प्राचीन पाश्चात्य व बिगर पाश्चात्य विचारवंत व त्यांचे सामाजिक विचार. Western & Non westerns Social thought background
मनुष्य पृथ्वीवर अस्तित्वात असल्यापासून सामाजिक विचार करीत असेलला आहे. अनेक प्राचीन पाश्चात्य (युरोपियन) व बिगर पाश्चात्य (भारतीय ) विचारवंतानी, तत्वेत्त्यानी, ऋषीमुनी आणि पंडितांनी सामाजिक जीवनाबाबतचे त्यांचे आदर्श विचार त्यांच्या विविध लेखनांतून ग्रंथातून मांडले आहेत.
समाजशास्त्राचा उदय, जरी अधुनिक काळातील असला तरी, समाजाबद्दलचा, सामाजिक जीवनाबद्दलचा विचार-चिंतन अभ्यासक, समाज सदस्य आणि विशेषतः तत्त्वज्ञ प्राचीन काळापासून करीत आले आहेत. मनुष्यमात्रांची समाजशीलता प्राचीन काळातील लोकांनाही ज्ञात होती. ही समाजशीलताच आदर्श अथवा चांगल्या समाजाची गरज होती. नीतितत्त्वे, आचारतत्त्वे, धर्म, कायदा, राज्य, विश्वरचनाशास्त्र आणि विश्वोत्पत्तीशास्त्र समाजाचे प्रश्न अशा विषयांवर प्राचीन काळापासून अभ्यासक विचार करत आले आहेत.
Age | Western (European) Social thought background | Non westerns (Indian ) Social thought background |
Ancient Age 3000 BC – AD 500 | 1)Socrates ( BC 469- 399) 2)Plato ( BC 427- 347) Books- 1. Republic, 3. The stateman, 3) The laws 1)Aristotle ( BC 384- 322) Books– Ethics and Politics His Famous quote- ‘A man is social animal’ | Shatra’s Veda, Upanishads, Puranas, Smritis, Manu Kautilya’s Artha Shastra Shukracharya’s Niti Shastra Ramayana Mahabharat |
प्राचीन युरोपीय पाश्चात्य सामाजिक विचार मांडलेले विचारवंत
सॉक्रेटिस

सॉक्रेटिस ( Socrates इ.स.पू. ४६९-३९९ ) प्राचीन ग्रीसमध्ये अथेन्स हे नगरराज्य हे पाश्चात्त्य संस्कृती आणि तत्त्वज्ञान यांची गंगोत्री समजले जाते. तिथेच सॉक्रेटिस यांचा एका मूर्तिकाराच्या घरात जन्म झाला होता. सद्गुण म्हणजेच ज्ञान ‘असा ज्ञानाचा अर्थ त्यांनी सांगितला. सद्गुण म्हणजे काय, तर शहाणपण, धैर्य, आत्मसंयम आणि दूरदर्शीपणा या चार संकल्पना असे त्याचे मत होते. परंतु त्याच्या अनुभवानुसार शेवटी या चारही सद्गुणांचा एकच अर्थ असून तो ज्ञान या संकल्पनेत एकवटला आहे. या सद्गुणांच्या आधारे माणसाला योग्य-अयोग्य, त्याज्य ग्राह्य चांगले- वाईट यातील फरक उमजून शहाणपण प्राप्त होते. ते शहाणपण म्हणजेच सद्गुण किंवा ज्ञान होय. सॉक्रेटिसच्या या वैचारिक भूमिकेला नैतिक विवेकवाद ( moral rationalism ) आणि शहाणपण ( wisdom ) असे म्हटले गेले. यातून सद्गुण म्हणजे ज्ञान आणि दुर्गुण म्हणजे अज्ञान हे अर्थ प्रतीत होतात
सॉक्रेटिस हे रुपाने अतिसामान्य, खडबडीत चेहऱ्याचा, असे त्याच्याविषयी सांगितले जाते. मात्र, गुणांचा विचार केला तर सॉक्रेटिस अतिशय नीतिमान, निःस्वार्थी, विनम्र आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा होता. सॉक्रेटिस निरक्षर होता असे सांगितले जाते. त्याने त्याचे तत्त्वज्ञान किंवा विचारधन लिखित स्वरूपात ठेवले नाही. तसेच त्याने कोणत्याही विशिष्ट विचारप्रणालीची मांडणी केली नाही असे त्याच्याविषयी सांगितले जाते. तो स्वतःला ईश्वराचा पुत्र मानीत असे. आपल्याला ईश्वरी संदेश येतात असा त्याचा आंतरिक दावा होता. त्याचे साधे, सरळ मत असे होते की, माणसाची बुद्धी एका विशिष्ट पद्धतीने आणि दिशेने चालली तर त्याला चांगले ज्ञान प्राप्त होईल. तसेच ज्ञान हे ईश्वरी असून मानवाला ते त्याच्या सद्गुणामुळे प्राप्त होते असे त्याला वाटे. ज्ञानामुळे माणसाचे नैतिक आचरण व जीवन पवित्र अशा उच्च पातळीवर नेता येते. असे त्यास प्रामाणिकपणे वाटत असे आणि अथेनियन लोकांमध्ये हा विचार रुजवणे हे त्याचे एकमेव ध्येय असावे.
