समाजशास्त्राचा उदय एक विद्याशाखा म्हणून कसा झाला | How Sociology Emerged as a Discipline
समाजशास्त्रचा उदय, उगम व विकास 19 व्या शतकातच का ? व कसा झाला हे सविस्तर घ्या जाणून या पोष्ट्द्वारे. ‘मानवी समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र’ अशी ढोबळ व्याख्या समाजशास्त्राची केली जाते.
समाजशास्त्राचा उदय | Emergence of sociology | समाजशास्त्राचा उदयाची पाश्वभूमी | background of Emergence of sociology | समाजशास्त्राचा विकास कसा झाला? | Development of Sociology.
१९ शतकात समाजाचा शास्त्रीय पद्धतीने विचार होऊ लागला. याचा अर्थ असा होत नाही की, यापूर्वी कोणीही समाजिक विचार-चिंतन किंवा अभ्यास केला नाही. खरेतर मनुष्य भूतलावर अस्तित्वात असल्यापासून सामाजिक विचार होत होता. अनेक प्राचीन पाश्चात्य व बिगर पाश्चात्य देशातील विचारवंतानी, तत्वेत्त्यानी, ऋषीमुनी आणि पंडितांनी समाजविषयक, सामाजिक जीवनाबाबतचे त्यांचे आदर्श विचार, नीतितत्त्वे, आचारतत्त्वे, धर्म, कायदा, राज्य, विश्वरचनाशास्त्र आणि विश्वोत्पत्तीशास्त्र इत्यादीवर त्यांच्या विविध लेखनांतून व ग्रंथातून वेळोवेळी तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय स्थिती लक्षात घेऊन विचार मांडलेले दिसतात. हे विचार समाजशास्त्राच्या उदयाचे पायाभूत विचार आहेत. हे हि लक्षात घेणे आवश्यक आहे.
सदरच्या पोस्टमधील व खाली जोडलेल्या लिंक मधील बहुतांश आशय हा डायमंड पब्लिकेशन द्वारे प्रकाशित केलेल्या ‘समाजशास्त्रीय विचार’ लेखक:- मा. श. सोमण व प्रा. संजय सावळे यांच्या पुस्तकातील आहे. Samajashastriya VIchar Prof.- M. S. Soman, Prof. Sanajy Savale. आवृत्ती – जानेवारी-२०१६ ISBN -978-81-8483-647-1 |
समाजशास्त्र या शब्दाचा उगम | Origin of the word Sociology.
Sociology ला मराठीमध्ये समाजशास्त्र असे म्हणतात . Sociology हा शब्द Socius+Logos या संकरीत दोन शब्दांपासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ -(Study of human association ) म्हणजेच Sociology= Socius ( Latin )+ logos (Greek ) * लॅटिन भाषेतील ‘ Socius ‘ म्हणजे सहचर ( Companion ) * ग्रीक भाषेतील logos ‘ म्हणजे शास्त्र किंवा उच्च पातळीवरील अभ्यास * व्युत्पतिशास्त्रदृष्ट्या ‘समाजशास्त्र’ या शब्दाचा अर्थ, मानवा मानवातील साहचर्याचा अमूर्त पातळीवरील अभ्यास करणारे शास्त्र. * साहचर्या म्हणजे संबध किंवा सहचर |
ऑगस्ट कॉम्त (Auguste Comte) यांना समाजशास्त्राचा जनक ( Father of Sociology ) म्हटले जाते.
ऑगस्ट कॉम्त (Auguste Comte) या समाजशास्त्रज्ञ यांनी सन १८३८ मध्ये पहिल्यांदा ‘समाजशास्त्र'(Sociology) हा शब्दप्रयोग त्यांच्या एका अ डिसकोर्स अन पॉझिटिव्ह फिलॉसॉफी (A Discourse on Positive Philosophy) या पुस्तकात केला म्हणून त्यांना समाजशास्त्राचा जनक ( Father of Sociology ) असे म्हणतात. यांनी फक्त शब्दप्रयोग केला म्हणून जनक म्हटले जात नाही तर त्यांनी समाजाचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करूनच केला गेला पाहिजे असे आग्रह धरला होता.
नैसर्गिक शास्त्र प्रमाणे शास्त्रीय पद्धतींचा अवलंब सामाजिक घटनांचा अभ्यास करणे शक्य आहे.
