भारत योजनेंतर्गत जोडलेल्या प्रत्येक रुग्णालयात एक आरोग्य मित्र अशी एक स्वतंत्र व्यक्तीची नेमणूक केलेली आहे. ती व्यक्ती दवाखान्याच्या दर्शनी भागामध्ये बसते. तुम्ही तुम्हांला आलेला पत्र किंवा आयुष्मान भारत गोल्डन कार्ड, किंवा रेशन कार्ड आधार कार्ड या पैकी काहीही घेऊन गेले की तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबांतील आजारी असणारी व्यक्ती पात्र आहे की नाही हे आरोग्य मित्र त्यांच्या कडील डेटा सिस्टम्स मध्ये verify करून पाहतो.त्यानंतर पुढील प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली जाते.
आयुष्मान भारत योजनेंतर्गत जोडलेल्या विविध हॉस्पिटल कसे शोधाल.
आयुष्मान भारत योजनेंतर्गत जोडलेल्या सरकारी, निम्नसरकारी व खाजगी हॉस्पिटल तुम्ही वरील आयुष्मान भारत योजनेकरिताच्या अधिकृत संकेतस्थळ https://hospitals.pmjay.gov.in/Search/ यावर जाऊन पाहू शकता.
प्रथम Search Hospitals क्लिक करा. तुमच्या पुढे नवीन विंडो उघडेल. त्यामध्ये पुढील माहिती विचारण्यात येते.
- State
- Hospital Type
- Hospital Name
- District
- Specialty
- Empanelment Type
वरील माहिती भरल्यावर तुम्हीला दिसत असलेला कॅंपचा टाकून माहिती मिळवू शकला. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणताही अर्ज करण्याची गरज नाही. जर तुमच्या कुटुंबाचा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या यादीत समावेश असेल, तर तुम्ही कोणत्याही सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी प्रति वर्ष 5 लाख रुपयांपर्यंतचा लाभ घेऊ शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही पैसे खर्च करण्याची गरज नाही.
उपचार घेतल्यास डिजिटल मेडिकल रेकॉर्ड करिता काढावे लागणार हेल्थ कार्ड
आयुष्मान भारत योजनेद्वारे उपचार केलेल्या व्यक्तीचे मेडिकल रेकॉर्ड हे हेल्थ कार्ड या डिजिटल कार्ड मध्ये ठेवली जाते. नुकतेच सरकारकडून डिजिटल हेल्थ आयडीला ‘आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट’ ABHA (Ayushman Bharat Health Account) असे नामकरण करण्यात आले आहे.