आपण किती आणि कसे बुद्धिमान आहोत किंवा आपल्याजवळ केवढे ज्ञानभांडार आहे याचा अहंकार मिरवणे म्हणजे ज्ञानाचा गैरवापर आणि ईश्वराचा अपमान होय असेच त्याचे मत होते. निसर्गनियमांच्या तत्त्वाप्रमाणेच त्याने मानवी समाजाच्या नियमांचीही निर्मिती केली. व्यवहार्यतेच्या आधारावर अथवा योग्यायोग्यतेच्या कसोटीवर मानवी व्यवहारांचे विवेचन केले जावे असे आग्रहपूर्वक प्रतिपादन सॉक्रेटिस याने केले. मानवी व्यवहार व क्रियेच्या अध्ययनाला वैज्ञानिकेतचा आधार देण्याचे सर्वप्रथम कार्य सक्रेिटिस यानेच केले. ‘ सॉक्रेटिस याने तत्त्वज्ञानाला नीतिशास्त्राकडे वळविले. तत्त्वज्ञान केवळ तत्त्वांचा संच नसून जीवनाचा मार्ग आहे हे स्पष्ट केले. सॉक्रेटिस यांचे काही प्रसिद्ध कोट प्लेटो हा सॉक्रेटिसचा अत्यंत जवळचा शिष्य होता.
प्लेटो

प्लेटो ( Plato इ.स.पू. ४२७-३४७) हा प्राचीन ग्रीक राज्यातील अथेन्स नगरात लहानाचा मोठा झाला. तो सॉक्रेटिसचा अत्यंत जवळचा शिष्य होता. आणि त्याचा शिष्य अरिस्टॉटल ( इ.स.पू. ३८४-३२२ ) यांनी तत्त्वज्ञानाबरोबर समाजचिंतन आणखी समृद्ध बनविले. प्लेटो यांनी आपल्या ‘ रिपब्लीक ‘ ( Republic ) या ग्रंथात मानवी वर्तन व्यवहारांची चिकित्सा केली. प्लेटो म्हणतात, मानव अशाच प्रकारचे वर्तन करतो की, ज्या पद्धतीने समाजाने त्याला वर्तन-व्यवहार करण्यास शिकविलेले असते. राज्यसंस्था आणि समाज, राज्यकारभार, स्तरीकरण, अधिकार, कर्तव्ये, स्त्री-पुरुष शिक्षणाचे महत्त्व अशा अनेक विषयांवर प्लेटो यांनी भाष्य केले. प्लेटोचा ‘आदर्श राज्य ‘ म्हणजेच ‘ द रिपब्लिक ‘ हा ग्रंथ सर्वश्रेष्ठ आहे. प्लेटोचा ‘ आदर्श राज्य ‘ म्हणजेच ‘ द रिपब्लिक ‘ हा ग्रंथ सर्वश्रेष्ठ मानला जातो. आदर्श राज्यांमध्ये सर्वत्र न्याय प्रस्थापित होऊन नैसर्गिक समता निर्माण होते असा मूलभूत सिद्धान्त प्लेटोने या ग्रंथात मांडला आहे . प्लेटोच्या ‘द लॉज् The Laws’ हा हि ग्रंथ होय. या ग्रंथात प्लेटोने आपले तत्त्वज्ञान अनुभवाच्या आधारे मांडले आहे. ‘द स्टेट्समन’ (The Statesman ) हा ही त्यांचा ग्रंथ आहे.