ज्याप्रमाणे भौतिकशास्त्रात (Physics मध्ये ) अणु, रेणू ,चुंबकत्व, अवकाश, काळ, गती, पदार्थ, विद्युत, प्रकाश, उष्णता आणि ध्वनी या भौतिक घटनांचा अभ्यास करण्यासाठी जसे शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केला जातो त्याचप्रमाणे सामाजिक घटनांचा (सामाजिक परिवर्तन, संघर्ष, सामाजिकीकरण, स्तरीकरण, सामाजिक चळवळी इत्यादींचा ) अभ्यास करण्यासाठी देखील शास्त्रीय पद्धती होणे आवश्यक आहे यावर जोर दिला होता. त्याचबरोबर ऑगस्ट कॉम्त यांनी समाजशास्त्र या विषयाला एक शास्त्र म्हणून चौकट, अभ्यासविषय आणि शास्त्रीय पद्धती पुरवली होती. त्याला ते प्रत्यक्षवादी पद्धती ( Positive Method ) म्हणतात. यांनी यासंदर्भात पाझीटीव्हीझम हा सिद्धांत मांडलेला आहे.
Sociology ला Social Physics (सामाजिक भौतिकशास्त्र ) असे नाव दिले होते.
खरेतर, ऑगस्ट कॉम्त सुरुवातीला त्यांनी Sociology ऐवजी Social Physics (सामाजिक भौतिकशास्त्र ) असे नाव दिले होते. ‘Social physics म्हणजे Science of society म्हणजेच समाजाचे विज्ञान असे त्यांनी समाजशास्त्राची व्याख्या केली आहे. मात्र १८३५ मध्ये बेल्जियन सांख्यिकीशास्त्रज्ञ अडॉल्फ क्विटलेट यांनी त्यांच्या एका निबंधाला ” An Essay on Social Physics” असे शीर्षक दिल्यामुळे कॉम्त यांना नाइलाजाने “Social Physics’ ऐवजी ‘Sociology’ असे शब्दप्रयोग वापरावे लागले.
सामाजिक घडामोडींचा आणि घटकांचा वैज्ञानिक, चिकित्सकपणे अभ्यास करणारे विज्ञान किंवा शास्त्र म्हणून समाजशास्त्र १९ व्या शतकात युरोपमध्ये उदयाला आले हे खरे.
मात्र उदयापूर्वीची अशी कोणती पार्श्वभूमी यास कारणीभूत होती? अशी कोणती करणे किंवा परिस्थितीजन्य घडामोडी, घटना, परिस्थिती, वैचारिक स्थिती युरोपमध्ये निर्माण झाल्या होत्या, जिचा परिणाम म्हणून समाजशास्त्र हि एक ज्ञानशाखा म्हणून कसे उदयास आले? याबदल येथे आपण सविस्तरपणे समजून घेण्याची आवश्यकता आहे.
ज्ञानोदय, फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांती या घटकांची विस्तृत माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आपण माहिती मिळवू शकाल.
समाजशास्त्राचा उदय खालील बौद्धिक तसेच सामाजिक – सांस्कृतिक , राजकीय तसेच आर्थिक घटना / घटक हे एक विद्याशाखा म्हणून योगदान केले आहे. | Following intellectuals, social, political & economical phenomena /Factors contribute to emerge sociology as discipline. OR
समाजशास्त्राचा उदय एक विद्याशाखा म्हणून खालील घटकांचे योगदान | Factors contribute to emerge sociology as discipline
१ ) ज्ञानोदय चळवळ | Enlightenment
२ ) फ्रेंच राज्यक्रांती | French Revolution
३ ) औद्योगिक क्रांती | Industrial Revolution
युरोपातील वरील घडलेल्या तीन महत्त्वपूर्ण घटनांनी समाजशास्त्राच्या उदयाला पूरक परिस्थिती निर्माण केली . The above three important events/ incidents was responsible the for to emerge sociology in Europe .
युरोपमधील तत्कालीन सामाजिक, राजकीय व आर्थिक परिस्थितीमध्ये झालेल्या अमुलाग्र या बदलाला प्रामुख्याने तीन प्रमुख घटनांनी मोठ्या प्रमाणांत प्रभावित केले आहे. यामुळे युरोपीय समाज हा मध्ययुगीन कालखंडातील सरंजामशाही समाजव्यवस्थेकडून आधुनिक भांडवलशाही समाजव्यवस्थेकडे जावू शकले. हे स्थितांतरण व सामाजिक बदल जे एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये परावर्तीत कसा झाला तो अभ्यासणे महत्त्वाचे आहे. म्हणून समाजशास्त्र एक विद्याशाखा म्हणून उदयास आले.
समाजशास्त्राच्या विविध व्याख्या करिता पुढील पोस्ट वाचा समाजशास्त्राची व्याख्या | What is sociology | Definition of sociology