अरिस्टॉटल

अरिस्टॉटल यांनीच ‘मनुष्य हा समाजशील प्राणी आहे’ हे समाजशास्त्राच्या दृष्टीने मूलभूत असणारे विधान केले होते. स्वभावतःच मनुष्य हा समाजशील असतो अशी त्याची धारणा होती.’नीतितत्त्वे आणि राजकारण’ ( Ethics and Politics ) या ग्रंथाद्वारे त्यांनी मानवी समाजाबद्दल, वर्तनाबद्दल विचार व्यक्त केले. शास्त्रांची अभ्यासपद्धती, विगामी निगामी तर्कप्रणाली, नीतिमीमांसा यांना आकार दिला. समाज जीवन, सामाजिक संस्था व वर्तन या गोष्टींवर विचार केला. अरिस्टॉटल याला उत्क्रांतीवादी विचारांचा जनक मानले जाते.
भारतातील प्राचीन सामाजिक विचार प्राचीन वाड्मयातून समजते
भारतातील प्राचीन वाड्मय 1. वेद, 2. उपनिषदे, 3. शास्त्रे पुराणे 4. सूत्रे, 5. रामायण, 6. महाभारत, 7. स्मृतीग्रंथ 7. भगवद्गीता 8. Kautilya’s Artha Shastra 9. Shukracharya’s Niti Shastra- ( नितीसार ) | प्राचीन संस्कृतीचा महान ठेवा आणि वारसा भारताला लाभलेला आहे. हे अनेक भारतीय सामाजिक विचार आपल्याला भारतातील प्राचीन वाड्मयातून आढळतात. या वाड्मयातून जगाला सामाजिक जीवनविषयीचे तत्त्वज्ञान मिळाले. कुलदेवतेपासून ते विश्वदेवापर्यंतचा विचार भारतीय सामाजिक विचारात सापडतो. विशेषतः धार्मिक आचारविचारातून भारतात सामाजिक विचारांची निर्मिती झालेली दिसते. हे प्राचीन भारतीय सामाजिक विचार मुख्यत्वे करून कर्मतत्व, चातुर्वर्ण्य, आश्रमपद्धती, पुरुषार्थ, सामाजिक संस्था, हिंदूंचा जीवनविषयक दृष्टिकोन, इत्यादी गोष्टींशी निगडित आहेत. वेद जगातील पहिले साहित्य वेद. वेद हे मानवसृष्टीच्या आधी परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केले आणि म्हणूनच ते अनादी आहेत अशी वैदिकांची धारणा आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांना वेद अथवा संहिता असे म्हटले जाते. जे जगात नाही ते वेदांत आहे असे म्हणतात. वेद हे भारतीय धर्माचे व संस्कृतीचे मूलाधार ग्रंथ आहे. ‘मनू’ ला भारतीय समाजशास्त्राचा जनक मानले जाते. चातुर्वर्ण्य •ब्राह्मण:-पुजारी, विद्वान आणि शिक्षक •क्षत्रिय:- शासक, योद्धा, सैनिक आणि प्रशासक. •वैश्य:- कृषिविद, पशुपालक आणि व्यापारी. •शूद्र:- सेवा प्रदाता. पुरुषार्थ भारतीय तत्त्वज्ञान धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगते. •Kautilya’s Artha Shastra •कौटिल्याचे अर्थ आणि राजकारणविषयक विचार यातून भारतातील सामाजिक परिस्थितीची वास्तव निदर्शनास येते. •Shukracharya’s Niti Shastra– ( नितीसार ) तत्कालीन सामाजिक –नैतिक मूल्यांवचे दर्शन घडविणारे आहे. समाजाचा सर्वस्पर्शी विचार रामायण व महाभारतात केलेला दिसतो. भारतीय अध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा पाया या दोन ग्रंथांनी घातला आहे. सर्व सृष्टीचा विचार हा महाभारताचा आशय आहे. • कुटुंब, विवाह, वर्ग, संपत्ती, व्यवसाय, धर्म, कायदे, प्रमाणके, संस्कार आदिवर भाष्य करणारे विचार मध्ययुगात अनेकांनी मांडले. |
या पोष्ट संदर्भातील पुढील पोष्ट वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करावे:-समाजशास्त्राचा उदय एक विद्याशाखा म्हणून कसा झाला | How Sociology Emerged as a Discipline